Posts

Showing posts from November 25, 2018

गोवर रुबेला लसीकरण मोहि : जिल्ह्यात आजअखेर 1 लाख 60 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून मिझेल रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.   या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान शनिवार (दि.1 डिसेंबर)   अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 3   बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल दि.1 रोजी दिवसअखेर   जिल्ह्यातील 241 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 56 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 7 हजार 703 विद्यार्थ्यांना तर 185 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 16 हजार 38   विद्यार्थ्यांना अशा एकूण 23 हजार 741 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 12 हजार 235 मुले व 11 हजार 506 मुलींचा समावेश आहे.   तर आज अखेर एकूण 83 हजार 688 मुले   व 76 हजार 315 मुली   असे एकूण 1 लाख 60

महिला केंद्रीत आरोग्य-उपचार व्यवस्थेसाठी शासन कटीबद्ध- आरोग्यमंत्री ना. डॉ.सावंत

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1- कुटूंब व्यवस्था ही आपल्या देशाचा कणा आहे आणि महिला ही कुटूंब व्यवस्थेचा कणा आहे. महिलेचे आरोग्य उत्तम असेल तर पूर्ण कुटूंबाचे आरोग्य उत्तम असेल. म्हणून महाराष्ट्र शासनाने महिला केंद्रीत आरोग्य व उपचार व्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी पावले उचलली असून त्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री ना. डॉ. दीपक सावंत यांनी आज पनवेल येथे केले.  पनवेल येथे पनवेल महानगरपालिका आणि  प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पाऊल कर्करोग मुक्तीकडे’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ना. डॉ. सावंत बोलत होते.             पनवेल च्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आज सकाळी या अभियानाचे ना. डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  यावेळी  महापौर डॉ. कविता चौतमल, राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती  लीना गरड, मनपा आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संध्या बावनकुळे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, अजित गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ,

अपंग दिनानिमित्त सोमवारपासून मतदान जनजागृती

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका) - जागतिक अपंग दिन (दि.3 डिसेंबर) चे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहीर केले असून त्यानुसार अपंग घटकांतील मतदारांना निवडणूक प्रक्रिया सुलभ करावी यासाठी सोमवार दि.3 पासून सप्ताहभर मतदान विषयक जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी आज दिली. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय रविकिरण पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जी.एम.लेंडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी,   जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सिंधू घरत, अपंग संघटनेचे प्रमुख साईनाथ पवार, प्रिझम संस्थेच्या तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते. यावेळी निर्देश देण्यात आले की, दि.3 डिसेंबर रोजीच्या अपंग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम हा जिल्हास्तरीय अपंग मेळाव्यात घेण्यात येईल. हा कार्यक्रम भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, नीलिमा हॉटेलच्या मागे, श्रीबाग नं2 येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व अन्य मान्यवर उपस्थित रा

विधानसभा अध्यक्ष ना.हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा दौरा

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- विधानसभा अध्यक्ष ना.हरिभाऊ बागडे हे रविवार दि. 02 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.   त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-             रविवार दि. 2 रोजी सकाळी   साडे नऊ वा. पनवेल येथे आगमन व श्री. प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी राखीव, सकाळी 9 वा. 50 मि. नी   विरुपाक्ष मंगल कार्यालय, उद्घाटन समारंभास रवाना व सकाळी 10 वा. समारंभास उपस्थिती. स्थळ : रत्नाकर खेर मार्ग, अशोक बागेसमोर पनवेल.   सोईनुसार मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

10 डिसेंबर रोजी कोकण विभागीय लोकशाही दिन

             नवी मुंबई , दि. 0 1  :-  कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार    दि.10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह ,  पहिला मजला ,   कोकण भवन ,  नवी मुंबई-400 614 येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10.00 ते दु.1.00 पर्यंत जनतेच्या तक्रारी ,  गाऱ्हाणी ,  अडचणींबाबत अर्ज / निवेदने स्विकारणार आहेत.  निवेदन स्विकारण्यासाठी निकष             शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ दि.26 सप्टेंबर 2012 मधील नमुद तरतुदींनुसार लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी 15 दिवस अगोदर (22/11/2018 पर्यंत) या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेला असेल अशाच अर्जदारांचे गा-हाणे ऐकण्यात येईल. विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी

गोवर रुबेला लसीकरण मोहिम: जिल्ह्यात आजअखेर 1 लाख 36 हजार बालकांना लसीकरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून मिझेल रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवार दि.27 ते शुक्रवार (दि.30 नोव्हेंबर) अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 36 हजार 262 बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   हे अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक या दोन्ही आरोग्य यंत्रणांमार्फत अनुक्रमे ग्रामिण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या अलिबाग, उरण,पनवेल, महाड, कर्जत, पेण, रोहा, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली, माथेरान या शहरी भागाच्या कार्यक्षेत्रातील 1 लाख 87 हजार 378 इतक्या बालकांना तर ग्रामिण भागातील 6 लाख 6 हजार 206   बालकांना अशा एकूण 7 लाख 93 हजार 451 बालकांना एकूण 9640 लसीकरण सत्रात लसीकरण केले जाईल. पहिला टप्प्यात जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्य

सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.डॉ.दिपक सावंत यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. डॉ.दिपक सावंत हे शनिवार दिनांक 1 डिसेंबर रोजी   जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम   पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.1 डिसेंबर रोजी दुपारी दीड वा. फडके नाट्यगृह, पनवेल येथे आगमन व गर्भाशयमुख तथा ब्रेस्ट कॅन्सर मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती. दुपारी तीन वा. फडके नाट्यगृह पनवेल जि.रायगड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 0000

बारावीच्या विद्यार्थ्यांची जातवैधता पडताळणी; 31 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित होण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जात वैधता  प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी करणे,अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करणे इ.प्रक्रिया करण्यासाठी समितीस पुरेसा अवघी मिळणेसाठी महाविद्यालयांनी प्रत्येक वर्षी दि.31 डिसेंबर या तारखेपर्यंत समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपायुक्त् तथा सदस्य्, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विशाल नाईक, यांनी केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा अर्ज विहीत दिनांकापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह या समितीस प्राप्त होईल याबाबत सुचना द्यावी व अर्ज प्राप्त करुन घ्यावे. अनुसूचित जाती(SC) विमुक्त् जाती भटक्या जमाती,(VJNT) विशेष मागास प्रवर्ग(SBC) व इतर मागासवर्ग (OBC) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरअर्ज परिपूर्ण भर

केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गीते हे शनिवार दिनांक 1डिसेंबर रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.1 डिसेंबर रोजी सायं. सात वा. महाड एमआयडीसी जि.रायगड येथे आगमन. रविवार दि 2 डिसेंबर रोजी स.साडे नऊ वा.महाड एमआयडीसी जि.रायगड येथून म्हसळा कडे प्रयाण. स.11 वा.म्हसळा   जि.रायगड येथे आगमन. सायं. चार वा. म्हसळा जि. रायगड येथून अमरवन ता. अलिबाग कडे प्रयाण. सायं. सात वा. हॉटेल अमरवन अलिबाग येथे आगमन. रात्री नऊ वा.   हॉटेल अमरवन अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण.

आजपासून एचआयव्ही जनजागृती सप्ताहः एचआयव्ही जनजागृतीस रॅलीद्वारे प्रारंभ

Image
जागतिक   एड्स   नियंत्रण   दिन   व     सप्ताह      निमित्त   जिल्हा   रुग्णालयामध्ये   एचआयव्ही   एड्स   जनजागृतीपर   रॅलीचे   आयोजन   करण्यात   आले   होते.   या    रॅलीचे   उदघाटन   मा.   जिल्हा   शल्यचिकित्सक   डॉ.   अजित   गवळी, रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव जयदीप मोहिते (दिवाणी न्यायाधीश)   यांचे   हस्ते   हिरवा   झेंडा   दाखवून   करण्यात   आले.   यावेळी   जिल्हा   कार्यक्रम   व्यवस्थापक   श्री.   संजय   माने, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी   डॉ. पांडुरंग शिंदे,   डॉ.नालंदा पवनारकर, ॲड. निहा राऊत आदी मान्यवर   उपस्थित   होते.   रॅली   च्या   सुरुवातीला    जिल्हा   शल्यचिकित्सक   डॉ.   गवळी   यांनी   शपथ   घेतली   व   त्यानंतर   रॅली   मार्गस्थ   होऊन   महावीर   चौक,   छत्रपती शिवाजी   महाराज   चौक   बालाजी   नाका,   यामार्गे   पुन्हा    जिल्हा   सामान्य   रुग्णालय   प्रांगण   येथे   रॅलीचा   समारोप   करण्यात   आला.   या   रॅलीमध्ये   नर्सिंग   स्कू, पी.एन.पी. कॉलेज, जे.एस.एम. कॉलेज, चं.ह.केळुसकर होमिओपॅथिक कॉलेज   व   जा.र.ह.   कन्याशाळा   येथील   विद्यार्थिनी   व शिक्षक वृ