सरकारी कर्मचारी करोनावर मात करी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे प्रमुख मार्गदर्शन



अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- सध्या करोनाचे रुग्ण गावोगावी आढळून येत आहेत. तसेच अनेक सरकारी कर्मचारी देखील कोविड-19 पॉझिटिव्ह होत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. या वैश्विक संकटाच्या काळात सरकारी कर्मचारी स्वत:च्या आरोग्यापेक्षा नागरिकांचे आरोग्य आणि प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. आपले कर्तव्य बजावत असताना मानवतेच्या दृष्टीकोनातून अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत देखील करत आहेत.
पण यावेळी कोणती काळजी घ्यावी, कशा पध्दतीने आपली सेवा बजावावी, कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, समाजात असलेले गैरसमज कसे दूर करावे, करोना बद्दल योग्य माहिती कशी मिळवावी, याकरिता कोणाची मदत घ्यावी, इत्यादी विषय समजून घेण्याकरिता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,रायगड व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, मानस मैत्र हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.18 जुलै, रोजी सायंकाळी 5.00 वा. कार्यक्रमाची लिंक https://www.facebook.com/viveksathipanvel/ या फेसबुक लिंकवर "सरकारी कर्मचारी करोनावर मात करी" हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला आहे.
      यावेळी प्रमुख मार्गदर्शक  जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी या असणार आहेत. तर मानसोपचार तज्ञ डॉ.अनिल डोंगरे व डॉ.अमोल भुसारी हे संवादक असणार आहेत. या कार्यक्रमात सरकारी, कर्मचारी, शिक्षक व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदिप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष राकेश सावंत, परशुराम म्हात्रे कोषाध्यक्षा दर्शना पाटील यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक