भविष्याच्या सुरक्षिततेसाठी करू पाण्याची बचत ”

 

विशेष लेख क्र.26                                                       दिनांक :- 29 एप्रिल 2021

 

 

मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून पाणी व मानवी जीवन यांचा अतूट सांधा संस्कृती संवर्धक म्हणून सन्मानित झालेला वारसा आहे. पाण्यामुळेच मानवी संस्कृती अधिक समृद्ध व संपन्न झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये निसर्गाचा लहरीपणा, काही ठिकाणी अति पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळाची दाहकता अशा विचित्र परिस्थितीमध्ये पाण्याची बचत करून भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व स्तरावरील व्यक्तींनी सर्वकाळ प्रयत्न केले तरच पाण्याच्या भीषण टंचाईवर मात करणे शक्य आहे.

 पाण्याचे महत्व :- पाणी हे जीवन आहे. पाणी अमृत आहे.  तसेच ते धरतीचा आत्मा आहे. पाण्यामुळेच राष्ट्राची प्रगती होणार आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती सुद्धा पाण्याने होत असल्याने त्या पाण्याचे रक्षण करणे, जतन करणे,  संवर्धन करणे, पुनर्भरण करणे व ते स्वच्छ शुद्ध ठेवणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.  पाणी द्रव, वायू अथवा घन असे कोणत्याही रूपात असले तरी पाणी ही एक महाशक्ती आहे. आत्ता आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी जल संपत्तीच्या संवर्धनासाठी जिथे आपण आहोत तिथून जाणीवपूर्वक कृतीशील प्रयत्न करू या व पाण्याविषयी आदराची भावना जोपासू या.

 पाणी बचतीचे पर्याय व घटक :-

v  कौटुंबिक स्तरावर पन्हाळी व पागोळ्यातील पाणी वापरणे.

v   पाणी शिळे नसते, ते कधीही फेकून देऊ नये.

v   घरात तोटीचा माठ वापरावा.

v   घरगुती नळ कनेक्शनला वॉटर मीटर बसवावे.

v   गाड्या धुताना स्प्रे पाईप ऐवजी ओले कापड वापरावे.

v   गळक्या नळाची दुरुस्ती व पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

v   ठिबक व तुषार सिंचनाचा पिकांसाठी वापर करावा.

v   पावसाच्या पाण्याचे संकलन करावे.

v   वनराई बंधाऱ्याच्या बांधकामातून पाणीसाठवण करणे.

v  विहिरीचे पुर्नभरण करणे.

v   मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे.

Ø  कारखान्यातील सांडपाण्याचा पुर्नवापर करावा.

Ø  अंघोळीसाठी, दात घासताना, दाढी करताना, तोंड धुताना सतत नळ चालू ठेवू नका.

Ø   घरातील व परिसरातील नळांना तोट्या नसतील तर लगेच बसवून गळती थांबवा,

Ø   सांडपाण्यावर फळबागा, परसबागा, फुलबागा फुलविणे.

Ø  नद्यांच्या व  तळ्यातील गाळ काढावा. या क्रमानुसार पाणी वापराचे अधिकृत धोरण हवे.

 जलसाक्षरतेतून समृद्धीकडे :-

ü  खरे म्हणजे जलसाक्षर समाजच पाण्याच्या बचतीसाठी पुढाकार घेईल. जलसाक्षरता ही केवळ व्यक्तीची अथवा विभागाची मर्यादित न राहता देशातील प्रत्येक राष्ट्रप्रेमी व पर्यावरणप्रेमी माणसांची ही जीवनशैलीच असावी.

ü   जलसाक्षरतेची चळवळ जनमानसात रुजविण्यासाठी तशी शिस्त लावण्यासाठी व माणसांची मनोवृत्ती तशी होण्यासाठी काही कडक नियम देखील बनवले पाहिजेत तरच ती तशी कृती होईल.

ü  आपला देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी, देशातील नद्या बारमाही वाहत्या राहण्यासाठी जलसाक्षरतेची चळवळ अधिक व्यापक व्हावी यातच व्यक्ती व समाजाचे आणि देशाचे हित आहे.

ü   युवक-युवती व नव्या पिढीने, तरुणाईने हे देश कार्य समजून नेटाने वाटचाल केल्यास पाणीटंचाई नष्ट होऊन समृद्धीची पहाट येईल.

 

 

 

 पाण्याचा अतिवापर टाळा, पाणी काटकसरीने वापर असा संदेश करून उपयोग नाही. तापमानवाढीच्या झळांपासून संरक्षणासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे व जिरवणे आवश्यक आहे. पाणी दूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.  पाणी वाचविण्याचे सर्व उपाय हे आपल्यापासून सुरू होतात याची जाणीव ठेवावी. वापरलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंबाला कष्ट व किंमत लागते हे लक्षात ठेवून पाणी काटकसरीने वापरावे. पाणी वाचविण्यासाठी सवय लावावी अशाने फार मोठा बदल होऊ शकतो.

आपल्या जलचक्रानुसार पाणी मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आकाशातून पडणारा पाऊस.  पाऊस पाणी साठविणे, पर्जन्यजलाचा साठा करून त्याचा पुर्नवापर करावा. पाऊस मुबलक असताना जलसंचय करून पाऊस नसताना उपलब्ध पाणी याचा वापर करणे काळाची गरज आहे.  

रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) संजय वेंगुर्लेकर व सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी हे जलसंवर्धनासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्नशील आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना सर्वांनी मिळून कृतीशील साथ देणे, हे सर्वांचे कर्तव्यच आहे. 

 चला…पाणी बचतीसाठी कटिबद्ध होऊ या

 भारत भूमीला सुजलाम् सुफलाम् करू या

 

 

       लेखन :-                                                                                                             संपादन :-                                                                                                          

श्री.सुरेश राजाराम पाटील                                                                                      मनोज शिवाजी सानप                                                                                  

माहिती शिक्षण व संवादतज्ज्ञ, जिल्हा परिषद, रायगड                                            जिल्हा माहिती अधिकारी,                                       

(मो.क्र :-9881712585)                                                                                  रायगड-अलिबाग

 

000000

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक