निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला सहाय्यक खर्च निरीक्षक व जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचा आढावा --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी




रायगड अलिबाग दि.30 :  रायगड जिल्ह्यासाठी नियुक्त खर्च निरीक्षकांनी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक खर्च निरीक्षक व जिल्हा खर्च सनियंत्रण समिती यांचा आढावा घेऊन विधानसभा निवडणूकीतील उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा अशा सूचना खर्च निरीक्षकांनी दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
 डॉ.सुर्यवंशी म्हणाले 188 पनवेल, 189 कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी विनोद कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी 9158720596 असा आहे.  ते 188-पनवेल मध्ये 11 ऑक्टोंबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, 14  ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि  18 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.  तर 189- कर्जत मध्ये 10 ऑक्टोंबरला  पहिली खर्च ताळमेळ बैठक, 13  ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि  17 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.
190-उरण, 191-पेण या विधानसभा मतदार संघासाठी के.सुनिल कुमार नायर यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क   भ्रणणध्वनी 9158719876  असा आहे.   ते 190- उरण मध्ये 10 ऑक्टोंबरला  पहिली खर्च ताळमेळ बैठक, 14 ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि  18 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.  तर 191-पेण मध्ये 11 ऑक्टोंबरला  पहिली खर्च ताळमेळ बैठक, 15  ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि  19 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.
  192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड या मतदार संघासाठी श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी 9158724634 असा आहे.  ते 192-अलिबाग मध्ये 10 ऑक्टोंबरला  पहिली खर्च ताळमेळ बैठक, 14 ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि  18 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.   193-श्रीवर्धन मध्ये 09 ऑक्टोंबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, 12 ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि  16 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत. तर 194-महाड मध्ये 11 ऑक्टोंबरला  पहिली खर्च ताळमेळ बैठक, 15 ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि  19 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.
रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 61 ठिकाणी गुन्हे दाखल करुन 21 ते 29 सप्टेंबर पर्यंत 8 लाख 20 हजार 306 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आदर्श आचार संहिता लागू झाल्यापासून 14 हजार 323 पोस्टर, होर्डिंग, बॅनर्स, फ्लॉक काढून टाकण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची (जनरल) नियुक्ती करण्यात आली आहे.   188-पनवेल, 189 कर्जतसाठी  श्रीम.रेणू जयपाल, 190-उरण, 191-पेणसाठी श्री.सुसंता मोहपात्रा, 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194- महाडसाठी श्री.एस.हरीकिशोरे  यांची नियुक्ती केली असल्याची माहितीही डॉ.सुर्यवंशी यांनी दिली.
192 अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये
आज 5 नामनिर्देशन पत्र सादर
192 अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये 5नामनिर्देशन सादर केली असून ती पुढीलप्रमाणे. सुभाष लक्ष्मण पाटील-अपक्ष,  सुभाष जनार्दन पाटील-अपक्ष, सुभाष प्रभाकर पाटील-प्रिझंटस ॲण्ड वर्करर्स पार्टी, सुभाष गंगाराम पाटील-अपक्ष, सुभाष दामोदर पाटील-अपक्ष या पाच उमेदवारांनी नामनिर्देशन सादर केली आहेत.  तर 188  पनवेल, 189-कर्जत, 190-उरण, 191-पेण, 193-श्रीवर्धन, 194-महाड या विधानसभा मतदार संघातील एकही नामनिर्देशन सादर झाले नाही.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड