आजपासून एचआयव्ही जनजागृती सप्ताहः एचआयव्ही जनजागृतीस रॅलीद्वारे प्रारंभ

जागतिक एड्स नियंत्रण दिन   सप्ताह   निमित्त जिल्हा रुग्णालयामध्ये एचआयव्ही एड्स जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या  रॅलीचे उदघाटन मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव जयदीप मोहिते (दिवाणी न्यायाधीश) यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.  यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग शिंदे, डॉ.नालंदा पवनारकर, ॲड. निहा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
  रॅली च्या सुरुवातीला  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  गवळी यांनी शपथ घेतली  त्यानंतर रॅली मार्गस्थ होऊन  महावीर चौक,  छत्रपती शिवाजी महाराज चौक  बालाजी  नाका,  यामार्गे पुन्हा  जिल्हा सामान्य रुग्णालय  प्रांगण येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये नर्सिंग स्कू, पी.एन.पी. कॉलेज, जे.एस.एम. कॉलेज, चं.ह.केळुसकर होमिओपॅथिक कॉलेज   जा.र.ह.  कन्याशाळा येथील  विद्यार्थिनी व शिक्षक वृंद यांनी मोठ्या  संख्येने सहभाग घेतला.
 रॅली यशस्वी करण्याकरिता लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष  विजय वनगे, ॲड. निहा राऊत, उपाध्यक्ष  अभिजित पाटील, सेक्रेटरी निहा घरत,  बाबासाहेब चौगुले, ॲड.कला पाटील,  ऋषिकांत भगत,  स्वप्नील पाटील,  श्रीकांत पाटील, अभिजित कारभारी,  संदीप वाटवे,  संतोष साखरे,  जिल्हा एड्स प्रतिबंध  नियंत्रण विभागातील जिल्हा  आयसीटीसी पर्यवेक्षक  नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेखा  रवींद्र कदम,  जिल्हा सहाय्यक एम.ॲण्ड ई.  सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर, आयसीटीसी समुपदेशक श्रीम. अर्चना जाधव, कल्पना गाडे,  राजकुमार बिराजदार, दिप्ती चव्हाण,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे,  गणेश सुतार, विदुला नटे, एसटीडी समुपदेशक श्री. सुरेश वाळंज, रक्तपेढी  प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार,  एआरटीमधील  डेटा मॅनेजर सौ. कोमल लोखंडे,  स्टाफ नर्स पल्लवी पडवळ,  औषधनिर्माती सायली म्हात्रे,  सीसीसी को. आर्डिनेटर श्रीम. प्रेमा खंडागळे,  वाहनचालक महेश घाडगे,  किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील,  संकेतघरत तसेच  नर्सिंग स्कूल, पी.एन.पी. कॉलेज, जे.एस.एम. कॉलेज, चं.ह. केळुसकर होमिओपॅथिक कॉलेज  जा.र.ह. कन्याशाळा येथील विद्यार्थिनी  शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सप्ताहात जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ते या प्रमाणे-
1 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता बापूसाहेब नेने कॉलेज पेण येथे रॅली.   दुपारी चार वाजता चर्चासत्र आदर्श माध्यमिक विद्यामंदिर शहापूर.  दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत पथनाट्य स्पर्धा,पोस्टर प्रदर्शन क्रीडा संकुल नेहुली पी.एन.पी.कॉलेज जवळ, आईसी वाटप, लोककला सादरीकरण पी.एन.पी.कॉलेज वेश्वी व डापकू यांच्या संयुक्त विद्यमाने.  दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता चर्चासत्र आर.सी.एफ.कंपनी हॉस्पिटल कुरुळ.
  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांचे मार्फत या कार्यक्रमाच्या वेळी  एच.आय.व्ही. समुपदेशन व तपासणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, उपजिल्हा रुग्णालय माणगांव, पेण, कर्जत, रोहा, श्रीवर्धन तसेच ग्रामीण रुग्णालय महाड, उरण, पनवेल, कशेळे, पोलादपूर, चौक, मुरुड, नगरपालिका दवाखाना खोपोली व मोबाइल आयसीटीसी व्हॅन या आयसीटीसी केंद्रांमार्फत सुद्धा एच.आय.व्ही. एड्स विषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून एच.आय.व्ही. समुपदेशन व तपासणी करण्यात येणार आहे. 
         जिल्हा एड्स प्रतिबंध  व नियंत्रण विभाग   PNP कॉलेज  वेश्वी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल, नेहुली, PNP कॉलेज जवळ  या ठिकाणी विविध कॉलेजेस मधील NSS  व RRC ग्रुप यांचेमार्फत तसेच इच्छुक असणाऱ्या कॉलेजमधील युवक युवतींना पथनाट्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये विजेता ग्रुपकरिता प्रथम बक्षीस रु.1500/-, व्दितीय बक्षीस रु.1000/- व तृतीय बक्षीस रु.500/- असे देण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी माहिती, मार्गदर्शन व आईसीचे वाटप तसेच लोककला सादरीकरण करण्यात येणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक