Posts

Showing posts from December 2, 2018

गोवर रुबेला लसीकरण मोहिमः जिल्ह्यात गुरुवारअखेर 2 लाख 66 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून मिझेल रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान या अभियानांतर्गत गुरुवार (दि.6 डिसेंबर)  अखेर जिल्ह्यातील 2 लाख 66 हजार 583  बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल दि.6 रोजी दिवसअखेर   जिल्ह्यातील 318 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 57 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 8 हजार 52 विद्यार्थ्यांना तर 261 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 18 हजार 531 विद्यार्थ्यांना अशा एकूण 26 हजार 583 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 14 हजार 361 मुले व 12 हजार 222 मुलींचा समावेश आहे.   तर आज अखेर एकूण 1 लाख 40 हजार 333 मुले   व 1 लाख 26   हजार 250 मुली असे एकूण

दादली व टोळ पुलावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7- सावित्री खाडीवरील दादली पूल व टोळ पूल कमकुवत झाल्याने त्यावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार या पुलावरून केवळ 20 मे. टन वाहतूक प्रति तास 20 कि.मी या वेगानेच करता येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले असून शासन राजपत्रही प्रकाशित झाले आहे. त्यानुसार, सावित्री खाडीवरील मांदाड तळा, इंदापूर, निजामपूर, पाचाड-महाड विसापूर रस्त्यामधील दादली पूल (लांबी 120.50 मीटर) तसेच वीर टोळ, आंबेत, बागमांडला रस्ता हा टोळ पूल (लांबी 158 मीटर) हे कमकुवत झाले आहेत असा अहवाल अधिक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवीमुंबई यांनी त्यांच्या कार्यालयीन पथक व क्षेत्रीय अधिकारी यांनी पाहणी अंती दिला आहे.  त्यानुसार या पुलांवरील अवजड वाहतूक बंद करुन फक्त 20 मे.टन पर्यंत वजनाची वाहतूक प्रति तास 20 मि.मी.इतक्या धिम्या गतीने वेगाने चालू ठेवण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांना सूचित केले  आहे.  याबाबत योग्य ती कार्यवाही करावे असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण या

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी कार्यक्रम 11 रोजी

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 - जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2018 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम मंगळवार दिनांक 11 रोजी सकाळी 11 वा. राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मेजर प्रांजळ प्र. जाधव (नि.), यांनी केले आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका)- केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे शुक्रवार दि.7 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा याप्रमाणे.             शुक्रवार दि. 7 रोजी   सायं. सहा वा. युके रिसॉर्ट हलगाव-खोपोली येथे पत्रकार परिषद.   सायं सात वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,समाजमंदिर रोड खोपोली येथे जाहीर सभेस संबोधन.   रात्री साडे आठ वा. खोपोली येथून मुंबईकडे प्रयाण.

विशेष लेखःदिव्यांगांच्या मतदान अधिकार अंमलबजावणीसाठी ‘सुलभ निवडणूका’

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहीर केले असून त्यानुसार अपंग घटकांतील मतदारांना निवडणूक प्रक्रिया सुलभ करावी यासाठी मतदान विषयक जनजागृती केली जात आहे. त्यानिमित्ताने दिव्यांग मतदारांनी आपल्या मतदान हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी काय करावे? या संदर्भात माहिती देणारा हा लेखः- दिव्यांग मतदारांना आपल्या अपंगत्वामुळे आपला मतदानाचा हक्क बजावण्यात कोणतीही अडचण येणार नाही, याविषयी निवडणूक आयोगामार्फत मोठ्याप्रमाणावर जनजागृती केली जात आहे.   दिव्यांगांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यापासून ते त्यांनी आपल्या नजिकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करे पर्यंत विविध सुलभता निवडणूक आयोग उपलब्ध करुन देत आहे. यासंदर्भात दिव्यांगांना हे करता येईल- मतदार यादीत नावनोंदणी- मतदार यादीत नोंद व्हावी याकरिता प्रथम फॉर्म क्र.6 भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.    हा फॉर्म भरुन त्यासोबत फोटो, ओळखपत्र, निवासस्थानाचा पुरावा अशी कागदपत्रे जोडणे आवश्यक असते. तुम्हाला योग्य सुविधा मिळावी म्हणून तुम्ही तुमच्या अपंगत्वाचा तपशील बाब (

राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाराष्ट्रातील उच्च न्यायालये व खंडपीठे, सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, इतर सर्व न्यायालये व न्यायाधिकरणे येथे   शनिवार दि.8 रोजी 'राष्ट्रीय लोक अदालत' आयोजित करण्यात आले आहे.   या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे,मोटार अपघात प्रकरणे,दिवाणी प्रकरणे,138 एन आय ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड,वीजवितरण,राष्ट्रीयकृत बॅंका आणि पतसंस्था यांचेकडिल थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे. तसेच या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा

कंत्राटी वाहन परवान्यासाठी 31 पर्यंत मुदत

         अलिबाग,जि.रायगड,दि.5(जिमाका)- ऑटोरिक्षा/ टॅक्सी नोंदणी केलेल्या वाहन मालकांनी कंत्राटी वाहन परवाना घेणे आवश्यक असून त्यांनी तो 31 डिसेंबर 2018 पर्यंत घ्यावा. अन्यथा अशा वाहनांवर कारवाई करुन त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करुन वाहने जप्त करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण जि. रायगड यांनी दिला आहे.

वाहन योग्यता प्रमाणपत्र आता 4.0 प्रणालीवर

         अलिबाग,जि.रायगड,दि.5(जिमाका)- परिवहन संवर्गातील सर्व वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व अन्य सर्व कामकाजासाठी परिवहन विभागात 1 जानेवारी 2019 पासून ऑनलाईन वाहन 4.0 या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. तरी सर्व वाहनधारकांनी आपल्या हस्तलिखित परवाने व अन्य नोंदींची कागदपत्रे सादर करुन सर्व नोंदी ऑनलाईन प्रणाली 4.0 वर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी केले आहे. परिवहन संवर्गातील ‘हस्तलिखित  अभिलेख’ असलेल्या सर्व वाहनधारकांनी ( ऑटोरिक्षासह)  त्यांच्या वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व वाहनाच्या अन्य कामकाजासाठी  प्रथम उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे येऊन वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सादर करावी व 4.0 प्रणालीवर आपल्या वाहनाची नोंद करुन घ्यावी. ही नोंद झाल्यानंतर कामकाजासाठी आवश्यक शुल्क व करवाहन 4.0 प्रणालीवर स्विकारण्यात येणार आहे. तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणीसाठीही रितसर आगाऊ वेळ घ्यावी, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी कळविले आहे.

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी; जिल्हा पोलीस दलाचे ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’

         अलिबाग,जि.रायगड,दि.5(जिमाका)- हरविलेल्या/पळवुन नेलेल्या 18 वर्षाखालील मुले मुलींच्या शोध घेण्यासाठी रायगड पोलीसांमार्फत ‘ ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र ’ ही मोहीम संपूर्ण डिसेंबर महिन्यात रायगड जि ल्ह्यात सर्व पेालीस ठा ण्यांच्या हद्दीत राबवि ली जा त आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी आपल्या जवळपासच्या परिसरातील बेवारस मुलांबाबत माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’ नियंत्रण कक्ष पोलीस अधिक्षक कार्यालय, अलिबाग जि. रायगड येथे कळवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे.              रायगड जिल्ह्यात सन 2000 ते 2018 या कालावधीत एकुण 23 बालके हरविलेली असुन ती अ द्याप पर्यंत मिळुन आलेली नाहीत . या बालकांचा शोध या मोहिमेत घेण्यात येणार आहे.   त्यासाठी इतर जि ल्हे व राज्यांशी समन्वय साधण्यात येत आहे . यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या हरविलेल्या बालकांचा शोध लावून त्यांना   त्यांच्या आई वडीलांपर्यंत पोहोचवि ण्यात येणार आहे.             ही मोहीम राबविताना जी मुले/मुली निवारा निवासस्थाने , रे

एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त पथनाट्यस्पर्धाः केळुस्कर होमिओपॅथी कॉलेज प्रथम, पीएनपी द्वितीय तर जा.र.ह.कन्या शाळा तृतीय

Image
अलिबाग,जि.रायगड,दि.5(जिमाका)- जागतिक   एड्स   नियंत्रण   दिन   व    जनजागृती सप्ताहनिमित्त मंगळवार (दि. 4 )रोजी   जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली   येथे आयोजित   पथनाट्य स्पर्धेत अलिबाग येथील चंद्रकांत हरी केळुसकर होमिओपॅथिक कॉलेजच्या संघाने प्रथम पारितोषिक, तर पीएनपी कॉलेज, वेश्वी ता. अलिबाग यांच्या संघाने व्दितीय   तर   जा.र.ह.   कन्याशाळा, अलिबाग या संघाने   तृतीय पारितोषिक पटकावले. जागतिक   एड्स   नियंत्रण   दिन   व    सप्ताहनिमित्त मंगळवारी जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली   येथे आयोजित    पथनाट्य स्पर्धेचे उदघाटन   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, रायगड   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव जयदीप मोहिते (दिवाणी न्यायाधीश),   मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा समनव्यक प्रा. डॉ. बाबासाहेब बिडवे   लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष   ला.श्री. विजय वनगे, पीएनपी कॉलेज प्राचार्य सौ. संजीवनी नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून   करण्यात आले . यावेळी    जिल्हा   एड्स   प्रतिबंध   व   नियंत्रण   विभाग   जिल्हा   कार्यक्रमव   व्यवस्थापक    संजय   माने,    ॲड.कला पाटील, प्रा. देवेंद्र केळुसकर, प्रा

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कोकण विभागीय पुरस्काराचे वितरण प्रथम पुरस्कार कुशेवाडा जि.सिंधुदूर्ग, द्वितीय पुरस्कार चांदोरे जि.रायगड आणि तृतीय पुरस्काराचे मानकरी पावणाई जि.सिंधुदूर्ग

Image
नवी मुंबई , दि. 0 4 :- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2017-18 अंतर्गत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा प्रथम पारितोषिक रु.10 लाख ग्रामपंचायत कुशेवाडा ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग, द्वितीय पारितोषिक रु.8 लाख ग्रामपंचायत चांदोरे ता.माणगांव जि.रायगड, तृतीय पारितोषिक रु.6 लाख ग्रामपचांयत पावणाई ता.देवगड जि.सिंधुदुर्ग, स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार (कुटूंब कल्याण) विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत नाखरे ता.रत्नागिरी जि.रत्नागिरी, स्व.वसंतराव नाईक पुरस्कार (पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन) विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत रोठ बुद्रुक ता.रोहा जि.रायगड, स्व.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत मांडे ता.पालघर जि.पालघर या ग्रामपंचायतींचा  स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन विभागीय कोकण महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, लोकांचे आरोग्य, जीवनस्तर उंचावण्यासाठ