Posts

Showing posts from March 17, 2019

लोकसभा निवडणूक २०१९ नियम भंग करणाऱ्या प्रिंटर्सला सहा महिन्यांची शिक्षा उमेदवार, मुद्रणालयांच्या चालक मालकांनी सहकार्य करावे

अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका)- :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतेही मुद्रण साहित्य व फ्लेक्स लावताना निवडणूक काळामध्ये घ्यावयाच्या काळजीचे व कायद्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सवर सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधितांनी या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे कार्यात कायदेशीर तरतूदीचे पालन करुन   निवडणूक कामाला सहकार्य करावे असे आवाहन रायगडचे   जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी   डॉ विजय सूर्यवंशी   यांनी केले आहे. वरील कलमाच्या कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्यास सहा महिन्यांपर्यंत शिक्षा असू शकेल इतक्या कारावासाची किंवा दोन हजार रुपयाप र्यं त दंडाची अथवा या दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल. त्यामुळे राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार व मुद्रणालयांच्या चालक मालकांनी यांची नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.                        लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 127-अ आणि त्याव्दारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसि द्धी वर निर्बंध घालण्यात आले आहेत यांच्याकडे सर्व

आचारसंहिता भंग होणार नाही हे पथकांनी काटेकोरपणे पाहावे कुचराई झाल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कारवाई - अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे

Image
रायगड   दि १७: लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन ही जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही हेत्यांनी काळजीपूर्वक पाहावे   यात कसूर केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे अतिरिक्त जिल्हाधिकारी व आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे प्रमुख भरत शितोळे यांनी आज सांगितले. ते आज आरसीएफ कम्युनिटी हॉल येथे विविध मतदार संघ निहाय स्थापन करण्यात आलेल्या पथकांना दिवसभर प्रशिक्षण देण्यात आले त्यावेळी बोलत होते. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, तहसीलदार महसूल विशाल दौंडकर यावेळी उपस्थित होते. भरत शितोळे म्हणाले कि, निवडणूक कामकाज प्रत्येकाने गांभीर्याने घ्यावयाचे असून निवडणूक आयोगाची प्रत्येक लहान मोठ्या बाबींवर नजर आहे. कोणत्याही पथकाने कामात टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा केलेला असल्यास तो कुठल्या पदावर आहे याचा विचार न करता तातडीने कारवाई केली जाईल. यावेळी त्यांनी पथकनिहाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा ही घेतला. उपजिल्हाधिकारी वैशाली माने, भरारी पथकाचे प्रमुख लेखा अधिकारी शर