Posts

Showing posts from July 12, 2020

लॉकडाउन काळात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री, दुकाने ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

अलिबाग, जि.रायगड,दि.18 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाउनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने / आस्थापना सकाळी 6.00 ते 11.00 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.             यापूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.15 जुलै रात्री 12 वाजल्या पासून ते दि. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजाविला होता. या काळात किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. घरपोच सेवा सकाळी 8 ते रात्री 10 वाजे दरम्यान पुरविण्यास परवानगी देण्यात आली होती. 0000

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

  अलिबाग, जि.रायगड, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मौजे बेलवली, ता.पनवेल येथील कृष्णा सावळाराम पाटील यांचे घर, मु.बेलवली, पो.आजिवली, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-शेत जमीन, पश्चिमेस-सार्वजनिक रस्ता, दक्षिणेस-दिलीप नारायण पाटील यांचे घर, उत्तरेस-शेत जमीन) हा परिसर. मौजे दापोली, ता.पनवेल येथील बाळाराम दशरथ म्हात्रे यांचे घर, मु.दापोली, पो.पारंगाव, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-बारीक म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-जनार्दन गंगाराम पाटील यांचे घर, दक्षिणेस-शिवदास कृष्णा पाटील यांचे घर, उत्तरेस-माया धर्मा जितेकर यांचे घर) हा परिसर. मौजे भिंगारवाडी, ता.पनवेल येथील आत्माराम सुदाम लहाने यांचे घर, मु.भिंगारवाड, पो.आजिवली, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-गणेश दामोदर लहाने यांचे घर, पश्चिमेस-जनार्दन सुदाम लहाने यांचे सारख, दक्षिणेस-सुजाता सुनिल लहाने यांचे घर, उत्तरेस-सुमीत हरिराम लहाने यांचे घर) हा

उरण तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

  अलिबाग, जि.रायगड, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मौजे जुई, ता.उरण येथील कोमल मंथन भोईर यांचे घर, मौजे जुई, ता.उरण (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर. मौजे चाणजे, ता.उरण येथील प्रशांत शांताराम माळी यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळा रस्ता, पश्चिमेस-रमेश रामभाऊ लोखंडे यांचे घर, दक्षिणेस-कल्पना श्रीकृष्ण भोळे यांचे घर, उत्तरेस-शांताराम पाटील यांचे घर) हा परिसर. मौजे चिरनेर, ता.उरण येथील राजेंद्र रामभाऊ केणी यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-गव्हाण फाटा चिरनेर रस्ता, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-अनिल रामभाऊ केणी यांचे घर, उत्तरेस-चंद्रकांत रामभाऊ केणी यांचे मोकळे घर) हा परिसर. मौजे जासई, ता.उरण येथील रघुनाथ म्हात्रे यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-मोहन बाळाराम म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-विठ्ठल मंदिर, दक्षिणेस-भगवान म्हा

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा

                अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका):- निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागातील जिल्ह्यात प्रामुख्याने फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा, काजू, नारळ, चिकू, कोकम, सुपारी झाडे पूर्णपणे उन्मळून पडल्याने बागायतदारांचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना फळबाग पुनर्लागवडीसाठी व पुनरुज्जीवनासाठी रोजगार हमी योजनेमधून शासकीय अनुदान देणे, हा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता 50 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.     या योजनेकरिता लाभार्थीची निवड पुढीलप्रमाणे :-                   वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास फळबाग नुकसानग्रस्त शेतकरी पात्र राहील. यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी या बागांचे नुकसान झालेल्या संयुक्त पंचनाम्यामध्ये समाविष्ट असलेले, नगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील लाभार्थी, ज्या फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत त्यामधील सर्व झाडे, अस्तित्वात असलेल्या बागांमधील काही झाडे नष्ट झाली असल्यास नष्ट झालेल्या झाडांच्या संख्येइतकी झाडे पुनर्लागवडीसाठी पात्र आहेत.   यामध्ये आंबा पिकासाठी शेतकरी सघन लागवडी

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 32.44 मि.मि.पावसाची नोंद

              अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 32.44 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1344.58 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 38.00 मि.मि., पेण-35.00 मि.मि., मुरुड-26.00 मि.मि., पनवेल-23.80 मि.मि., उरण-27.00 मि.मि., कर्जत-29.20 मि.मि., खालापूर-19.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-54.10 मि.मि., सुधागड-36.00 मि.मि., तळा-52.00 मि.मि., महाड-7.00 मि.मि., पोलादपूर-20.00, म्हसळा-33.00मि.मि., श्रीवर्धन-46.00 मि.मि., माथेरान-49.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 519.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 32.44 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 41.80 टक्के इतकी आहे. 0000

कोणतीही कायदेशीर त्रुटी न राहता आरोपीस जबर शिक्षा मिळावी यासाठी खबरदारी घेण्याचे पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांचे पोलीस प्रशासनाला आदेश

अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका):- पनवेल येथील इंडिया बुल्स मधील कोविड-19 विलगीकरण कक्षात काल (दि.17 जुलै रोजी) एका महिलेवर अतिप्रसंगाची दुर्दैवी घटना घडली होती.                   या घटनेतील संबंधित आरोपीची कसून चौकशी करावी, तपास प्रक्रियेत कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी तपास अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि संबंधित आरोपीस जबर शिक्षा मिळावी, यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी पोलीस विभागाला आणि प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.                   या घटनेतील आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर गु.र.नं.101/2020, भादंवि कलम 376 व 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                 मात्र हा आरोपी संशयित करोनाबाधित असल्याने त्यास कोविड सेंटर मध्येच पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्या आरोपीचा   कोविड चाचणी अहवाल प्रतिक्षेत असून तो प्राप्त झाल्याबरोबर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 0000

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आस्थापनांमधील रिक्त पदे अधिसूचित करण्याकरिता तिमाही विवरणपत्र इआर-1 भरावेत

अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- सेवायोजन कार्यालये कायदा 1959 आणि नियमावली 1960 च्या कायद्यातील भाग-5 मधील उपभाग (1) अन्वये जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची दर तिमाही   (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नमूना फॉर्म ईआर-1 मध्ये ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. ही माहिती शासन स्तरावरुन केंद्र शासनाकडे ऑनलाईन पध्दतीने संकलीत केली जाते. ईआर-1 भरण्यासाठी सेवायोजन विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर Employment या टॅबमध्ये जाऊन Employer (List a Job) ला क्लीक करुन आपला युजरनेम आणि पासवर्ड वापरुन लॉगइन झाल्यानंतर   वेबपोर्टलवर Emploement Returns-1(ER-1) या प्रपत्रात ईआर-1 बाबतची माहिती भरुन शकता. वेबपोर्टलवर ईआर-1 प्रपत्रामध्ये माहिती भरताना काही समस्या निर्माण झाल्यास या कार्यालयाच्या उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा alibagrojgar@gmail.com या ईमेल त्वरीत कळवावे.        विवरणपत्रातील माहिती पाठविणे या काय

सरकारी कर्मचारी करोनावर मात करी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे प्रमुख मार्गदर्शन

Image
अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- सध्या करोनाचे रुग्ण गावोगावी आढळून येत आहेत. तसेच अनेक सरकारी कर्मचारी देखील कोविड-19 पॉझिटिव्ह होत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. या वैश्विक संकटाच्या काळात सरकारी कर्मचारी स्वत:च्या आरोग्यापेक्षा नागरिकांचे आरोग्य आणि प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. आपले कर्तव्य बजावत असताना मानवतेच्या दृष्टीकोनातून अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत देखील करत आहेत. पण यावेळी कोणती काळजी घ्यावी, कशा पध्दतीने आपली सेवा बजावावी, कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, समाजात असलेले गैरसमज कसे दूर करावे, करोना बद्दल योग्य माहिती कशी मिळवावी, याकरिता कोणाची मदत घ्यावी, इत्यादी विषय समजून घेण्याकरिता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,रायगड व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, मानस मैत्र हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.18 जुलै, रोजी सायंकाळी 5.00 वा. कार्यक्रमाची लिंक https://www.facebook.com/viveksathipanvel/ या फेसबुक लिंकवर "सरकारी कर्मचारी करोनावर मात करी" हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला आहे.       यावेळी प्रमुख

कोकण विभागात रासायनिक खताचा पुरेसा साठा उपलब्ध - श्री. विकास पाटील

अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- चालू खरीप हंगामात कोकण विभागात- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुख्यत: भात व फळपिकांचे क्षेत्र असून खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या कृषी निविष्ठा, त्यामध्ये बियाणे व रासायनिक खतांची उपलब्धता सर्व जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहे. कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर त्यांच्या मागणीनुसार जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत युरिया खताची मागणी 31 हजार 430 मे. टन एवढी होती त्यानुसार 33 हजार 858 मे. टन युरियाची उपलब्धता झाली आहे. म्हणजेच मंजूरीपेक्षा 108 % उपलब्धता झाली असून ती शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच करण्यात आलेली आहे. भात पिकाचे बियाणे 5 एप्रिल पासूनच उपलब्ध होऊन शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केलेल्या आहेत. माहे जून मध्ये पुरेसा पाऊस झाल्याने रोपांची उगवण चांगली होऊन लागण सुरु झालेली आहे. त्याकरिता लागणारा रासायनिक खताचा साठा कृषी निविष्ठा केंद्रावर उपलब्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा करण्यात आला आहे.     रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आर.सी.एफ. कंपनीच्या खताची रेक पोहोचविण्यात आली. लॉकडाऊनमुळे

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

  अलिबाग, जि.रायगड, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मौजे गुळसुंदे, ता.पनवेल येथील संजय दत्तू शिर्के यांचे घर, मु.पो.गुळसुंदे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-काशिनाथ चांगू गाताडे यांचे घर, पश्चिमेस-मनोहर नथु भोजणे यांचे घर, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-वसंत मनोहर भोजणे यांचे घर) हा परिसर मौजे सांगुर्ली, ता.पनवेल येथील महादेव गजानन ठोकल यांचे घर, मु.सांगुर्ली, पो.शिरढोण, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-महादेव विठ्ठल देशमुख यांचे घर, पश्चिमेस-मारुती चाऊ केदारी यांचे घर, दक्षिणेस-आसोड जागा, उत्तरेस-चाहू विनू म्हसकर यांचे घर) हा परिसर. मौजे वाजे, ता.पनवेल येथील शिवराम दत्तू पाटील यांचे घर मु.पो.वाजे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-नितीन पाटील यांचे घर, पश्चिमेस-वसंत मसणे, यांचा वाडा, दक्षिणेस-शंकर मसणे,यांचे घर, उत्तरेस-शेती) हा परिसर मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील नरेश विश्वभंर माघाडे यांचे घ

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 36.58 मि.मि.पावसाची नोंद

           अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 36.58 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1312.14 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 71.00 मि.मि., पेण-70.00 मि.मि., मुरुड-45.00 मि.मि., पनवेल-22.00 मि.मि., उरण-46.00 मि.मि., कर्जत-7.60 मि.मि., खालापूर-45.00 मि.मि., माणगांव-22.00 मि.मि., रोहा-38.30 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-33.00 मि.मि., पोलादपूर-24.00, म्हसळा-28.00मि.मि., श्रीवर्धन-42.00 मि.मि., माथेरान-41.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 585.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 36.58 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 40.80 टक्के इतकी आहे. 00000

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व इतर कामकाजास दि.15 ते 26 जुलै पर्यंत स्थगिती

अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- जिल्हाधिकारी   निधी चौधरी यांनी करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि. 15 जुलै रात्री 12 वाजल्यापासून   ते दि. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजाविला आहे. त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दि.15 ते 26 जुलै 2020 या कालावधीपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती कामकाज, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज व इतर कामकाजास स्थगिती देण्यात आली आहे.   या कालावधीत विविध कामांसाठी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या नागरिकांची कामे टाळेबंदी काळानंतर समायोजित केली जातील. टाळेबंदीच्या कालावधीत नागरिकांना पूर्वनियोजित वेळा मिळालेल्या असल्यास किंवा काही कागदपत्रे सादर करावयाची असल्यास संबधित नागरिकांची कामे टाळेबंदी संपल्यानंतर केली जातील याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे. ०००००

जिल्ह्यातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि.15 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर

वृत्त क्रमांक :- 963                                                                                   दिनांक :- 15 जुलै 2020 अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका) :   आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. शासनाने करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूचा जिल्ह्यातील वाढता प्रादूर्भाव पाहता यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने दोनच दिवसांपूर्वीच पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच महत्वाचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत सर्वांच्या विचारविनिमयाने जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करुन करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निश्चित झाले. त्यानुषंगाने   जिल्हाधिकारी   निधी चौधरी या