Posts

Showing posts from August 25, 2019

पोषण महिना अभियान पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते प्रकाशन

Image
अलिबाग दि.31 ऑगस्ट :-   जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण,आरोग्य व ग्रामपंचायत विभागामार्फत   1 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत पोषण महिना अभियान -2019 राबविण्यात येणार आहे.   यासाठी पोषण महिना   पुस्तिका तयार करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांचे कक्षात या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा व महिला बालकल्याण अधिकारी जि.प. श्री. मंडलिक, महिला व बालकल्याण सभापती श्रीम.उमाताई मुंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोषण महिना अभियान-2019 कार्यक्रम दि.1 सप्टेंबर जिल्हास्तर,तालुकास्तर आणि अंगणवाडी स्तरावर पोषण महिना उद्घाटन समारंभ व त्याचे सर्व तालुक्यांनी सदरचा कार्यक्रम पाहणे,अंगणवाडी सेविका,अे.एन.एम.,आशा वर्कर यांनी संघटनात्मक सहभागी होणे व उद्घाटन   समारंभाचे आयोजन करणे.   दि.2 सप्टेंबर गणेशोत्सव देखाव्यांमध्ये अभियानाबाबत बॅनर्स,पोस्टर्स लावणे.   दि.3 सप्टेंबर थीम-बालकाचे पहिले 1000 दिवस बा

जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

Image
  अलिबाग दि.31 ऑगस्ट :-   ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पु रामुळे जिल्ह्यात झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची केंद्रीय पथकाने (शुक्रवार दि.30रोजी ) पाहणी करुन माहिती जाणून घेतली.             या पथकात चित्तरंजन दास ,   मिलींद पनपाटील ,   ओमकिशोर या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश होता . तर त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे आदि उपस्थित होते.                यावेळी केंद्रीय पथकाने महाड तालुक्यातील दादली पुल, महाड बाजारपेठ, वरंध घाट, शेवते घाट येथे जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी केली. महाड बाजारपेठेत त्यांनी व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन नुकसानीबाबत जाणून घेतले.  तसेच वरंध घाट येथील पाहणी दरम्यान पारमाची येथील नागरिकांनी तेथील गावात झालेल्या नुकसानीच्या माहितीचे निवेदन दिले.  सदर निवदेना संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना केंद्रीय पथकाने उपस्थित विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यां

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 -   भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदला मध्ये अधिकारी   पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB)   या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी बुधवार दिनांक 18/09/2019 ते शुक्रवार दि.27/09/2019 या कालावधीत SSB कोर्स क्रमांक 50 आयोजन   करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची   व्यवस्था नि:शुल्क आहे.   रायगड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रायगड-अलिबाग येथे दिनांक शुक्रवार 09 सप्टेंबर 2019 सकाळी 11 वाजता   मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्या पुर्वी    PCTC   Training च्या Google Plus   पेज वरती   किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट   www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लिक करुन त्यामधील उपलब्ध Check List   यांचे अवलोकन करुन त्याची दोन   प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिश

ईव्हिएम व व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती जिल्ह्यातील मतदारांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.29:- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (VVPAT: Voter Verified Paper Audit Trail) मशीन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून   या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून   जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जनजागृती कार्यक्रमासाठी रवाना पथकाचे श्रीफळ वाढवून तसेच हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.   तसेच प्रत्यक्ष मतदारांना मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर त्यासोबत असणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्र, गर्दीची ठिकाणे, बाजार आदी ठिकाणी हे जनजागृती पथक नागरिकांना ईव्हिएम,व्हीव्हीपॅट याबाबत माहिती देईल.   

केंद्र शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवा---खासदार श्रीरंग बारणे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -   केंद्र शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना असून त्यांची अंमलबजावणी करुन त्या जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहचवा असे निर्देश खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास   समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती श्रीरंग बारणे यांनी आज येथे दिले.   जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते.             यावेळी खासदार सुनिल तटकरे, आ. जयंत पाटील, आ.मनोहर भोईर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदि उपस्थित होते.               यावेळी खा.श्री.बारणे म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेसाठी केंद्र शासन अंगिकृत असलेल्या अनेक योजना शासन राबवित असून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.    प्रधानमंत्री ग्रा