Posts

Showing posts from September 29, 2019

ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेत मतदान जनजागृती

Image
रायगड अलिबाग दि. 06 (जिमाका) :- कर्नाळा पक्षी अभयारण्य, पनवेल येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभाग   आयोजित ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली, त्यावेळी उपस्थित स्पर्धकांना मतदान जनजागृती करण्यात आली, त्यावेळी वन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते, SVEEP पथक उरण   यांनी   यावेळी उपस्थितांना 21 ऑक्टोंबरला मतदान करण्याचे आवाहन केले. 00000

विधानसभा निवडणूक 2019 मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

Image
रायगड अलिबाग दि. 06 (जिमाका) :- विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये ,   निमशासकीय कार्यालये ,   महामंडळे ,   मंडळे ,   सार्वजनिक उपक्रम ,   बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. 00000

रायगड विधानसभा निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नियुक्ती

रायगड-अलिबाग दि.05 :- रायगड विधानसभा निवडणूक संदर्भात सात विधानसभा मतदार संघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक (Police Observer) म्हणून श्री.बलज्योत सिंग राथोर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9673062409 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.बी.एस.जाधव, भ्रमणध्वनी क्रमांक 9545369777   असा आहे.    ०००००

निवडणूक निरीक्षक म्हणून एस.हरिकिशोर यांची नियुक्ती

रायगड अलिबाग दि.05:   भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून एस.हरिकिशोर यांची नियुक्ती केली आहे.   त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7387524689 असा आहे.    त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.रमेश पंडितराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8108022010 असा आहे. ०००००

स्वीप अंतर्गत विद्यार्थ्यांकडून भरुन घेतले संकल्पपत्र

       रायगड-अलिबाग दि.05 : शाळा/महाविद्यालये व शासकीय/निमशासकीय, कार्पोरेट संस्था येथे मतदान करण्यासाठीचे सामुहिक शपथग्रहण, स्वाक्षरी अभियान,संकल्प पत्र भरुन घेणे, विविध प्रासंगिक उत्सवातून मतदानविषयक जनप्रबोधन, अन्य सांस्कृतिक व नावीन्यपूर्ण उपक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.   या कार्यक्रमांतर्गत आयटीआय पेण येथील मतदार यादीतील 110 विद्यार्थीचे   मी मतदान करणार असे संकल्प पत्र भरुन घेतले.   यावेळी   स्वीप नोडल अधिकारी   सुनिल जाधव व संस्थेतील प्राध्यापक उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियानातून आई-वडील, नातेवाईक यांना 21 तारखेला होणाऱ्या मतदानाला मतदान करण्यासाठी आवाहन करणार असल्याचेही यावेळी सांगितले. ०००००

190-उरण व 191 पेण विधानसभा मतदार संघासाठी परमेश्वरन बी. यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

रायगड अलिबाग दि.05 :   भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी 190-उरण   व 191-पेण या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून परमेश्वरन बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.    त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9439047611 असा आहे.   ते नागरिकांना सायंकाळी 4.00 ते 6.00 यावेळेत जे.एन.पी.टी.विश्रामगृह शेवा उरण येथे भेटतील.    त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.बनसोडे, असि.मॅनेजर, जे.एन.पी.टी. उरण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9619368365   असा आहे. ००००००

निवडणूक निरीक्षक एस.हरिकिशोर अलिबागमध्ये

Image
रायगड अलिबाग दि.04 :   भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी 192-अलिबाग, १९३ श्रीवर्धन, १९४-महाड या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून एस.हरिकिशोर यांची नियुक्ती केली आहे.    जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.एस.हरिकिशोर यांचे स्वागत केले. ००००००

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी जिल्हास्तरीय व मतदार संघ निहाय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना

रायगड अलिबाग दि.04 :   भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार   विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी MCMC) स्थापना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे.   तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.     जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी,   पत्रकार जयंत धुळप, अपर जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी श्री.निलेश लांडगे हे समिती सदस्य असून प्र.जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय सु. कोकरे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.            निवडणूक   कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणाऱ्या टी.व्ही.चॅनेल, रेडीओ एफ एम, केबल्स व वृत्तपत्रातील निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे,   बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून त्याबाबत योग्य कारवाई करणे आदी कामे ही समितीम

मतदान जनजागृतीसाठी कामगार उप आयुक्त तर्फे आढावा बैठक

रायगड-अलिबाग दि.04 :- राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने SVEEP कार्यक्रमांतर्गत आज रोजी कामगार उप आयुक्त, रायगड (पनवेल) यांनी त्यांचे कार्यालयात व्यापारी असोसिएशन, इलेक्ट्रीकल ॲण्ड हार्डवेअर मर्चंट असोसिएशन तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीची बैठक घेवून मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. 000000

रायगड विधानसभा निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नियुक्ती

रायगड-अलिबाग दि.04 :- रायगड विधानसभा निवडणूक संदर्भात कायदा व सुव्यवस्था निरीक्षक (Police Observer) म्हणून श्री.बलज्योत सिंग राथोर यांची नियुक्ती झाली आहे.     रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील कायदा व सुव्यवस्था संबधी काही प्रश्न, अडचणी असल्यास नागरिकांनी   9673062409 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. ०००००

जिल्ह्यात आज 80 उमेदवारांची 98 नामनिर्देशनपत्रे दाखल आज अखेर एकूण 132 उमेदवारांची 160 नामनिर्देशन पत्रे दाखल

रायगड-अलिबाग दि.04- विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात 7 विधानसभा   मतदारसंघासाठी 80 उमेदवारां ची 98 नामनिर्देशनपत्रे दाखल. आज अखेर जिल्ह्यात 132 उमेदवारांची एकूण      160 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज 09 उमेदवारांची 11 नामनिर्देशन   पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1 ) अॅड.अरुण विठ्ठल कुंभार (अपक्ष), 2) श्री. प्रविण सुभाष पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), 3)श्री. उत्तम चंद्रमोहन गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), 4)श्री. हरेश मनोहर केणी   (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 5) श्री. हरेश मनोहर केणी   (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 6) श्री. बबन कमळू पाटील   (अपक्ष), 7)श्री.बबन कमळू पाटील   (शिवसेना), 8) श्री. मानवेंद्र यल्लाप्पा वैदू (महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी), 9) श्री. गणेश चंद्रकांत कडू   (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 10) श्री. गोरक्षनाथ हरी पाटील   (अपक्ष) 11) निलम मधुकर कडू (अपक्ष), आज अखेर अशी एकूण 21 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.              189-कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये आज 13 उमेदवारा

जिल्ह्यात आज 40 उमेदवारांची 50 नामनिर्देशनपत्रे दाखल

           रायगड-अलिबाग दि.03:- विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात 7 विधानसभा   मतदारसंघात     40 उमेदवारां ची   50 नामनिर्देशनपत्रे दाखल. आज अखेर जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये  7 उमेदवारांची 8  नामनिर्देशन  पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे.  1 ) श्री. प्रशांत राम ठाकूर (भारतीय जनता पार्टी),   2) श्री. प्रशांत राम ठाकूर (भारतीय जनता पार्टी,),   3)श्री. अरूण जगन्नाथ भगत (भारतीय जनता पार्टी),   4)श्री. हरेश सुरेश केणी (अपक्ष),   5) श्री. संजय गणपत चौधरी (अपक्ष),   6) श्री. श्याम शंकर डिंगळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे ),   7)श्री. राजीव कुमार सिन्हा (इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी) ,  8)श्री.कांतीलाल हरिश्चंद्र कडू (अपक्ष)   आज अखेर अशी एकूण 10 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.             189-कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये 3 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1 ) श्री.सुरेश नारायण लाड (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), 2) सुरेश चिंतामण गायकवाड (बहुजन समाज पार्टी), 3) श्री.

जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी कल्पक उपक्रम राबवावेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी-डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

Image
  रायगड-अलिबाग दि.0 3 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी रायगड जिल्ह्यात दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी स्वीप (SVEEP) कोअर समितीमधील सर्व अधिकारी व त्यांच्या सदस्यांनी सर्व स्तरावर गतीमानतेने व सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी   यांनी केले. मतदान जागृती कार्यक्रमाची (SVEEP) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी   व जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय अधिकारी व अशासकीय संस्थाचे (NGO) पदाधिकारी यांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय स्वीप कोअर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची आज जिल्हाधिकारी   कार्यालयाच्या समिती सभागृहात बैठक झाली.     त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते.             डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यातील अगदी तळागाळाच्या मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी व मतदानाच्या टक्केवारीमध्ये संख्यात्मक वाढ होणेसाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतीत, एस.टी.बसचे मार्ग, विविध मॉल्स, सिन

‘मी मतदान करणार, तुम्ही पण करा’ महास्वाक्षरी अभियानाची सुरुवात

Image
रायगड-अलिबाग दि.02:- 192 -अलिबाग विधानसभा मतदार संघ स्वीप समिती अंतर्गत ‘मी मतदान करणार, तुम्ही पण करा’ या   महास्वाक्षरी अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी सहपत्नीक स्वाक्षरी करुन सुरुवात केली.   यावेळी   उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अलिबाग सचिन शेजाळ,अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, नागरिक,विद्यार्थी व विविध स्वयंसेवी   संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते.   ०००००

प्लास्टिकमुक्तीसाठी श्रमदानाद्वारे स्वच्छता करा --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
रायगड-अलिबाग दि.02:- ' स्वच्छता ही सेवा ’ या मोहिमेच्या काळात विद्यार्थी, नागरिक व   स्वयंसेवी संस्था यांनी शहरातील शक्य त्याठिकाणी श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी जेणेकरुन शहरातील प्रत्येक कानाकोपरा प्लास्टिकमुक्त झाल्याचे दृश्य पहायला मिळू शकेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले.   ' स्वच्छता ही सेवा ’   ही मोहिम 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत राबविली जात आहे. नगर परिषद अलिबागतर्फे जुनीबाजारपेठ व अलिबाग समुद्र किनारी   आयोजित केलेल्या   श्रमदान चळवळीच्या प्रसंगी डॉ.सुर्यवंशी बोलत होते.   या उपक्रमांतर्गत प्लास्टिक वस्तूचा त्याग करुन पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची   शपथ जिल्हाधिकारी यांनी घेतली व विद्यार्थी,नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही   शपथ दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, तहसिलदार अलिबाग सचिन शेजाळ,अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, नागरिक,विद्यार्थी व विविध स्वयंसेवी   संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते.   तसेच नेहरु युवा केंद्रातर्फे प्लास्टिकमुक्तीवर आधारित पथ

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी यांचे अभिवादन

Image
रायगड-अलिबाग दि.02:-    राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी  सहपत्नीक महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  स्वच्छता ही सेवा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने ‘ स्वच्छता ही सेवा’  हा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे.  या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात  प्लास्टिक वस्तूचा त्याग करुन पर्यावरणाच्या रक्षणात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो)  रविंद्र मठपती तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ००००००

तरुणांनी मतदान जागृती कार्यक्रमात सहभागी व्हावे--स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव

Image
रायगड-अलिबाग दि.01:- तरुणांनी मतदान जागृती कार्यक्रमात सहभागी व्हावे.   मतदान जागृती हे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्याचे आवाहन स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अभियांत्रिकी महाविद्यालय लोणेरे, ता. माणगांव येथे मतदान जागृती कार्यक्रम व ई.व्ही.एम. व व्हीव्हीपॅट हातळणीबाबत आयोजित कार्यक्रमा श्री.जाधव बोलत होते.    यावेळी माणगाव तहसिलदार श्रीमती प्रियांका कांबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साळुंखे, गटविकास अधिकारी श्री.गाढवे, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. श्री.जाधव म्हणाले, निवडणूक आयोगाद्वारे मतदार जागृती कार्यक्रम राबवित आहे.   महाविद्यालयातील तरुणांनी मतदान जागृती कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. प्रत्येक गावांत 100% मतदान होण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे. येथील दान उत्सवातही मतदान जागृती कार्यक्रमाचा समावेश आहे. तरुणांनी यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.      दान उत्सव (अगोदरचे जॉय ऑफ गिविंग) हा 2019 साली सुरु झालेला एक स्वयंसेवी गट आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबर गांधी

जिल्ह्यात 7 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

रायगड-अलिबाग दि.01:- विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी   नामनिर्देशनपत्रे दाखल केली. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 2 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे.     श्री. अरुण राम म्हात्रे (अपक्ष), श्री. फुलचंद मंगल किटके (बहुजन समाज पार्टी).              189-कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये 1 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. ॲड गोपाळ गुंजा शेळके (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) 190-उरण, विधानसभा मतदार संघामध्ये 3 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. श्री.कौशिक छोटालाल शहा उर्फ शाह (अपक्ष), श्री.संतोष मधुकर पाटील (बहुजन समाजपार्टी), श्री.महेश रतनलाल उर्फ रतनशेठ बालदी (अपक्ष). 194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये 1 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. श्री.भरत मारुती गोगावले (शिवसेना). तर 192-अलिबाग, 191-पेण, 193-श्रीवर्धन   या विधानसभा मतदार संघात आज एकही नामनिर्देशन सादर झाले नाही. 0000

21 व 24 ऑक्टोबर रोजीची पुर्वनियोजित शिबीर रद्द

रायगड-अलिबाग दि.01:- ऑक्टोबर 2019 या महिन्यात दि.21 ऑक्टोबर रोजी महाड येथील पुर्वनियोजित शिबीर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चे मतदान असल्याकारणाने रद्द करण्यात आले असून या शिबिराचे पुनर्नियोजन बुधवार दि.16 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आले आहे. तसेच अलिबाग येथील शिबीर दि.24 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची मतमोजणी असल्याकारणाने रद्द करण्यात आले असून या   शिबिराचे पुनर्नियोजन बुधवार दि.30 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आले आहे , असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी कळविले आहे. ००००००

श्रीवर्धन विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षकांचा दौरा

रायगड-अलिबाग दि.01:- 19 3 - श्रीवर्धन विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी 9158724634 ( ई-मेल-expobsalibag@gmail.com )असा आहे. 193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचे खर्च तपासणी व ताळमेळ संदर्भात मध्यवर्ती प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे   सकाळी 10.00 वा पुढीलप्रमाणे बैठका घेणार आहेत.    बुधवार दि.09 ऑक्टोंबरला पहिली बैठक. शनिवार दि. 12 ऑक्टोंबरला दुसरी बैठक आणि   बुधवार दि.16 ऑक्टोंबरला तिसरी बैठक घेणार आहेत. ०००००

अलिबाग विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षकांचा दौरा

रायगड-अलिबाग दि.01:- 192-अलिबाग विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी 9158724634 ( ई-मेल-expobsalibag@gmail.com ) असा आहे. तर त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.शेळके असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी 9423788399/9271598577   असा आहे.   192-अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचे खर्च तपासणी व ताळमेळ संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सकाळी 11.00 वा पुढीलप्रमाणे बैठका घेणार आहेत.     गुरुवार दि.10 ऑक्टोंबरला पहिली बैठक. सोमवार दि. 14 ऑक्टोंबरला दुसरी बैठक आणि   शुक्रवार दि. 18 ऑक्टोंबरला तिसरी बैठक घेणार आहेत. ०००००

विधानसभा निवडणूक 2019 प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी,कर्मचाऱ्यांवार होणार कारवाई

Image
रायगड अलिबाग दि.30, विधानसभा निवडणूकीच्या प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार व निवडणूक संचालनासंबंधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. डॉ.सुर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 घोषित झाली असून रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.   जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात एकूण 2714 मतदान केंद्रावर दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण 13600 कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी या प्रमाणे जबाबदारी देण्यात आलेली आहे व त्याप्रमाणे सर्व कर्मचारी यांना आदेश बजाविण्यात आले आहेत.   या सर्व मतदान कर्मचारी यांचे निवडणूक कामकाज विषयक प्रथम प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघ निहाय दिनांक 28 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आले होते.   या प्रशिक्षणासाठी सर्व नियुक्त मतदान कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु एकूण 1277 मतदान कर्मचारी प्रथम प्रशिक्षण

निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला सहाय्यक खर्च निरीक्षक व जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचा आढावा --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
रायगड अलिबाग दि.30 :   रायगड जिल्ह्यासाठी नियुक्त खर्च निरीक्षकांनी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक खर्च निरीक्षक व जिल्हा खर्च सनियंत्रण समिती यांचा आढावा घेऊन विधानसभा निवडणूकीतील उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा अशा सूचना खर्च निरीक्षकांनी दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.     डॉ.सुर्यवंशी म्हणाले 188 पनवेल, 189 कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी विनोद कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी 9158720596 असा आहे.   ते 188-पनवेल मध्ये 11 ऑक्टोंबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, 14   ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि   18 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.   तर 189- कर्जत मध्ये 10 ऑक्टोंबरला   पहिली खर्च ताळमेळ बैठक, 13   ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि   17 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत. 190 - उरण, 191-पेण या विधानसभा मतदार संघासाठी के.सुनिल कुमार नायर यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क    भ्रणणध्वनी 9158719876   असा आहे.    ते 190- उरण मध्ये 10 ऑक्टोंबरला