Posts

Showing posts from January 31, 2021

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.05 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शनिवार, दि.06 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. अलिबाग येथे आगमन व जिल्हा नियेाजन समितीची बैठकीस उपस्थिती. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, दुपारी 1.30 वा. डोंगरी विभाग विकास समिती बैठकीस उपस्थिती. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, दुपारी 2.00 वा.राखीव. दुपारी 2.30 वा. काचली पिटकारी खारभूमी योजना ता.अलिबागबाबत बैठक, स्थळ : राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, दुपारी 3.00 वा. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प अंतर्गत नारवेल बेनवले खारभूमी योजना ता.पेण, रायगड नूतनीकरण कामाच्या अडचणीबाबत आढावा बैठक. स्थळ : राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, सायं.4.00 वा. शासकीय मूकबधीर विद्

रोहा जिल्हा परिषद गट क्र.41 वरसे व तळा तालुक्यातील पंचायत समिती 86 काकडशेत या निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकांसाठी मतदारयादी प्रसिध्दीचा कार्यक्रम जाहीर

  अलिबाग, जि.रायगड,दि.05 (जिमाका):-     मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.41 वरसे व तळा तालुक्यातील पंचायत समिती 86 काकडशेत या निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकांसाठी मतदारयादी प्रसिध्दीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर झाला असून तो पुढीलप्रमाणे- मतदारयादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 15 जानेवारी 2021, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारयादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीकरिता तयार केलेली मतदारयादी हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिध्दी करण्याचा दिनांक 18 फेब्रुवारी 2021, मतदारयादी संदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2021, निवडणूक विभाग/निर्वाचक गणाच्या छापील मतदारयाद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याचा दिनांक 05 मार्च 2021, निवडणूक विभाग/निर्वाचक गणाच्या छापील मतदारयाद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 05 मार्च 2021, मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मत

मध केंद्र योजनेच्या लाभासाठी पात्र व्यक्ती/संस्थानी अर्ज सादर करावेत

    अलिबाग, जि.रायगड,दि.05 (जिमाका):-     महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित आहे. याकरिता पात्र व्यक्ती/संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.               योजनेची वैशिष्ट्ये- मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष, छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता- वैयक्तिक मधपाळ, अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त. 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य. केंद्रचालक, प्रगतशिल मधपाळ -किमान 10 वी पास, वय 21 पेक्षा जास्त     अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन ,लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था- संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वाव

रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करोना लसीकरणाला प्रारंभ

  अलिबाग, जि.रायगड, दि.5 (जिमाका) :- उपजिल्हा रुग्णालय   रोहा येथे आज सकाळी राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकिता मते यांना करोनाची लस देऊन   या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.                यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ, मधुकर पाटील, विजयराव मोरे, महेंद्र गुजर, रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक किरण सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव,   वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकिता मते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सासणे, पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, अमित उकडे, रोहे अष्टमी नगरपरिषदेचे सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य विभागाचे   इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ००००००

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा येथे दि.07 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावेत

    अलिबाग, जि.रायगड,दि.04 (जिमाका):- सत्र 2020-21 मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागी प्रवेश मिळण्यासाठी दि.3 फेब्रुवारी 2021 पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी admission.dvet.gov.in लिंक पुन्हा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण प्रवेशोत्सुक उमेदवारांनी दि.07 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करुन फी भरुन अर्ज निश्चित करावा. प्रवेश प्रक्रिया दि.15 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा येथे भेट द्यावी. प्रवेश संकेतस्थळावर प्रवेशाबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा पी.एम.बिरार यांनी कळविले आहे. ०००००००

आदिवासींना अर्थाजनाचे कायमचे साधन उपलब्ध करुन देवून त्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी आदिवासी विकास व पशुसंवर्धन विभागाचे प्रयत्न विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील महिला बचतगटांना शेळी युनिट

  अलिबाग, जि.रायगड,दि.04 (जिमाका):-   शेळीपालनाच्या माध्यमातून महिला बचतगटांचे उत्पन्न वाढून बचतगटांचे बळकटीकरण करणे, त्यांचे स्थलांतर कमी करणे या कार्यक्रमांतर्गत त्यांना 10 शेळ्या व एक बोकड अशा स्वरुपाचे सहाय्य करण्यात येते. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील महिला बचतगटांना मोठे व कायमस्वरुपी आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होवू शकणार आहे. आदिवासी महिला बचतगटांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याने त्यांना कायम अर्थाजनाचे साधन उपलब्ध होवून, त्यांचे स्थलांतर देखील थांबू शकेल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी,आदिवासी विभाग, पेण व पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ.सुभाष म्हस्के यांनी दिली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी जनजातीसाठी विविध योजना राबविल्या जातात. आदिवासी बांधव मुख्यत्वे डोंगरमाथा, दऱ्याखोऱ्यात, अतिदूर्गम भागात वस्ती करून राहतात व त्यांची उपजीविका पावसावर आधारित शेती व तत्सम व्यवसाय तसेच वनउपज यावर अवलंबून असते. मुख्यत्वे ते पावसावर आधारित शेती करीत असल्यामुळे प्रत्येक वर्षी शेतीच्या माध्यमातून निश्चित उत्पन्न मिळेल याची हमी नसते. परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुंटूबासह

कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका):- राज्याचे   कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शुक्रवार दि.05 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8.30 वा. मोटारीने प्रभादेवी, मुंबई येथून ता.महाड, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह, महाड येथे आगमन व राखीव.   दुपारी 1.00 वा.   मोटारीने शासकीय विश्रामगृह, महाड येथून अरुण देशमुख यांच्या यशवंतनगर, विरेश्वर मंदिर येथील निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा. श्री.अरुण देशमुख यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 1.40 वा. मोटारीने यशवंतनगर, विरेश्वर मंदिर, महाड येथून नवी मुंबईकडे प्रयाण. सायं.5.40 वा. एनसीआरडी स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, प्लॉट नं.93/93 ए, सेक्टर 19, नेरुळ (पूर्व) नवी मुंबई येथे आगमन व राखीव. सोईनुसार मोटारीने मुंबईकडे प्रयाण. ०००००० ०

नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका):- राज्याचे  नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शनिवार दि.06 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2.00 वा. रत्नागिरी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. आर.सी.एफ.कुरुळ मैदान, हेलिपॅड, अलिबाग येथे आगमन व तेथून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन.   दुपारी 2.45 ते सायं.4.15 वा.रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास यंत्रणा कामांचा आढावा. (जिल्हाधिकारी, संबंधित मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी), स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड. सायं. 4.15 ते 4.30 वा. पत्रकार परिषद स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, सायं. 4.30 ते 5.00 वा.जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे राखीव. सायं. 5.00 वा. अलिबाग येथून मोटारीने आर.सी.एफ.कुरुळ मैदान, हेलिपॅडकडे प्रयाण.  सायं. 5.15 वा. आर.सी.एफ.कुरुळ मैदान, हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने ठाणेकडे प्रयाण

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन 2021 वर्षाकरिता स्थानिक सुट्टया जाहीर

    अलिबाग,जि.रायगड दि.03(जिमाका) :- जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व कार्यालयांकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक सुट्टया जाहीर केल्या असून त्या पुढीलप्रमाणे- मंगळवार, दि.14 सप्टेंबर 2021 गौरी विसर्जन, मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2021 महानवमी, मंगळवार, दि.02 नोव्हेंबर 2021 धनत्रयोदशी. ०००००००

गिधाड प्रकल्पांसाठी चिरगाव वन राखीव म्हणून घोषित पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झाला निर्णय

      अलिबाग,जि.रायगड दि.03(जिमाका) :-   गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून महाड येथील सिस्केप या पक्षी संवर्धन व    पर्यावरण क्षेत्रात काम   संस्थेच्या म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथील गिधाड संवर्धन प्रकल्पास आवश्यक असणारे संबंधित त्रेचाळीस हेक्टर वन शासनामार्फत आज राखीव करण्यात आल्याची घोषणा   पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीमध्ये   करण्यात आली.             गेल्या तेवीस वर्षांपासून सिस्केप संस्थेमार्फत पक्षीसंवर्धन व पर्यावरण क्षेत्रात रायगड जिल्ह्यात   विविध ठिकाणी कार्य सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून म्हसळा तालुक्यातील चिरगाव   या   चव्वेचाळीस हेक्टर वनामध्ये   गिधाड संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विविध सामाजिक संस्था व मान्यवरांच्या मदतीने अविरत सुरू आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने येथील सर्व गिधाडांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान संस्थेसमोर उभे राहिले होते   .                या निसर्ग चक्रीवादळामध्ये चिरगाव तालुका म्हसळा येथील वन पूर्णपणे ना

खार जमीन संशोधन केंद्रासाठी गिरणे (तळा) गावातील 47 हेक्टर जमीन हस्तांतरणाचे आदेश पारित

  अलिबाग,जि.रायगड दि.03(जिमाका) :- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली कार्यरत पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या पारगाव प्रक्षेत्राच्या जमिनीच्या मोबदल्यात तळा तालुक्यातील गिरणे गावातील 47 हेक्टर जमीन देण्‍याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी चौधरी यांनी जमीन हस्तांतरणाचे आदेश पारित केले आहेत. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या महत्वाच्या बाबीसाठी सतत पाठपुरावा केला होता.  खार जमीन संशोधन केंद्र पनवेल हे खार जमिनीवर संशोधन करणारे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र आहे. समुद्रालगतच्या खारवट जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि क्षार प्रतिकारक भात जातीच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत या कृषी संशोधन केंद्राची स्थापना सन 1943 मध्ये करण्यात आली. सन 1959 मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले.  हे संशोधन केंद्र डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत विद्यापीठ

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता 510 पदांना मंजूरी

  अलिबाग,जि.रायगड दि.03 (जिमाका) :- शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट - अ ते गट - क मधील नियमित 185 पदे व विद्यार्थी पदे 121 त्याचप्रमाणे गट-क ( बाह्यस्त्रोताने ) 139 पदे व गट- ड ( बाह्यस्त्रोताने ) 65 पदे अशी एकूण 510 व 4 टप्यात निर्माण करण्यास नुकतीच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे . मंजूर 510 पदांमध्ये गट - अ मध्ये एक अधिष्ठाता, 21 प्राध्यापक, 22 सहयोगी प्राध्यापक , एक मुख्य शासकीय अधिकारी अशा 45 पदांचा समावेश आहे . गट - ब मध्ये 46 सहाय्यक प्राध्यापक व एक प्रशासकीय अधिकारी अशा 47 पदांचा समावेश आहे. गट- क मध्ये एक ग्रंथपाल, एक सांख्यिकी सहाय्यक, दोन कार्यालयीन अधीक्षक, नऊ लघुलेखक, चार वैद्यकीय समाजसेवक, 15 वरिष्ठ सहाय्यक, एक रोखपाल, 9 प्रयोगशाळा वाहतूक तंत्रज्ञ, 2 सहाय्यक ग्रंथपाल, 13 वरिष्ठ लिपिक, एक लघुटंकलेखक, दोन भांडारपाल, 31 कनिष्ठ लिपिक, एक ग्रंथसूचीकार फोटो एक प्रक्षेपक अशा एकूण 93 पदांचा समावेश असून बाह्यस्त्रोताने हिसकावून भरती होणारी वर्ग -3 ची एकूण 139 तर वर्ग -4 ची एकूण 65 मंजूर करण्य

जिल्हा रुग्णालयात संपन्न झाले फायर सेफ्टी प्रशिक्षण

    अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :- येथील जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांच्या तसेच रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित कलेल्या सूचनांनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या सहकार्याने तसेच अग्निशामक प्राधिकरणाच्या मदतीने (दि.1 फेब्रुवारी) रोजी फायर सेफ्टीच्या अनुषंगाने अधिकारी- कर्मचाऱ्यांचे फायर सेफ्टी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या वेळी अग्निशामक प्राधिकरण तज्ज्ञांनी आगीचे प्रकार सांगून प्रत्यक्षात आग लागली असता ती आग कशा पध्दतीने विझवावी, याची शास्त्रशुध्द प्रात्यक्षिके त्यांच्या टीममार्फत करुन दाखविली. भंडारा जिल्ह्यासारखे प्रकरण या रुग्णालयात घडू नये, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी सांगितले. रुग्ण व रुग्णालयाच्या दृष्टीने फायर सेफ्टीबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले व अप्रत्यक्षरित्या आग लागल्यानंतर कसा बचाव करावा, याचे प्रात्यक्षिक करून उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आले. रुग्णालयाबरोबरच रुग्ण व त्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांचीही सुरक्षा

कोणतेही निवृत्ती वेतन घेत नसलेल्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवांना केंद्रीय सैनिक बोर्डामार्फत मिळणार पेन्युरी ग्रँटचा लाभ

  अलिबाग,जि.रायगड दि.02 (जिमाका) :- कें द्री य सैनिक बोर्ड , नवी दिल्ली यां च्या मार्फत 65 वर्षावरील कोणतेही निवृत्ती वेतन नसलेल्या व महाराष्ट्र / कें द्री य सरकार अथवा इतर कोणत्याही संस्थेकडून आर्थिक लाभ मिळत नसलेल्या    माजी सैनिक / माजी सैनिक विधवांना   (UP TO HAV किंवा नेव्ही , एअरफोर्सचे तत्सम पदधारक ) वार्षिक 48000/-( रक्कम रूपये अठठेचाळीस हजार मात्र ) देण्याची तरतूद आहे .   हा अर्ज   www.ksb.gov.in या संकेतस्थळावर संबंधित मू ळ दस्तावेजासह अपलोड   करावयाचा आहे .   आवश्यक असणारे दस्तावेज पुढील प्रमाणे - सेवापुस्तकाच्या सर्व पानांच्या सुस्पष्ट छायांकित प्रती , माजी सैनिक / माजी सैनिक विधवा ओळखपत्र , वयाचा पुरावा , एस . बी . आय . अथवा पी . एन . बी . बँकेच्या पहिल्या पानांची सुस्पष्ट छायांकित प्रत ( खाते नंबर व आय एफ सी कोडसह ), आधार कार्ड , गट विकास अधिकारी/तलाठी/ सरपंच यांच्या स्वाक्षरी व गोल रबरी शिक्क्यासह ना उत्पन्न प्रमाणपत्र (PENURY CERTIFICATE).             पू र्व मंजूर पेन्युरी ग्रँ ट माजी सैनिक

जिल्ह्यातील माणगाव,श्रीवर्धनसाठी उपलब्ध होणार फिरते पशूचिकित्सा पथक वाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचे यश

    अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :- पशूपालकांच्या दारापर्यंत पशूरुग्णांना पशूवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात “ मुख्यमंत्री पशूस्वास्थ योजना ” या राज्यस्तरीय योजनेंतर्गत राज्यातील 81 तालुक्यांमध्ये नवीन फिरती पशूचिकित्सा पथके स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.             सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध झालेल्या निधीमधून 71 वाहने उपलब्ध झाली आहेत. या वाहनांचे नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील माणगाव व श्रीवर्धन तालुक्यांसाठीही फिरते पशूचिकित्सालय पथक वाहन उपलब्ध होणार आहे. यामुळे या तालुक्यांमधील पशूपालकांच्या पशूरुग्णांना पशूवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. ०००००००

रस्ता सुरक्षा अभियान-2021 अंतर्गत श्रीवर्धन येथे दि.03 फेब्रुवारीला विशेष शिबिराचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :- रस्ता सुरक्षा अभियान-2021 अंतर्गत उप   प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण मार्फत दि.03 फेब्रुवारी 2021 रोजी श्रीवर्धन येथे विशेष शिबीर (कॅम्प) आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रस्ता सुरक्षा नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.             या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीकरिता ऑनलाईन अपॉईटमेंट घेणे बंधनकारक आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे. ००००००