रायगड जिल्ह्यातील इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाची सुवर्णसंधी

 

 

रायगड(जिमाका) दि.02:-  जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 चे ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यासाठी पोर्टल दि. 16 जुलै 2024 पासून सुरु झाले आहे.

 इयत्ता 6 वी साठी पात्रता- विद्यार्थी  हा पाचवीत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये शासकीय तसेच शासनमान्य प्राप्त शाळेत रायगड जिल्ह्यात  शिकत असणे आवश्यक आहे, विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील रहिवासी असावा, तसेच आधार कार्डवर रायगड जिल्ह्याचा रहिवासी पत्ता असणे आवश्यक आहे, जन्म तारीख 01 मे 2013 ते 31 जुलै 2015 (दोन्ही दिवस धरून) मधील असावी.

यावर्षी आधारकार्ड आवश्यक असून त्यासाठी लिंक असणाऱ्या मोबाईल वर ओटीपी येणार असून पुढील अर्ज अपलोड करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. (यासाठी आधार कार्ड अपडेट करावे. आधार कार्ड नसल्यास शासकीय नियमानुसार पालकाचे याच जिल्ह्यातील पुरावा म्हणून  रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करावे.

अर्ज अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा फोटो, विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे साक्षांकित प्रमाणपत्र, स्कॅन केलेली विद्यार्थी व पालकाची सही इत्यादी बाबी तयार ठेवाव्या .

अंतिम सबमिशन पुर्वी अर्जातील तपशील परत तपासून घ्यावा. यात विशेष जातीची वर्गवारी (जातीचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करून घ्यावी), परीक्षेचे माध्यम, वर्ग 3री, 4थी व 5 वी ग्रामीण आहे की शहरी भाग तपशील इत्यादी परत परत स्वतः तपासावा. अर्ज अपलोड करण्यासाठी कोणतीही परीक्षा फी नाही.

अर्ज करण्याची लिंक-https://cbseitms.rcil.gov.in/nvs/?AspxAutoDetectCookieSupport=1  https://navodaya.gov.in,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024, परीक्षा दिनांक -18 जानेवारी 2025,  अर्ज अपलोड करण्यासाठी अतिंम क्षणाची वाट न पहाता सर्व्हर जाम समस्येला टाळता येईल. त्यासोबत आपला अर्ज स्वतःसमोर अपलोड झाल्याची खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर, जिल्हा-रायगड येथे संपर्क साधावा.

०००००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड