Posts

Showing posts from February 7, 2021

जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यातील उत्तम काम - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

  अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) : जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत चांगले काम करण्यात आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.12) येथे दिली. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत कामांसाठी शासनाकडून रायगड जिल्ह्याला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.   जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांचा आढावा गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, जल जीवन मिशन संचालक आर. विमला, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.   पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत प्रत्येक तालुक्

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, जि.रायगड, दि.12 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-- शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.  रविवार दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3.00 वा. वेश्वी ता.मंडणगड येथे आगमन व बोटीने बागमांडला ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. बागमांडला येथे आगमन व दिघीकडे प्रयाण. सायं.5.00 वा. दिघी येथे आगमन व साजीद करजीकर यांचे सुपूत्र चि.सालिक यांच्या शुभविवाहानिमित्त सदिच्छा भेट. स्थळ : मु.पो.दिघी, ता.श्रीवर्धन. सायं.5.30 वा. दिघी येथून शासकीय वाहनाने वांजळोशी ता.तळाकडे प्रयाण. सायं.7.00 वा. वांजळोशी येथे आगमन व भिमसेन शिवराम शिंदे यांचे सुपूत्र चि.किशोर यांच्या शुभविवाहानिमित्त स्वागत समारंभास उपस्थिती. स्थळ: मु.वांजळोशी, पो.साई, ता.तळा. सोयीनुसार वांजळोशी येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण सुतारवाडी येथे आगमन व राखीव. 000000

रायगड जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी 275 कोटी मंजूर

              अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) :- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ( दि. 11 रोजी मुंबई येथे )   रायगड जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधरण) सन 2021-22 ची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली.   रायगड जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धी व स्थानिकांना रोजगार या दृष्टीकोनातून शाश्वत पर्यटन विकास करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत 275   कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.                 रायगड जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रमुख पर्यटन जिल्हा असल्याने जिल्हास्तरावरुन पर्यटन विकासाचे अनेक उपक्रम व योजना राबविण्यासाठी सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 275 कोटीं रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.                    या बैठकीला राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चाैधरी, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे उपस्थित होते.        रायगड जिल्ह्यासाठी सन

अलिबाग शासकीय मूकबधीर विद्यालयास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची भेट मूकबधीर विद्यार्थ्यांना आवश्यक सोई-सुविधांसह चांगले शिक्षण देण्यासाठी इमारतीची उत्तम पुर्नबांधणी करण्याचे संबंधितांना निर्देश

    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका) :- रायगड जिल्हा व कोकण विभागातील कर्णबधीर मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शासनाने अलिबाग येथे शासकीय मूकबधीर विद्यालय सन 1963 सालापासून सुरु केलेले आहे. या इमारतीस 34 वर्षे कालावधी झाल्यानंतर आता या इमारतीची जीर्णावस्था झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत सन 2017 मध्ये धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे. यानुषंगाने या इमारतीची पाहणी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शनिवार, दि.06 फेब्रुवारी 2021 रोजी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी, तहसिलदार सचिन शेजाळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, शाळेचे अधीक्षक श्री. किशोर वेखंडे तसेच   समाज कल्याण विभागातील अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या इमारतीची सुसज्ज उभारणी होण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून कमी पडू दिला जाणार नाही.   या इमारतीच्या पुर्नबांधणीसाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले असून मूकबधीर विद्यार्थ्यांना आवश्

प्रस्तावित आदिवासी बहुउद्देशीय संकुलाकरिता पालकमंत्री आदिती तटकरेंनी केली जांभूळपाडा येथील जागेची पाहणी

    अलिबाग,जि.रायगड,दि. 08 (जिमाका) :- मौजे जांभूळपाडा येथे जिल्ह्यातील आदिम जमाती (कातकरी) करिता प्रस्तावित आदिवासी बहुउद्देशीय संकुल उभारणीकरिता आवश्यक जागेची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी, रविवार, दि.7 फेब्रुवारी 2021 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या माध्यमातून अतिदूर्गम व अविकसित सीमा भागातील या आदिवासी लोकांना जीवनावश्यक सोयीसुविधा कशा प्रकारे उपलब्ध करता येईल, यासंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी संबंधित पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील 37 हजार 436 आदिवासी कुटुंबांकरिता एक बहुउद्देशीय संकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला असून, त्याकरिता संसाधनांसह इतर अन्य बाबींच्या तपासणीकरिता राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच या आदिवासी बहुउद्देशीय संकुलाचे काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आदिवासी घटकाच्या विकासासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. आदिवासी जमातीची कुटुंबे ठराविक क्षेत्रामध्ये आढळून येत असल्यामुळे व ही क्षेत्रे अतिदूर्गम व अविकसित