Posts

Showing posts from April 25, 2021

शेतीसंबंधी वाहने, मान्सूनपूर्व कामे व वैद्यकीय कामांसाठी वापरली जाणारी वाहने व त्यासंबंधीच्या उपकरण दुरुस्ती कामांची सेवा/ दुकाने/प्लांट सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी मात्र सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेतच

    अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका) : राज्यात वाढत्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आदेश जारी करण्यात आलेले आहेत.        शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणारी तसेच खाजगी प्रकारची मान्सूनपूर्व कामे करण्याची व शेतीसाठी आवश्यक असणारे ट्रॅक्टर, टिल्लर व इतर शेती विषयक उपकरणे तसेच कोविड विषाणूचा प्रादूर्भावाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वाहनांची तसेच ऑक्सिजन वाहन करणारी वाहने व अनुषंगिक उपकरणांची दुरुस्तीची आवश्यकता भासत आहे.            याशिवाय सद्य:स्थितीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदी   आदेशामुळे आपत्कालीन परिस्थितीत शेतीसंबंधी वाहने, मान्सूनपूर्व कामे व वैद्यकीय कामांसाठी वापरली जाणारी वाहने तसेच उपकरणांच्या दुरुस्तीची कामे विचारात घेता काही सेवा/ दुकाने/प्लांट सुरु ठेवणे आवश्यक आहे.       या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मान्सूनपूर्व कामे, शेतीसाठी आवश्यक असणारे व वैद्यकीय सुवि

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

Image
  अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे   यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.         या ध्वजारोहण समारंभाला अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार श्री.सचिन शेजाळ, तहसिलदार श्री.सतिश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मोजकेच कर्मचारी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत उपस्थित होते.               या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या रायगडवासियांना शुभेच्छा दिल्या व   करोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला.                करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे व करोना प्रतिबं

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका) :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.   यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रवींद्र मठपती, तहसिलदार सतीश कदम   तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 0000000

भविष्याच्या सुरक्षिततेसाठी करू पाण्याची बचत ”

  विशेष लेख क्र.26                                                        दिनांक :- 29 एप्रिल 2021   “   मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून पाणी व मानवी जीवन यांचा अतूट सांधा संस्कृती संवर्धक म्हणून सन्मानित झालेला वारसा आहे. पाण्यामुळेच मानवी संस्कृती अधिक समृद्ध व संपन्न झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये निसर्गाचा लहरीपणा, काही ठिकाणी अति पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळाची दाहकता अशा विचित्र परिस्थितीमध्ये पाण्याची बचत करून भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व स्तरावरील व्यक्तींनी सर्वकाळ प्रयत्न केले तरच पाण्याच्या भीषण टंचाईवर मात करणे शक्य आहे.   पाण्याचे महत्व :- पाणी हे जीवन आहे. पाणी अमृत आहे.   तसेच ते धरतीचा आत्मा आहे. पाण्यामुळेच राष्ट्राची प्रगती होणार आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती सुद्धा पाण्याने होत असल्याने त्या पाण्याचे रक्षण करणे, जतन करणे,   संवर्धन करणे, पुनर्भरण करणे व ते स्वच्छ शुद्ध ठेवणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.   पाणी द्रव, वायू अथवा घन असे कोणत्याही रूपात असले तरी पाणी ही एक महाशक्ती आहे. आत्ता आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी जल

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

    अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका) :- राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.   याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री , शंभूराज देसाई, उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालकचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालया व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.   राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढ-उताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे.   हे निर्देशांक राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक

लॉकडाऊन कालावधीमध्ये गरजू व्यक्तींना कायदेशीर सल्ला व सहाय्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मदत कक्षाची स्थापना

  वृत्त क्रमांक:- 320                                                               दिनांक:- 29 एप्रिल 2021 अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या पत्रानुसार लॉकडाउन कालावधीत गरजू व्यक्तींना कायदेशीर सल्ला व सहाय्य मिळण्यासाठी मदत कक्ष निर्माण करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या वतीने जिल्ह्यातील तीन सत्र विभागांमध्ये (Sessions Division) गरजू, पीडित व्यक्तींना भ्रमणध्वनी /व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी किंवा कायदेशीर सल्ला व सहाय्य देण्यासाठी महिला व पुरुष वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. अलिबाग सत्र विभागाकरिता :- ॲड.जयंत चेऊलकर, मो.9822502011, ॲड. श्रीमती शिल्पा नागेश पाटील मो. 94233775015/8698775015, ॲड. श्रीमती तनुष्का तुषार पेडणेकर मो. 7057881666/7083818666.   पनवेल सत्र विभागाकरिता :- ॲड.मनोहर पाटील, मो.9869056906, ॲड. विशाल ए. मुंडकर मो.9221777604.   माणगाव सत्र विभागाकरिता :- ॲड. श्रीमती एस. एस. मराठे, मो.94238

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवांरासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

  वृत्त क्रमांक:- 318                                                                 दिनांक:- 28 एप्रिल 2021   अलिबाग,जि.रायगड, दि.28 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व जिल्हा महिला व बाल विकास   अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.   या वेबिनारमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या योजनांसंदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीमती उज्वला   पाटील या मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी CISCO WEBEX   हे ॲप गुगल प्ले-स्टोअर वरुन डाऊनलोड करावे. नंतर Join from the meeting link https://mhdit.webex.com/mhdit/j.php? MTID=m 9896f 1c 3b db 281 c 9 f 3a 893175e525483   Meeting   ID : 184 609 1294, Meeting password:   123456   या लिंकचा वापर करुन दि. 30 एप्रिल 2021 रोजी दुपारी   12.00   पूर्वी 10 मिनिटे अगोदर कनेक्ट व्हावे. सहभागी व्यक्तींनी कनेक्ट होताना आपले माईक व व्हिडिओ म्यूट/बंद ठेवावेत. आपणास प्रश्न विचारावयाचा अस

45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या 3 टँकरसह "ऑक्सिजन एक्सप्रेस" कळंबोलीमध्ये दाखल

  वृत्त क्रमांक:- 317                                                                 दिनांक:- 26 एप्रिल 2021     अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका):- राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे.   या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास 45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या 3 टँकरसह ही "ऑक्सिजन एक्सप्रेस" कळंबोली येथे दाखल झाली.   विशाखापट्टणम् येथून वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेल मधील कळंबोली येथून 10 ट्रकची "ऑक्सिजन एक्स्प्रेस" परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.19 एप्रिल 2021 रोजी रवाना करण्यात आली होती. आज ही "ऑक्सिजन एक्सप्रेस" कळंबोलीमध्ये दाखल झाल्यामुळे कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.     काल सायंकाळी 6.00 वाजता जामनगर येथून निघालेली ही एक्सप्रेस आज सकाळी 11.30 च्या सुमारास कळंबोली रेल्वे स्थानकात दाखल झाली.   जामनगर येथून निघालेल्या या "ऑक्सिजन एक्सप्रेस" मधील 10 टँकरपैकी 3 टँकर हे नागपूर येथे,