जिल्ह्यातील सर्व विभागांतील प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच इतर सर्व नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा


अलिबाग, दि.01 (जिमाका):- शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरीक तसेच कार्यालयातील कर्मचारी/अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असतात.  दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, हे रस्ता सुरक्षेच्या तसेच स्वत:च्या जीवाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे.  बहुतांशी नागरिक दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात.

हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीसंबंधी व्यापक मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण रायगड व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था यांना सहभागी करून शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक/कर्मचारी/अधिकारी यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहन विभाग तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत विशेष तपासणी मोहिमेंतर्गत व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व विभागांतील प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच इतर सर्व नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक