Posts

Showing posts from March 27, 2022

जिल्ह्यातील सर्व विभागांतील प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच इतर सर्व नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा

अलिबाग, दि.01 (जिमाका):- शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरीक तसेच कार्यालयातील कर्मचारी/अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असतात.   दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, हे रस्ता सुरक्षेच्या तसेच स्वत:च्या जीवाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे.   बहुतांशी नागरिक दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात. हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीसंबंधी व्यापक मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण रायगड व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था यांना सहभागी करून शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक/कर्मचारी/अधिकारी यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहन विभाग तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत विशेष तपासणी मोहिमेंतर्गत व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व विभागांतील प्रशासकीय अधि

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या 6 व्या टप्प्यांतर्गत माहे एप्रिल ते सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांसाठी मुदतवाढ

पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन   अलिबाग, दि.01 (जिमाका):- कोविड-19 च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शासनाने माहे एप्रिल 2020 पासून महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली. रायगड जिल्ह्यातील माहे एप्रिल 2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 05 किलो अन्नधान्य (प्रति व्यक्ती 02 किलो गहू व 03 किलो तांदूळ) मोफत वितरीत करण्यास प्रारंभ झाला आहे.   या पार्श्वभूमीवर जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी दरमहा आपल्या शिधापत्रिकेवरील व्यक्तींना देय असलेल्या परिमाणानुसार दरमहा मोफत अन्नधान्याची उचल आपल्या गावातील व गावाशेजारील रास्तभाव दुकानातून करावी व काही अडचणी असल्यास संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. आतापर्यंत शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या 05 टप्प्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली असून माहे एप्रिल ते माह

दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज करावेत

अलिबाग, दि.01 (जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील, त्यांनी दि.05 एप्रिल 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 02.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. 06 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.06 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा, अतिरिक्त डीडी कमीत कमी 301 रु.चा असावा. त्यापेक्षा कमी रकमेच्या डीडी चा विचार केला जाणार नाही. या अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 4.00 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी विभ

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांची कर्त्यव्यपरायणता अन् एक यशस्वी शस्त्रक्रिया..!

Image
    अलिबाग, दि.01 (जिमाका):-   आर्थिक वर्षाचा दि.31 मार्च हा दिवस शेवटचा दिवस. या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा रुग्णालयातही सर्व विभागातील आर्थिक बाबीविषयक कामकाजाची धावपळ सुरू होती. तसेच गुरुवार असल्याने अपंग प्रमाणपत्र वाटप करण्याचाही दिवस होता. नेहमीपेक्षा या दिवशी कामाचा ताण थोडा जास्तच होता. अशातच जिल्हा रुग्णालयामध्ये श्रीमती सुमित्रा पाटील, वय वर्षे 50, रा.रावे ता.पेण या पोटदुखी व उलट्या होणे हा त्रास होत असल्याने सर्जरी ओपीडी मध्ये तपासणीसाठी आल्या होत्या. त्यांची गंभीर परिस्थिती पाहून बाह्यरुग्ण विभागातील डॉ.परजणे यांनी त्यांना तातडीने तपासले असता श्रीमती पाटील यांना अक्युट अपेंडीसायटीसचा त्रास असल्याचे निदान झाले. श्रीमती सुमित्रा पाटील यांची तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉ.परजणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माने यांनी प्रसंगाची गांभीर्यता ओळखून आणि रुग्णाचा जीव वाचविणे गरजेचे असल्याने तसेच ते स्वतः शल्यचिकित्सक असल्याने त्यांनी श्रीमती सुमित्रा पाटील यांची शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” होत आहे विद्यार्थीप्रिय

Image
  जिल्ह्यातील 4 हजार 370 विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केले “ गरुडझेप ” अॅप   अलिबाग, दि.01 (जिमाका):- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दि.04 डिसेंबर 2021 रोजी “ गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ” साकारण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून महिन्यातील दर शनिवार व रविवारी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते. आतापर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 549 विद्यार्थ्यांनी या “ गरुडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ” केंद्रात नोंदणी केली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. परंतू काही विद्यार्थ्यांना संबंधित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रावर पोहोचणे शक्य होत नसल्याने अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी “ गरुडझेप ” अॅपची निर्मिती करण्यात आली. हे ॲप अत्

जिल्हा वार्षिक नियोजनचा निधी मार्च 2022 अखेर 100 टक्के खर्च करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल स्थानी

