Posts

Showing posts from July 28, 2024

रायगड जिल्ह्यातील इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाची सुवर्णसंधी

    रायगड(जिमाका) दि.02:-    जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 चे ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यासाठी पोर्टल दि. 16 जुलै 2024 पासून सुरु झाले आहे.   इयत्ता 6 वी साठी पात्रता-  विद्यार्थी  हा पाचवीत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये शासकीय तसेच शासनमान्य प्राप्त शाळेत रायगड जिल्ह्यात  शिकत असणे आवश्यक आहे, विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील रहिवासी असावा, तसेच आधार कार्डवर रायगड जिल्ह्याचा रहिवासी पत्ता असणे आवश्यक आहे, जन्म तारीख 01 मे 2013 ते 31 जुलै 2015 (दोन्ही दिवस धरून) मधील असावी. यावर्षी आधारकार्ड आवश्यक असून त्यासाठी लिंक असणाऱ्या मोबाईल वर ओटीपी येणार असून पुढील अर्ज अपलोड करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. (यासाठी आधार कार्ड अपडेट करावे. आधार कार्ड नसल्यास शासकीय नियमानुसार पालकाचे याच जिल्ह्यातील पुरावा म्हणून  रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करावे. अर्ज अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा फोटो, विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे साक्षांकित प्रमाणपत्र, स्कॅन केलेली विद्यार्थी व पालकाची सही इत्यादी बाबी तयार ठेवाव्या . अंतिम सबमिशन पुर्वी अर्जातील तपशील परत तपासून घ्यावा. यात विशेष जातीची वर्गव

दि 02 ऑगस्ट ते दि 05 ऑगस्ट 2024 पर्यंत रस्ता बंद करण्याचा मनाई आदेश जारी

रायगड(जिमाका) दि.02 :-    मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला असल्याने त्या ठिकाणी दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ हा रस्ता दि 02 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12.00 पासून ते दि 05 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 08.00 वाजेपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार व शासन गृह विभागाचे दि. 19/05/1990 चे अधिसूचनेनुसार बंद करण्याचा मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे डॉ.सुहास दिवसे यांनी जारी केला आहे.  पुणे ते माले गाव ते पुणे रायगड जिल्हा हद्द ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ चे रुंदीकरणाचे कामकाज चालू असून पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वरील ताम्हिणी घाट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मौजे आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वर साखळी क्र. 63/000 येथे दरड कोसल्यामुळे महामार्ग प

जिल्ह्यात दि.01 ते दि.15 ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवड्याचे आयोजन

रायगड(जिमाका) दि.02:-    पंचसुत्रीच्या संदर्भात पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच या पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने  जिल्ह्यात  दि.01  ऑगस्ट  ते  दि.15   ऑगस्ट 2024  या कालावधीत "पशुसंवर्धन पंधरवडा- 2024   आयोजित  येणार असल्याची माहिती   जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद डॉ.शामराव कदम  यांनी दिली आहे. दि.01  ऑगस्ट  ते  दि.15   ऑगस्ट 2024  या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्याकीय संस्थामार्फत पशुधनाचा साथ रोग प्रादूर्भावापासून बचाव होण्याकरिता पशुधनास लाळखुरकुत, सांसर्गिक गर्भपात,लम्पीचर्मरोग ,घटसर्प फऱ्या पीपीआर,आंत्रविषार इ. रोगांचे लसीकरण तसेच पशुमधील जंत निर्मुलन करण्यासाठी जंतनाशक औषधींचे वाटप , गोचीड गोमाशा निर्मुलनासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गाई म्हशींची वंधत्व तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे             केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, पशुधनाच्या सकस आहाराचे महत्व तसेच माहे सप्टेंबर 2024 पासून चालू होणाऱ्या  21 व्या  पशुगणनेच्या अ

08 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन

              रायगड (जिमाका) दि.02:-  विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता दि. 08 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे जिल्हास्तरीय पेन्शन   अदालत आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीमध्ये प्रलंबित प्रकारणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार असून या दिवशी व वेळी आपण आपल्याकडील आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे.  जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील जिल्ह्यातील विविध राज्य शासकीय कार्यालयातील आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी हे मोठया प्रमाणात सन 2023 ते 2024 मध्ये निवृत्त होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती प्रकरणे कार्यालयीन स्तरावर तसेच वेतन पडताळणी पथकाकडे व रजा मंजूरीवर प्रलंबित आहेत. 000000  

अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार स्वच्छता स्वच्छतेसाठी जर्मन बनावटीच्या 3 अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध

    रायगड (जिमाका)दि.31 : - अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला असून, अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पाम टेक कंपनीच्या 3 अत्याधुनिक बीच क्लिनींग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिन्स ट्रक्टरच्या साह्याने समुद्रकिनारी वापरता येणार असून, किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचे काम केले जाणार आहे. या बीच क्लिनींग मशिनचे संबंधित ग्रामपंचायतींना हस्तांतरण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आले. पोलीस विभागाच्या मैदानावर वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध विभागा

शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरले जाणार

    रायगड (जिमाका)दि.31:-  सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.El.Ed.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल प्राचार्य, डॉ.सुभाष महाजन यांनी दिली आहे. प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे राबविण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या  www.maa.ac.in  संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतीत. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.   प्रवेशाची शैक्षणिक पात्रता- इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5% गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दि.01 ते दि.05 ऑगस्ट 2024, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची