मुलींच्या वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता


 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:- मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह शासकीय इमारतीत 1986 पासून कार्यान्वित असून या ठिकाणी 80 विद्यार्थीनी वास्तव करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग रायगड यांच्या अहवालानुसार सदर इमारत इमारत राहाण्यास योग्य नाही. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून भाडेतत्वावर 3500 स्क्वेअर फुट क्षेत्रफळ असलेल्या इमारतीची आवश्यकता आहे. अशी जागा असलेल्या जागा मालकांनी संपर्क साधावा असे आवाहन,  गृहपाल,मागासर्वीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, रायगड अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक