Posts

Showing posts from May 30, 2021

सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांचा  रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे- शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 06.00 वा. जेतवन शासकीय निवासस्थान, मुंबई येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. श्रीवर्धन येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व तौक्ते चक्रीवादळाच्या संदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठक. स्थळ: प्रांत अधिकारी कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.00 वा. शासकीय वाहनाने श्रीवर्धन येथून गिताबाग, सुतारवाडी, ता. रोहाकडे प्रयाण.  दुपारी 1.45 वा. गिताबाग सुतारवाडी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. सुतारवाडी रोहा येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण. 0000000

उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) मा.ना.श्री.अजित पवार यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे- शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 08.00 वा. गिताबाग, रोहा येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. श्रीवर्धन येथे आगमन. सकाळी 9.30 वा. श्रीवर्धन नगरपरिषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प व श्रीवर्धन बीच सुशोभिकरण भूमीपूजन सोहळा. सकाळी 10.30 वा.   रायगड जिल्हयातील कोविड-19 या रोगाच्या साथीच्या व तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचा आढावा. स्थळ: प्रांत अधिकारी कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.15 वा. श्रीवर्धन येथून मोटारीने प्रयाण गिताबाग, सुतारवाडी, ता. रोहा   येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. सुतारवाडी रोहा येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण. 0000000

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):- महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत आज (दि.3 जून) रोजी अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे HB, BP,ऑक्सिजन, व अँटीजन टेस्ट अशा विविध प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.     या शिबिराच्या माध्यमातून सुमारे 37 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.       यावेळी   गटाविकास अधिकारी सौ.दिप्ती पाटील, सहायक गटविकास अधिकारी श्री.चौलकर, श्री. मंगेश पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी, वाडगाव ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेविका, आरोग्य केंद्रातील डॉक्टर,स्टाफ सीआरपी ताई आणि प्रभाग समन्वयक अमोल माळी उपस्थित होते. 0000000

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीमध्ये स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Image
  अलिबाग,जि.रायगड, दि.2 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्रामध्ये अलिबाग गटविकास अधिकारी सौ. दीप्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला महासमृद्धी अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांसाठी काल (दि. 02 जून) रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात उपस्थित महिलांची ऑक्सिजन लेवल, रक्तदाब आणि अॅंटीजेन तपासणी करण्यात आली.   यावेळी ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिराकरिता ग्रामपंचायत शहापूर सरपंच महेंद्र कृष्णा पाटील, आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता युगेश पाटील, आरोग्य सेविका समिधा संतोष खोत, आरोग्य सेवक के. एस. झेमसे तसेच आशा सेविका, सीआरपी विजया सतीश भगत, ग्रामसंघ अध्यक्ष मंदा नंदकुमार पाटील आणि   प्रभाग समन्वयक साईनाथ पाटील उपस्थित होते. ००००००००

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे- गुरुवार दि.03 जून 2021 रोजी सोईनुसार मुंबई येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.             शुक्रवार, दि.04 जून 2021 रोजी सकाळी 08.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून मा.उपमुख्यमंत्री अजित पवार   यांच्यासमवेत श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन व मा.उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत श्रीवर्धन नगरपरिषद आयोजित पाणीपुरवठा योजना व श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामाचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. मा.उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत तौक्ते चक्रीवादळ, कोविड-19 व नगरपरिषद विकासकामांच्या   आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ : उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, श्रीवर्धन. सकाळी 11.30 वा. पत्रकार परिषद, स्थळ : उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.00 वा. श्रीवर्धन येथून शासकीय

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.39 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 40.94   मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.               आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 0.00 मि.मी., पेण- 28.00 मि.मी., मुरुड- 0.00 मि.मी., पनवेल- 12.60 मि.मी., उरण- 0.00 मि.मी., कर्जत- 11.60 मि.मी., खालापूर- 18.00 मि.मी., माणगाव- 6.00 मि.मी., रोहा-16.00 मि.मी., सुधागड-12.0 मि.मी., तळा- 8.0 मि.मी., महाड-4.0 मि.मी., पोलादपूर- 1.00 मि.मी, म्हसळा- 1.00 मि.मी., श्रीवर्धन- 0.0 मि.मी., माथेरान- 64.00 मि.मी.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 182.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 11.39 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 1.30 टक्के इतकी आहे. 00000  

केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयांतर्गत “संवेदना” दूरध्वनीद्वारे कोविड-19 मुळे प्रभावित मुलांना समुपदेशन 1800-121-2830 या टोल फ्री क्रमांकावरुन कोविड-19 मुळे तणावग्रस्त असलेल्या मुलांना दिला जातो मानसिक आधार

    अलिबाग,जि.रायगड, दि.2 (जिमाका) : कोविड-19 मुळे प्रभावित   मुलांना मानसिक प्रथमोपचार आणि भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) संवेदना   (भावनिक विकासाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत   संवेदनशील कृती) दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जात आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ही एक वैधानिक संस्था असून महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारीत कार्यरत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात पीडित मुलांसाठी मनोवैज्ञानिक -सामाजिक मानसिक आधार देण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. कोविड - 19 संदर्भात विविध मनोविकार विषयक मुद्द्यांना बालक आणि किशोरवयीन मानसोपचार विभागाचे प्रा.डॉ.शेखर शेषाद्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित पात्र तज्ञ/समुपदेशक/मानसशास्त्रज्ञांच्या नेटवर्कद्वारे दूरध्वनीवरून हे समुपदेशन दिले जात आहे. महामारीच्या संकटात तणाव, चिंता, भीती आणि इतर समस्या सोडवण्यासाठी मुलांना मानसिक आधार देणारी संवेदना ही समुपदेशन सेवा   आहे. ही सेवा टोल-फ्री क्रमांक: 1800-121-2830 वर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 वा

करोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृतीदल कार्यान्वित चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 या क्रमांकावर माहिती देण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन

  अलिबाग,जि.रायगड, दि.2 (जिमाका):   करोनामुळे निधन झाल्यानंतर त्या पालकांवर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल (Task Force) स्थापित करण्यात आले  आहे.       जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हे कृतीदल कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहणार आहे.   करोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेने जिल्हा प्रशासनाला तात्काळ द्यावी. निराधार बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार असून निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून या बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येवून त्या बालकास बालगृहात दाखल करून घेण्यात येणार आहे. यासाठी करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अशा कोणत्याही बालकास किंवा अशा बालकाची ज्या व्यक्तीस माहिती आहे अशा व्यक्तीस चाईल्ड हेल्पलाईन क्र.1098 यावर सुध्दा संपर्क साधता येईल. करोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाले

सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम घोषित

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय , नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व   परिचालन या   प्रशिक्षणाच्या   दि . 01 जुलै 2021 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र , रायगड - अलिबाग येथे सुरु होणा ऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.29 जून 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणां तर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या, 63.35 टनेज क्षमतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते.   त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे - प्रशिक्षण कालावधी 01 जुलै -2021 ते 31 डिसेंबर 2021 ( 6 महिने ) आवश्यक   पात्रता :- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे, ( आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशील मच्छिमार

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत आज (दि.2 जून) रोजी अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे HB, BP,ऑक्सिजन, व अँटीजन टेस्ट आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून सुमारे 50 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी CRP व प्रभाग समनव्यक गणेश म्हस्के उपस्थित होते. शिबिरासाठी गट विकास अधिकारी यांनी विशेष प्रोत्साहन दिले. तसेच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांनी सहभाग नोंदविला, अशी माहिती अलिबाग तालुका व्यवस्थापक श्रीमती शितल माळी यांनी दिली आहे. ०००००००००  

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची संचालक मंडळची बैठक दि.01 जून 2021 रोजी संपन्न झाली. या बैठकीत पुढील प्रमाणे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सारथी संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डा मधील सी.स.नं.173/1ब मधील 4163 चौ.मी जमीन मुख्य रस्त्यालगत मिळाली आहे. तसेच संस्थेस 41 अधिकारी/कर्मचाऱ्यांचा स्टाफ महाराष्ट्र शासनाने दि. 04 मे 2021 रोजी मंजूर केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विशेष अभिनंदनाचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला. सारथी संस्थेमार्फत एम.फील/पीएच.डीकरिता “ छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण 207 विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच 34 अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एक अधिकची संधी देण्याचे ठरले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब

बोगस नियुक्ती पत्रांना बळी न पडण्याचे रत्नागिरी पर्यटन महामंडळाचे आवाहन

      अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- कोणीतरी अज्ञात व्यक्ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोगस लेटर हेडचा व शिक्क्याचा वापर करुन काही उमेदवारांना नोकरी बाबतची नियुक्ती पत्रे देत असल्याची बातमी दिसून आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कोकण विभाग यांच्यामार्फत कोणत्याही पध्दतीची नोकर भरती जाहिरात प्रसिध्द केली नाही व कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती देखील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कोकण विभागाकडून केलेली नाही. अज्ञातामार्फत गरजू उमेदवारांना गाठून अशा बोगस नियुक्ती पत्राआधारे गरजू उमेदवारांची आर्थिक व मानसिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा बोगस नियुक्तीपत्रांना व जाहिरातींना बळी  पडू नये. ज्या उमेदवारांची फसवणूक झाली असेल त्यांनी संबंधिताविरुध्द तक्रार दाखल करावी व याबाबत काही आवश्यक माहिती हवी असल्यास प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी कोकण विभाग, जिल्हधिकारी कार्यालय आवार, ए विंग, पहिला मजला, जयस्तंभ, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रा.का. रत्नागिरी (कोकण वि

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

    अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्याबाबत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडून कळविण्यात आल्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पूर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधीश, वकील (सनद प्राप्त), चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडून इच्छुकांचे अर्ज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग कार्यालयाकडून मागविण्यात आले आहेत. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात दि.18 जून 2021   पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. संबंधितांनी अर्जासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा,शैक्षणिक संबंधित कागदपत्रे (पदवी प्रमा

मुरुड तालुक्यातील खारआंबोली येथील हरविलेली व्यक्ती दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ मुरुड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- मुरुड तालुक्यातील रा.खारआंबोली येथील म

  नोज दामेदर कमाने, (मो.नं. 9273501242) वय-48 वर्ष, धंदा शेती यांचा मुलगा महेश मनोज कमाने, वय 27 वर्षे, हा दि. 07 मार्च 2021 पासून मौजे खारआंबोली येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरातून शेतावर जातो, असे सांगून कोठेतरी निघून गेला असून तो आजपर्यंत घरी परत आलेला नाही, अशी तक्रार त्यांच्या वडिलांनी दि.09 मार्च 2021 रोजी मुरुड पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे. बेपत्ता असलेले महेश मनोज कमाने यांचे वर्णन पुढीलप्रमाणे– महेश मनोज कमाने, वय 27 वर्ष, रंग सावळा, अंगाने सडपातळ, उंची 05 फूट 05 इंच, केस बारीक, डोळे काळे, काळया रंगाची हाफ पॅन्ट, तपकिरी रंगाचा फूल बाहयाचा शर्ट, सफेद रंगाची गोल टोपी, काळया रंगाची स्लीपर, मिशी दाढी नाही, बोली भाषा मराठी. या इसमाचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तरी हा बेपत्ता इसम कोणालाही दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ मुरुड पोलीस ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 02144-274033, ई-मेल आयडी ps.murud.rd@mahapolice.gov.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुरुड पोलीस ठाणे व्ही.व्ही.आंबेतकर यांनी केले आहे. ००००००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 19 मि.मी. पावसाची झाली नोंद

  वृत्त क्र.482                                                                           दि.02 जून, 2021 अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका)-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.80 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 472.80 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.               आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 0.00 मि.मी., पेण- 0.00 मि.मी., मुरुड- 28.00 मि.मी., पनवेल- 4.06 मि.मी., उरण- 0.00 मि.मी., कर्जत- 0.0 मि.मी., खालापूर- 0.0 मि.मी., माणगाव- 8.0 मि.मी., रोहा- 21.0 मि.मी., सुधागड- 0.0 मि.मी., तळा- 61.0 मि.मी., महाड- 10.0 मि.मी., पोलादपूर- 54.00 मि.मी, म्हसळा- 39.00 मि.मी., श्रीवर्धन- 10.0 मि.मी., माथेरान- 81.2 मि.मी.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 316.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 19.80 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 0.94 टक्के इतकी आहे. 00000