मुरुड तालुक्यातील खारआंबोली येथील हरविलेली व्यक्ती दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ मुरुड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- मुरुड तालुक्यातील रा.खारआंबोली येथील म

 

नोज दामेदर कमाने, (मो.नं. 9273501242) वय-48 वर्ष, धंदा शेती यांचा मुलगा महेश मनोज कमाने, वय 27 वर्षे, हा दि. 07 मार्च 2021 पासून मौजे खारआंबोली येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरातून शेतावर जातो, असे सांगून कोठेतरी निघून गेला असून तो आजपर्यंत घरी परत आलेला नाही, अशी तक्रार त्यांच्या वडिलांनी दि.09 मार्च 2021 रोजी मुरुड पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे.

बेपत्ता असलेले महेश मनोज कमाने यांचे वर्णन पुढीलप्रमाणे– महेश मनोज कमाने, वय 27 वर्ष, रंग सावळा, अंगाने सडपातळ, उंची 05 फूट 05 इंच, केस बारीक, डोळे काळे, काळया रंगाची हाफ पॅन्ट, तपकिरी रंगाचा फूल बाहयाचा शर्ट, सफेद रंगाची गोल टोपी, काळया रंगाची स्लीपर, मिशी दाढी नाही, बोली भाषा मराठी.

या इसमाचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तरी हा बेपत्ता इसम कोणालाही दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ मुरुड पोलीस ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 02144-274033, ई-मेल आयडी ps.murud.rd@mahapolice.gov.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुरुड पोलीस ठाणे व्ही.व्ही.आंबेतकर यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक