Posts

Showing posts from February 4, 2018

ग्रा.पं. निवडणूकः मनाई आदेश जारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2018 चा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.22 जानेवारी पासून आचार संहिता अमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात नवी मुंबई पोलीस हद्दीत परिमंडळ-2 पनवेल विभागातील पनवेल शहर  पोलीस ठाणे हद्दीत वडघर ग्रामपंचायत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत सोमटणे,मोरबे, खैरवाडी ग्रामपंचायत. खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत आदई,विचुंबे ग्रामपंचायत, उरणे पोलीस ठाणे हद्दीत म्हातवली ग्रामपंचायत, न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीत गव्हाण,फुंडे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींची रिक्त पदासाठीची पोट निवडणूक होणार  असून  मतदान दि.25 फेब्रुवारी  रोजी होणार असून मतमोजणी 26 फेब्रुवारी  रोजी होणार आहे.  या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहून मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावे यासाठी पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई  यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) मनाई आदेश जारी अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 मधील एनआरआय पोलीस ठाणे व परिमंडळ-2 पनवेल विभागातील पनवेल शहर पनवेल तालुका खांद

इ.10 व 12वीच्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभागी खेळाडूंना क्रीडा गुण सवलत:15 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.:- 9 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन दि. २१ एप्रिल, २०१५ नुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परिक्षेस प्रविष्ट होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्यासंदर्भातील सुधारीत कार्यपद्धतीस शासन मान्यता देण्यात आली आहे.             शासन निर्णयातील परिशिष्ट “ अ ” नुसार भारतीय शालेय खेळ महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत खेळ, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित खेळ, भारतीय ऑलिंपिक व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची संलग्नता असलेले एकविध खेळाच्या राज्य संघटना आयोजित खेळ क्रीडा गुणांसाठी ग्राह्य असणार आहेत. एकविध खेळाच्या  राज्य संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणा-या स्पर्धांचे अहवाल शासन निर्णयातील परिशिष्ट “ ब ” मधील कागदपत्रांच्या यादीनुसार परिपुर्ण असतील तरच खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळण्याकरीता शिफारस करण्यात येईल. एकविध खेळाच्या संघटनेमार्फत आयोजित स्पर्धांचे आयोजन जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व

रस्ते विकासाचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करा-प्रधान सचिव आशिषकुमार सिंह

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9:- राज्याच्या आर्थिक विकासाकरीता रस्त्यांचा विकास करणे गरजेचे असून त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राज्यस्व सभागृहात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आज दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अधिक्षक अभियंता नवी मुंबई गोपीनाथ मोहिते, कार्यकारी अभियंता महाड विश्वनाथ सातपुते, कार्यकारी अभियंता अलिबाग राहुल मोरे, कार्यकारी अभियंता पनवेल आर.आर.पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रधान सचिव आशिषकुमार सिंह म्हणाले की, राज्याच्या आर्थिक विकासाकरीता रस्त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. रस्ते विकासाचे प्रस्ताव सादर करताना, रस्त्याची पाहणी करावी, योग्य नियोजन करुन रस्ते विकासाला किती निधी लागणार आहे या बाबींचा विचार करुन प्रस्ताव सादर करावा. नंतरच निधी वितरीत करण्यात येईल. निधीचे योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील जे खराब रस्ते आहेत त्यांचे काम करावे. रस्त्याचे काम उत्कृष्ट दर

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित कामांचा आढावा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने करावयाच्या रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित कामांचा आज जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचे समवेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहसचिव अरुण उन्हाळे, अवर सचिव श्रीरंग घोलप, तसेच जागतिक बँक पथकाचे एम.ए.दशरक्षी, वेंकटक विनोदकुमार गौतम, आशिष बोधले, पी गोपाल कृष्णन, शिरीष कुलकर्णी, सी.एम.मिश्रा, एस.पी.स्वामी, एम.ए. भोसले, खारभुमी विभागाचे उपअभियंता एस.जे.शिरसाठ, महावितरणचे माणिकलाल तपासे,  सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, राष्ट्रीय चक्री वादळ धोके निवारण प्रकल्पात राज्यातील समुद्र किनारी असलेल्या शहरांचा व जिल्ह्यांचा समावेश आहे. यात कोकणातील अलिबाग, जि.रायगड, रत्नागिरी आणि सातपाटी जि.पा

ढगाळ वातावरण व पावसाळा सदृश्यस्थितीमध्ये आंबा पिकाची घ्यावयाची काळजी

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.8- बंगालच्या उपसागरात व श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडे चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडील बाप्षयुक्त वातावरण दक्षिणेकडे खेचले जात आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदूर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आंबा पिकामध्ये तुडतुड्याचा प्रभाव मोठया प्रमाणावर होऊ शकतो. तसेच पाऊस पडल्यास आंबा मोहरावर करपा रोग आणि भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झॉम 25 W.G. (तीन ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी सोबत करपा व भूरी रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डेझीम मॅन्कोझेब (साफ, सफाई, कॅम्पनियन) हे तयार मिश्रण 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच ज्या आंबा बागेमध्ये पानगळ सुरु आहे अशा बागांमध्ये लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सल्फर 80 W.G. (80 टक्के पाण्यात विरघळ

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते हे शुक्रवार दि. 9  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शुक्रवार दिनांक 9  रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मुंबई येथून हेलिकॉप्टरने बिरवाडी महाडकडे प्रयाण. जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण. दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बिरवाडी,एमआयडीसी,हेलिपॅड ता.महाड जि.रायगड येथे आगमन. दुपारी दोन वाजता  बिरवाडी, एमआयडीसी, हेलिपॅड ता.महाड जि.रायगड येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण. 0000

पेण पं. स.ची आमसभा गुरुवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:-   पेण पंचायत समितीची आमसभा गुरुवार दि.8 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. आ.धैर्यशील मोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यात सन 2017-18 या वर्षाचाकामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून आगरी समाज विकास मंच हॉल, चिंचपाडा पेण, जि.रायगड येथे ही बैठक होणार आहे. या आमसभेस उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. ० 0000

जमनालाल बजाज फाऊंडेशन पुरस्कार; :इच्छुकांकडून अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7- सामाजिक विकास,शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी  लोकांना जमनालाल बजाज फाऊंडेशन या संस्थेमार्फत  ट्रॉफी व कॅश रु. दहा लाख इतकी रक्कम देवून  गौरविण्यात येते. हा पुरस्कार दरवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रदान करण्यात येणार आहे. त्यात तीन राष्ट्रीय तर एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत असून त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे तसेच www.jamnalalbajajawards.org (for awards background, objectives, criteria guidelines and nomination format) व http://jamnalalbajajawards.org/nomination forms(for online submission of nomination) या  वेबसाईटवर उपलब्ध् करुन देण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप - कंस्ट्रक्टिव वर्क इन इंडिया,एप्लिकेशन ऑफ सायन्स् अँड टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट.,डेव्हलपमेंट अँड वेलफेअर ऑफ वुमेन अँड चिन्ड्रेन., आंतरराष्ट्रीय पुरस्कार -इंटरनॅशनल वॉर्ड फॉर प्रमोटींग गांधीअन व्हॅल्यूज. आंतरराष्ट्रीय पुरस्कार दि.28 फेब्रुवारी पर्यंत जमनालाल बजाज फाऊंडेशन या संस्थेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी

'आत्मा'अंतर्गत महिलांना फळ प्रक्रीया प्रशिक्षण

Image
अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.5- आत्मा अंतर्गत मौजे लोणीवली ता. पनवेल येथे कृषि विभागामार्फत महिलांसाठी फळप्रक्रीया प्रशिक्षण संपन्न झाले. या कार्यक्रमास औरंगाबाद येथील फळ प्रक्रीया प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक श्रीमती अलका जोशी व श्रीमती स्मिता साळुंखे तसेच लोणीवली परीसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना केचप , जॅम , जेली व विविध प्रकारच्या चटण्या व लोणची इ. बाबत प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फळ प्रक्रिया करताना ते अधिक टिकाऊ होणेबाबत उपयुक्त टिप्स देण्यात आल्या. सहभागी महिलांना फळ प्रक्रिया व्यवसायास उपयुक्त प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.             या कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी पी. डी. सिगेदार उपस्थित होते. त्यांनी महिलांना सदर प्रशिक्षणातुन प्रेरणा घेऊन बचत गटाच्या माध्यमातुन छोटे प्रक्रिया उद्योग सुरु करुन आर्थिक उन्नती करावी, तसेच नजीकच्या काळात होणा-या धान्य महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले.            सदर कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी पनवेल आर. डी. बनकर , मंडळ कृषि अधिकारी श्रीमती एस. एन. जाधव उपस्थित होते. तस

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सन 2018-19 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.5- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील नियमान्वये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आर्थिक दुर्बल व सामाजिक वंचित घटकातील बालकांना सर्व खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित पात्र शाळांमध्ये  किमान 25 टक्के  प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. 25टक्के प्रवेशाकरिता पात्र असणाऱ्या सर्व पात्र्‍ शाळांनी 25 टक्के प्रवेशाबाबतच्या माहितीचा फलक शाळेच्या दर्शनी भागात नागरिकांना सहज दिसेल अशा सूचना प्रवेशपात्र शाळांना दिल्या आहेत. त्यानुसारऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सन 2018-19 चे वेळापत्रक खालीलप्रमाणे- पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे- 12 फेब्रुवारी 2018 पर्यंत.पहिली सोडत काढणे -14 ते 15 फेब्रुवारी ,लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहीत मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चिती करणे.16 फेब्रुवारी ते 1मार्च पर्यंत. ज्या पालकांना प्रथम लॉटरीवेळी अर्ज करता आला नाही त्यांच्याकरीता अर्ज करण्याचा कालावधी-16 फेब्रुवारी  ते 3 मार्च पर्यंत.पहिल्या लॉटरीनंतर प्रवेशाची मुदत संपल्यावर कार्यशाळा घेऊन प्रवेश पात्र शाळा

जिल्ह्यात मनाई आदेश

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.5- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून   जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) दि. 27 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 चे मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रायगड अलिबाग यांनी लागू केले आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी   कळविले आहे. ०००००

मुलींच्या वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 5:- मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह शासकीय इमारतीत 1986 पासून कार्यान्वित असून या ठिकाणी 80 विद्यार्थीनी वास्तव करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग रायगड यांच्या अहवालानुसार सदर इमारत इमारत राहाण्यास योग्य नाही. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून भाडेतत्वावर 3500 स्क्वेअर फुट क्षेत्रफळ असलेल्या इमारतीची आवश्यकता आहे. अशी जागा असलेल्या जागा मालकांनी संपर्क साधावा असे आवाहन,  गृहपाल,मागासर्वीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, रायगड अलिबाग यांनी केले आहे. ०००००

ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे बुधवार दि.6 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- मंगळवार दि.6 रोजी रात्री 12 वा 25 मि.नी पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व कोकणकन्या एक्सप्रेस क्रमांक 10111 ने रत्नागिरीकडे प्रयाण. गुरुवार दि.8 रोजी पहाटे चार वा.पाच मि. नी पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, पनवेलकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आगमन व राखीव. सकाळी आठ वा. शासकीय विश्रामगृह पनवेल येथून कर्जतकडे प्रयाण.सकाळी नऊ वा. कर्जत येथे आगमन व विस्तारकांच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी चार वा.कर्जत येथून चौक फाटा पनवेल मार्गे पलावा,डोंबिवली निवासस्थानाकडे मोटारीने प्रयाण. ०००००

सूक्ष्म कौशल्ये व तणाव मुक्ती विषयांचा प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
        अलिबाग,जि. रायगड दि.5- शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतांना त्यात शासकीय कामकाजाचा आवश्यक भाग तर असावाच मात्र त्यासोबतच कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजात उपयोगी पडणारी संवाद कौशल्ये, सूक्ष्म कौशल्ये तसेच कामामुळे निर्माण होणाऱ्या तणावमुक्ती या विषयांचाही समावेश करा, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर सकारात्मक परिणाम दिसून येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.             जिल्ह्यातील खोपोली ता. खालापूर येथिल  प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते.                        या बैठकीस  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके, रामेती प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.डी. शिगेदार , जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अनिल लोखंडे, कामगार उपायुक्त अ.र. काकतकर, कामगार अधिकार

लोकशाही दिन तक्रारींचे निराकरण वेळीच करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे निर्देश

Image
        अलिबाग,जि. रायगड दि.5- लोकशाही दिन, आपले सरकार वेब पोर्टल या सारख्या अधिकृत व्यासपीठावर सामान्य जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी कटाक्षाने प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.             दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके, रामेती प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.डी. शिगेदार , जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अनिल लोखंडे, कामगार उपायुक्त अ.र.काकतकर, कामगार अधिकारी नि. का.देठे, कार्यकारी अभियंता साबांवि पनवेल आर.एस, मोरे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.         यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी  लोकशाही दिनानिमित्त आलेल्या तक्रारींचा आढ