Posts

Showing posts from October 15, 2017

शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय -पालकमंत्री ना.प्रकाश महेता

Image
            अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका)-  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम भरून कर्जमुक्ती देण्याचा हा राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे, असे उद्गार राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश महेता यांनी आज येथे काढले.  रायगड जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकरी कुटुंब सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.             यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका आदि मान्यवर उपस्थित होते.             यावेळी पालकमंत्री ना.महेता म्हणाले की, रायगड जिल्ह्यात सर्वात कमी थकीत कर्जदार शेतकरी आहेत. या योजने अंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट

छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजना : कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा करणार; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.17- छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला हप्ता बुधवार दि.18 रोजी दुपारी बारा वाजता एका समारंभपुर्वक जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात दुपारी बारा वाजता या कार्यक्रमास पालकमंत्री ना. प्रकाश महेता, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची उपस्थिती असेल असे जिल्हा उपनिबंधक  पी.एम.खोडका यांनी सांगितले.  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रारंभ चा राज्यस्तरीय कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह येथे उद्या म्हणजे बुधवार दि. 18 रोजी  दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्रीमहोदयांची उपस्थिती असणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होतील. व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपस्थितांना राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. ००००००

पालकमंत्री ना.प्रकाश महेता यांचा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.17- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश महेता यांचा दिनांक 18 ऑक्टोंबर, 2017 रोजीचा रायगड जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार दिनांक 18 ऑक्टोंबर, 2017 रोजी सकाळी 9.30  वा. घाटकोपर निवासस्थान येथून गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. 10.15  वा. गेट ऑफ  इंडिया येथे आगमन. 10.20 वा. खाजगी बोटीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. 11.00 वा. मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व राखीव. दुपारी 12.00 वा. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत कार्यक्रमास उपस्थिती.  1.30 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.  3.00 वा. शासकीय विश्रामगृह येथून मांडवाकडे प्रयाण. 3.30 वा. मांडवा येथून बोटीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. ००००००

सैनिक स्कूल सातारा-प्रवेश परीक्षा पात्र उमेदवारांनी संपर्क साधावा

            अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका)-  सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता 6 वी व 9 वी साठी वर्ष 2018-19 सत्राच्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (मुलींना या शाळेत प्रवेश दिला जात नाही.) प्रवेश परीक्षा ओ.एम.आर. पध्दतीने घेतली जाईल, ज्यात उत्तरे बहुपर्यायी असतील.             वयोमर्यादा व निवड पध्दती इयत्ता 6 वी उमेदवाराची जन्मतारीख हि दिनांक 02 जुलै, 2007 ते 1 जुलै, 2008 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी. इयत्ता 9 वी उमेदवाराची जन्मतारीख हि दिनांक 02 जुलै 2004 ते 1 जुलै, 2005 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी व उमदेवार हा प्रवेशावेळी मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता 8 वी उत्तीर्ण झालेला असावा. निवड पध्दती-लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी, इयत्ता 6 वीची रिक्त पदे 71 व इयत्ता 9 वीची रिक्त पदे 05. रिक्त पदांच्या संख्येत वाढ/कमी होऊ शकते.             राखीव जागा-अनुसूचित जाती 15 % , अनुसूचित जमाती 7.5 %, आजी व माजी सैनिकांची मुले 25 % (अ.जा. व अ.ज. यांच्या राखीव जागा सोडून).             प्रवेश परीक्षा केंद्र –इयत्ता 6 वी- अहमदनगर, कोल्

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

Image
अलिबाग,(जिमाका)दि.17:- भगवान धन्वंतरी हे आरोग्य शास्त्राचे आरोग्य दैवत मानले जाते. संपूर्ण देशात आरोग्य् क्षेत्रात आरोग्य संवर्धनासाठी धन्वंतरी जयंती साजरी करण्यात येते. या दिवसाचे निमित्त साधून दिनांक 18 ऑक्टोबर 2017 ते 30 ऑक्टोबर 2017 या कालावधीत आयुर्वेदाद्वारे वेदना रहित जीवन अभियान आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय,अलिबाग येथे आयुष कार्यक्रमांतर्गत दि.17 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांस डॉ.अजित गवळी,जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.अनिल फुटाणे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.सुहास कोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क)  डॉ.सुचिता गवळी,वैद्यकीय अधिक्षक,उप जिल्हा रुग्णालय पेण,डॉ.मृणालिनी कदम,अस्थिरोगतज्ञ, डॉ.चेतना पाटील,जिल्हा आयुष अधिकारी उपस्थित होते. आयुर्वेदाद्वारे वेदना रहित जीवन या जनजागृती अभियानाचा या प्रसंगी शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात श्री धन्वंतरी स्तवन करुन आयुर्वेदाद्वारे वेदना रहित जीवन या विषयावर डॉ.अर्चिस पाटील,वैद्यकीय अधिकारी एम.डी.(आयुर्वेद)

हयातीचे दाखले जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना 20 नोव्हेंबर पर्यंत मुदत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16- जिल्हा कोषागार कार्यालय रायगड अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची यादी संबंधित बँकेत यादी पाठविण्यात आलेली आहे. तरी दिनांक 1 नोव्हेंबर 2017  रोजी  किंवा त्यानंतर बँकेत जावून त्या यादीवरील नावासमोर हयात असल्याबाबतच्या  दिनांकासह स्वाक्षरी करावी व आधारकार्ड,पॅनकार्ड व मोबाईल क्रमांकासह नमूद करावे. मनिऑर्डरने निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सांक्षांकनासह आधारकार्ड, पॅनकार्ड व मोबाईल क्रमांक नमूद करुन हयातीचा दाखला दिनांक 20 नोव्हेंबर 2017 अखेरपर्यंत सादर करावेत. त्याचप्रमाणे सन 2017-18  मधील ज्या निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्ती वेतनावरील रक्कम आयकर करप्राप्त आहे,अशा निवृत्तीवेतनधारकांनी आपले आयकराबाबत आपली बचतीची कागदपत्र व पॅनकार्ड या कार्यालयाकडे दि.10 नोव्हेंबर 2017 पर्यंत त्वरीत सादर करावीत असे आवाहन, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला,  यांनी केले आहे. 00000

हातमाग विणकरांची उत्पादने विक्रीसाठी शासनाची हेल्प लाईन व वेब पोर्टल

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16- राज्यातील हातमाग विणकरांनी तयार केलेली वस्त्र उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोफत हेल्पलाईन व वेबपोर्टल सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधांचा विणकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योग  विभागाचे प्रादेशिक उपसंचालक यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यात शेती नंतर रोजगार  रोजगार देणारा व्यवसाय हा वस्त्रोद्योग आहे. राज्यात हातमागावर काम करणाऱ्या विणकरांसाठी राज्य् शासन व केंद्र शासन विविध कल्याणकारी  योजना राबवित आहे. केंद्र शासनाचे हातमाग विणकरांचे हित जोपासण्यासाठी व त्यांना सर्वेातोपरी मदत करण्यासाठी तसेच शासकीय योजनांची सर्वकष माहिती देण्यासाठी बुनकर मित्र  या नावाने क्र.18002089988 अशी हेल्प् लाईन सुरु केली आहे. सदरची सेवा मोफत देण्यात येत आहे. यासाठी विणकराला कोणताही चार्ज त्याचे फोन वरुन आकारला जाणार नाही. राज्यात हातमाग विणकराने विणलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त् नफा प्रत्यक्ष विणकरास मिळण्यासाठी केंद्र शासनाने www.indianhandmadebazar.com या नावाने स्वतंत्र पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलद्वा