अलिबाग, दि.31 (जिमाका):- जिल्हा वार्षिक नियोजनचा निधी विहित कालावधीत (मार्च 2022 अखेर) खर्च करण्यात राज्यात रायगड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 करिता शासनाकडून जिल्हा वार्षिक नियोजनचा मंजूर व प्राप्त निधी रु.275 कोटी इतका होता. हा संपूर्ण निधी पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विकास व प्रशासकीय कामांसाठी शासकीय यंत्रणांना वितरीत करण्यात आला होता. यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.मेहेत्रे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.देसाई आणि त्यांच्या इतर सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आज दि.31 मार्च 2022 अखेर राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्याने रु.275 कोटी हा संपूर्ण निधी 100% खर्च करण्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हे सर्वांच्या योग्य नियोजनाचे यश आहे. 00000

रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांसाठी रु.11 कोटी 90 लाख 4 हजार निधीस प्रशासकीय तर रु.3 कोटी 77 लाख रक्कमेच्या निधी वितरणास शासनाची मान्यता प्रदान

  पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश   अलिबाग, दि.31 (जिमाका):- कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे, या उद्देशाने राज्य शासनाने “ प्रादेशिक पर्यटन विकास ” ही योजना घोषित केली. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याला भरभरून निसर्गसंपदा लाभली आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी, येथील स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी व त्याकरिता लागणारा निधी शासनाकडून मिळविण्याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या या प्रयत्नांतूनच शासनाकडून जिल्ह्यातील विविध

रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी रु.27 कोटी 18 लाख 6 हजार निधीस प्रशासकीय तर रु.15 कोटी 70 लाख रक्कमेचे निधी वितरणास शासनाची मान्यता प्रदान

  प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत कोकण विभागातील कामांसाठी  रु.188 कोटी 99 लाख 65 हजार निधीस प्रशासकीय तर  रु.65 कोटी 55 लक्ष 39 हजार निधी वितरणास शासनाची मान्यता प्रदान     पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश   अलिबाग, दि.31 (जिमाका):- कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे, या उद्देशाने राज्य शासनाने “ प्रादेशिक पर्यटन विकास ” ही योजना घोषित केली. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याला भरभरून निसर्गसंपदा लाभली आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी, येथील स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील व

जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

Image
  अलिबाग, दि.30 (जिमाका):- आपल्याला जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत. समोर आलेल्या अडचणींवर आत्मविश्वासाने मात करून विकासाकडे वाटचाल करायला हवी आणि यासाठी मी सदैव तुमच्या सोबत असेन, आपण सर्वजण एकत्र काम करू, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज लोणेरे येथे केले. लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरातील इन्‍क्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमीपूजन पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार श्री.सुनिल तटकरे, आमदार श्री.अनिकेत तटकरे, आमदार श्री.भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार योगेश कदम, आमदार प्रकाश सुर्वे, किशोरभाई जैन, मुंबई इमारत सुधार व पुर्नरचना मंडळाचे अध्यक्ष श्री.विनोद घोसाळकर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशि

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा केंद्र अभ्यासिकेचे म्हसळा सार्वजनिक वाचनालय येथे उद्घाटन संपन्न

Image
  अलिबाग, दि.30 (जिमाका):-  म्हसळा येथील सार्वजनिक वाचनालय येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील  “ गरुडझेप ”  स्पर्धा परिक्षा केंद्राच्या अभ्यासिकेचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाला स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमात म्हसळा तहसिलदार श्री.समीर घारे, महसूल नायब तहसिलदार श्री.डी.जे.पाटील, प्राचार्य श्री.मोरे, ग्रंथपाल श्री.मशाळे, सरपंच श्री.पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा बोरसे, विद्यार्थिनी कु.प्राची माळी, श्री.सुनिल उमरठकर यांनी  “ गरुडझेप ”  स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले व म्हसळा तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्राचा व अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री.समीर घारे यांनी केले. 00000

केंद्रीय विद्यालय ओ.एन.जी.सी. पनवेल “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम 2022; कार्यक्रमात सहभागी होण्याचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व विद्यालय प्रबंधन समितीस प्राचार्य श्री.सोहन लाल यांचे आवाहन

Image
  अलिबाग, दि.30 (जिमाका):-   “ परीक्षा पे चर्चा ”  या कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्यामध्ये दि.0 1   एप्रिल   2022   रोजी   पंतप् रधान   श्री . नरेंद्र मोदी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना संबोधित करणार आहेत. हा एक बहुचर्चित व अत्यंत लोकप्रिय वार्षिक कार्यक्रम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमाद्वारे परिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर येणारा ताणतणाव कसा कमी करता येईल, याबद्दल आपल्या विशेष शैलीमध्ये निराकरण करणार आहेत. हा कार्यक्रम    यशस्वी करण्यासाठी आणि या उपक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी केंद्रीय विद्यालय ओ.एन.जी.सी. पनवेलचे प्राचार्य    श्री.सोहन लाल हे अथक परिश्रम घेत आहेत. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व विद्यालय प्रबंधन समिती या सर्वांना  “ परीक्षा पे चर्चा ”  या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 00000

जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक नियुक्तीबाबत घेतला आढावा

अलिबाग,दि.29 (जिमाका):- जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी दि.26 मार्च 2022 रोजी तालुका सहाय्यक निबंधक व तालुका लेखापरीक्षक यांची माहे फेब्रुवारी 2022 अखेरचे सन 2020-21 या कालावधीचे जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण करणे आणि सन 2021-22 या कालावधीचे लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची ठरावाने नियुक्ती या विषयाबाबत आढावा घेतला. या सभेमध्ये तालुकानिहाय माहिती नुसार एकूण लेखापरीक्षण करावयाच्या ठरावाने 2 हजार 235 व परंतुकान्वये 3 हजार 397 अशा एकूण 5 हजार 632 संस्थांपैकी माहे फेब्रुवारी 2022 अखेर ठरावान्वये 1 हजार 919 संस्था व परंतुकान्वये 873 संस्था अशा एकूण 2 हजार 792 संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झालेले असून उर्वरीत शिल्लक पैकी ठरावान्वये 316 व परंतुकान्वये 2 हजार 524 अशा एकूण 2 हजार 840 संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले. तसेच सन 2021-2022 या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षणासाठी दि.31 मार्च 2021 अखेरच्या अपेंडिक्सप्रमाणे लेखापरीक्षणास पात्र असलेल्या एकूण 5 हजार 946 संस्थापैकी फक्त 762 संस्थांनीच लेखापरीक्षकांची ठरावाने नियुक्ती केल

आपत्ती सुरक्षेबाबत जागरूक व प्रशिक्षित असणे काळाची गरज - प्रियदर्शनी पाटील

Image
    अलिबाग,दि.29 (जिमाका):- निसर्गाच्या बदलामुळे विविध आपत्तींचा सामना आपल्याला करावा लागत असल्याने प्रत्येक व्यक्ती आपत्ती सुरक्षेबाबत जागरू व प्रशिक्षित असणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रियदर्शनी पाटील यांनी नुकतेच येथे केले. अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत नुकतेच आपत्ती प्रशिक्षण शिबीर पार पडले. यावेळी प्रियदर्शनी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, सरपंच स्वाती सतीश पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, योग शिक्षक सुहास गानू, ग्रामसेवक निलेश गावंड उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी “ महिलांची स्वयंपाक घरातील गॅस, वीज, गिझर, पाणी यांची सुरक्षा ” यासह विविध अपघात व अन्य आपत्तीप्रसंगी 108 सुविधेचा मोफत वापर, ज्येष्ठ व्यक्ती, कामगार यांची सुरक्षा याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. या कार्यक्रमास अनिता शेंडे, अहिल्या पाटील, ममता मानकर, ग्रामपंचायत सदस्य रोहन पाटील, प्रा.जोगळेकर, आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा मित्र पूजा पेडणेकर, विकास रणपिसे

तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त मतदार नोंदणीची विशेष शिबिरे; जिल्ह्यात दि.27 मार्च ते दि.10 एप्रिल 2022 या कालावधीत होणार विशेष शिबिरांचे आयोजन

अलिबाग,दि.29 (जिमाका):- दि.31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीयपंथियांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यात दि.27 मार्च ते दि.10 एप्रिल 2022 या कालावधीत तर उर्वरीत महाराष्ट्रात दि.27 मार्च ते दि.02 एप्रिल या कालावधीत ही नोंदणी शिबिरे राबविली जाणार आहेत. तृतीयपंथियांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. वय वर्ष 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीयपंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच 21 वर्षावरील तृतीयपंथियाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःचे वय सिद्ध करणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधीत व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रांनुसार नोव्हेंबर 2

मौजे न्हावे, नवखार व सोनखार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूलावरुन 10 मेट्रीक टनापेक्षा जास्त अवजड वाहनास वाहतूक बंदी

अलिबाग,दि.29 (जिमाका):- मौजे न्हावे, नवखार व सोनखार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साखळी क्रं.0/080 मधील पूल (ता.रोहा जि.रायगड) कमकुवत झालेला असून या पूलावरुन 10 मेट्रीक टनापेक्षा जास्त अवजड वाहनास वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे, असे रायगड जिल्हा परिषदेच्या उपविभाग रोहा उपअभियंता (बांधकाम) यांनी कळविले आहे. 00000