Posts

Showing posts from July 31, 2022

जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाकरिताचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर व नोटीस बोर्डावर दि.05 ऑगस्ट पर्यंत होणार प्रसिद्ध

Image
  अलिबाग, दि.04 (जिमाका):-  राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्य पदाकरिताचे आरक्षण रहिवाशांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर व नोटीस बोर्डावर दि.05 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेश क्र. रानिआ/नप-2022/प्र.क्र. 02/का.6, दि.22 जुलै 2022 अन्वये राज्यातील 115 नगरपरिषदा व 9 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील वरील आदेशातील कार्यक्रमानुसार विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, कोकण भवन यांच्याकडील दि.04 ऑगस्ट 2022 रोजीच्या पत्रान्वये रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथ

“घरोघरी तिरंगा” अभियानाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी दि.08 ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन

  अलिबाग, दि.04 (जिमाका):-  स्वातंत्र्याच ्या  अमृत   महोत्सव ां तर्गत  “ हर घर तिरंगा ”  अर्थात  “ घरोघरी तिरंगा ”  अभियानाच ्या प्रचार-प्रसिद्धीसाठी रायगड जिल्हा परिषद, फिल्ड आऊटरिच ब्यूरो, अहमदनगर, नेहरू युवा केंद्र आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील   75 शाळांमधून 75 रॅली ं चे आयोजन  करण्यात येणार  आहे.  या  रॅलीमध्ये इयत्ता 8 वी ते 11 वी पर्यंतच ्या   विद्या र्थ्यांना  सहभागी  होता येणार आहे . स्वातंत्र्याच्या अमृत   महोत्सव ां तर्गत  दि.13 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात सर्वत्र  प्रत्येक घरावर तिरंगा  फडकविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात  “ हर घर तिरंगा ”  अर्थात  “ घरोघरी तिरंगा ”   या अभियानाविषयी  जनजागृती करण ्याकरिता या रॅलींचे आयोजन करण्यात येणार  आहे.  त्याचप्रमाणे   “ हर घर जल उत्सव ”  अभियान व  “ स्वच्छ सागर, सुरक्षित सागर ”   या अभियानांविषयीही   जनजागृती  करण्यात येणार  आहे. या रॅलीमध्ये   जास्तीत जास्त  नागरिक, माजी सैनिक, युवा मंडळ  व   शाळ ांनी  सहभागी व्हावे , असे आवाहन  जिल्हा परिषद ेचे   मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नागरिकांकरिता “तिरंगा” उपलब्ध

Image
“ घरोघरी तिरंगा ”  अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्याचे  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन अलिबाग, दि.04 (जिमाका):-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत दि.13 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात  “ हर घर तिरंगा ”  अर्थात  “ घरोघरी तिरंगा ”  हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातही हे अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल, नगरपालिका/नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी नागरिकांकरिता तिरंगा उपलब्ध होण्यासाठी विक्री केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातही नागरिकांकरिता तिरंगा उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांना प्रती ध्वज 30 रुपये याप्रमाणे तिरंगा उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या विक्री केंद्राचा लाभ घेत  “ हर घर तिरंगा ”  अर्थात  “ घरोघरी तिरंगा ”  हे अभियान जिल्ह्यात यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. 00000

मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) ला दिली भेट

Image
अलिबाग, दि.04 (जिमाका):- मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज मालदीव प्रजासत्ताकातील वरिष्ठ मान्यवरांसह भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) ला भेट दिली. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण चे अध्यक्ष भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्री.संजय सेठी यांनी मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. याप्रसंगी रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जेएनपीए चे उपाध्यक्ष श्री.उन्मेष शरद वाघ, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, उपायुक्त शिवराज पाटील, उपायुक्त पुरुषोत्तम कराड, उपायुक्त रुपाली अंबुरे, प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, मुख्याधिकारी संतोष माळी व जेएनपीए चे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना जेएनपीए चे अध्यक्ष श्री.संजय सेठी यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणमधील विविध प्रकल्पांची माहिती दिली. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) च्या नवीन विकासात्मक प्रक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत “घरोघरी तिरंगा” अभियानाच्या निमित्ताने “मिनी मॅरेथॉन” स्पर्धा संपन्न

Image
जवळपास तीनशे युवक-युवती व विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी                  अलिबाग, दि.04 (जिमाका):-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत   “ घरोघरी तिरंगा ”  अभियानाच्या निमित्ताने   जिल्हा क्रीडा परिषद, रायगड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड, नेहरु युवा केंद्र,रायगड, प्रिझम सामाजिक  विकास  संस्था, अलिबाग व रायगड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरेथॉन   स्पर्धा संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी 07.00 वा. या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये जवळपास तीनशे युवक-युवती व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.  या स्पर्धेची समाप्ती शहीद निलेश तुणतुणे यांचे सहाणगोठी येथील स्मारक  येथे करण्यात आली. समारोप कार्यक्रमावेळी शहीद निलेश तुणतुणे यांचे वडील नारायण तुणतुणे, आई सौ.निर्मला तुणतुणे, भाऊ शैलेश तुणतणे, सौ. ती तुणतुणे व इतर कुटुंबियांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तिरंगा झेंडा देवून सन्मान करण्यात आला.   या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-  मुलांचा गट प्रथम -  संदिप पाल, व्दितीय–राजेश तांबोळी, तृतीय– रामु पारधी , चौथा-

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  अलिबाग, दि.3 (जिमाका):-  क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी लेखाधिकारी देवेंद्र पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000

अनुसूचित जातीच्या नागरिकांकरिता महाप्रित मार्फत सुधारित निर्धूर चूलीचे होणार मोफत वाटप

Image
इच्छुकांनी दि.15 ऑगस्ट पर्यंत   अर्ज करण्याचे आवाहन   अलिबाग, दि.02 (जिमाका):-  राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या नागरिकांकरिता महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) यांच्यामार्फत पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूलीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या चुलींच्या वाटपासाठी निकषयोग्य रहिवाशांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.आर. म्हसकर यांनी केले आहे. या लाभाकरिता लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा, दारिद्र्यरेषेखालील असावा तसेच त्याच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन नसावे, हे पात्रतेचे निकष आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी दि.15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित (महाप्रित) चे प्रादेशिक व्यवस्थापक किंवा जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी सर्व तपशिलांसाठी  https://mahapreit.in  व  https://mpbcdc.maharashtra. gov.in  या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.आर. म्हसकर यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हा पशूसंवर्धन विभाग

  अलिबाग, दि.02 (जिमाका):-  जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खाजगी कुक्कुट व्यावसायिक पक्षीगृह व सधन कुक्कुट विकास गट, पेण येथील पक्षी मृत झाले असल्यामुळे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे यांच्यामार्फत एवियन इन्फ्लूएन्झा प्रयोगशाळा, भोपाळ येथे दि.27 व दि.28 जुलै 2022 रोजी नमुने पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा निकाल नकारात्मक आला असून पेण तालुक्यातील व जिल्ह्यातील कुक्कुट व्यावसायिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, जिल्ह्यात तसेच पेण तालुक्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव झालेला नाही, अशी माहिती जिल्हा पशूसंवर्धन विभागाने कळविली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 00000

मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह यांचा रायगड जिल्हा दौरा

Image
अलिबाग, दि.02 (जिमाका):-  मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह हे गुरुवार, दि.04 ऑगस्ट 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील जेएनपीटी येथे दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: सकाळी 10.30 वाजता राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह यांची जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे भेट. दुपारी 04.00 वाजता मालदिवचे राष्ट्रपती यांचे मुंबई विमानतळ येथून प्रयाण. 00000

म्हसळा तालुक्यातील मौजे सावर येथे होणार औषधी वनस्पती तसेच दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पतींची लागवड

  अलिबाग, दि.02 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील मौजे सावर येथील स.नं.24/2, क्षेत्र 3.12.00 हे.आर व स.नं. 26/8 क्षेत्र 1.34.00 हे.आर या जमिनीमध्ये तहसिलदार कार्यालय म्हसळा, वसंतराव नाईक महाविद्यालय म्हसळा व विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ व औषधी वनस्पती यांची लागवड करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध औषधी वनस्पती तसेच दुर्मिळ होत चाललेल्या विविध प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. हे उद्यान सर्व अभ्यासू विद्यार्थी व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे, असे म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी कळविले आहे. 00000

चेंढरे ग्रामपंचायत सभागृहात संवेदीकरण कार्यशाळा संपन्न

Image
  अलिबाग, दि.02 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय आयोजित एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना  “ एचआयव्ही एड्सच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी संवेदीकरण ”  कार्यशाळा ग्रुप ग्रामपंचायत चेंढरे येथील स्वर्गीय प्रभाकर नारायण पाटील सभागृह येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड अलिबागचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, रुपेश पाटील, पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, दीप्ती मोकल, उल्का कुलकर्णी, कल्पिता साळावकर, विनोदिनी मोकल, गीताई कटोर तसेच अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविका प्रशिक्षणासाठी उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी एड्स विषयी माहिती दिली. एड्सची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय, सामाजिक स्थान व आपले कर्तव्य काय आहे, एड्स वर नियंत्रण कसे करता येईल, याविषयी सखोल माहिती या क

काम करताना एकजूटीची भावना महत्वाची - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

Image
महसूल दिनाच्या निमित्ताने महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न अलिबाग, दि.02 (जिमाका):-  परिवारात काम करताना एकजूटीची भावना महत्वाची असून त्या भावनेतून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून कोणतेही काम यशस्वी होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी काल (दि.01 ऑगस्ट 2022) रोजी येथे केले. महसूल दिनाच्या निमित्ताने सोमवार, दि.01 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, सतीश कदम, ज्ञानदेव यादव यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील व महसूल विभागात