मध केंद्र योजनेच्या लाभासाठी पात्र व्यक्ती/संस्थानी अर्ज सादर करावेत

 


 

अलिबाग, जि.रायगड,दि.05 (जिमाका):-   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित आहे. याकरिता पात्र व्यक्ती/संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

             योजनेची वैशिष्ट्ये- मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष, छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता- वैयक्तिक मधपाळ, अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त. 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य.

केंद्रचालक, प्रगतशिल मधपाळ -किमान 10 वी पास, वय 21 पेक्षा जास्त   अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन ,लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्था- संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ.फूट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमीन स्वमालकीची/भाड्याने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन, मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.

आग्या मधपाळ, प्रशिक्षण व संच किट वाटप - लाभार्थी पारंपारिक आग्या मध संकलन करणारा असावा, वय 18 ते 50 वर्षे, साक्षर असावा.

अटी व शर्ती- लाभार्थी निवड प्रकियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.  

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,जिल्हा उद्योग केंद्र रायगड बाजाराजवळ, अलिबाग, दूरध्वनी क्र. 02141- 222642 वर अथवा  मा.संचालक,मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला न.5.महाबळेश्वर,जि.सातारा दूरध्वनी क्र.02168-260264 येथे संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अलिबाग यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक