शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून घोषणा
.jpeg)
रायगड(जिमाका)दि.24:- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील सात खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्रीमती पुनिता गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत वाघ आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, धैर्य, शौर्य, संयम, प्रयत्न हे या रायगडच्या मातीचे गुण आहेत. या जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी सात खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून जिल्ह्याचे आणि राज्याचे नव्हे तर देशाचा नाव लौकिक वाढविला पाहिजे. त्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करीत आहे. तसेच वेळोवेळी धोरणत्मक निर्णय घेते. त्याचा सर्वांनी लाभ घेऊन चांगली कामगिरी करावी अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी दि...