शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय -पालकमंत्री ना.प्रकाश महेता


            अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका)-  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम भरून कर्जमुक्ती देण्याचा हा राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे, असे उद्गार राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश महेता यांनी आज येथे काढले.
 रायगड जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकरी कुटुंब सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
            यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका आदि मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी पालकमंत्री ना.महेता म्हणाले की, रायगड जिल्ह्यात सर्वात कमी थकीत कर्जदार शेतकरी आहेत. या योजने अंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. हा शासनाचा एक ऐतिहासिक निर्णय आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही  ना.महेता म्हणाले.
 यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच त्यांचा सपत्नीक साडी चोळी, कपडे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या व नतुन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.


कर्जमाफी संदर्भात जिल्ह्यातील माहिती यावेळी देण्यात आली, ती याप्रमाणे-
जिल्ह्यातील 803 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील एकूण 30 हजार 250 कर्जदार सभासद सदर योजनेस पात्र असून त्यापैकी एकूण 5 हजार 408 थकबाकीदार शेतकरी आहेत. तसेच पीक कर्जाची मुदतीत कर्जफेड करणारे 24 हजार 842 शेतकरी आहेत. शासन निर्णयानुसार ऑनलाईन अर्ज दाखल शेतकरी सदस्य 27 हजार 69 आहेत. जिल्ह्यात एकूण विविध कार्यक्षेत्रातील 130 सेवा सहकारी संस्था  पैकी कर्ज वाटप केलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था 117 आहेत.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत उचल केलेल्या 16 हजार 930 शेतकऱ्या पैकी 166 थकबाकीदार आहेत. नियमित कर्ज फेड केलेले 16 हजार 764 शेतकरी सदस्य असून राष्ट्रकृत बँकेतून कर्ज उचलेले शेतकरी 13 हजार 320 पैकी थकबाकीदार 5 हजार 242 आहेत. नियमित कर्जफेड केलेले 8 हजार 78 शेतकरी आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
श्री.गणेश शिर्के, रा.खामगांव, ता.म्हसळा, जि.रायगड येथील शेतकरी असून  शासनाच्या कर्जमाफी धोरणामुळे कर्ज माफ झाले आहे. माझ्या डोक्यावरील आर्थिक भार शासनाने कमी केला आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. तसेच या कर्ज मुक्ती योजने बद्दल सरकारचा आभारी आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यामुळे आर्थिक सुबत्ता निर्माण होईल.

श्री.ईफतिहार मुकादम, रा.पांगलोली, ता.म्हसळा, जि.रायगड:- मी या सरकारचा मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण या शासनाने शेतकऱ्यांचा आवाज ऐकून शेतकऱ्यांची कर्ज माफी केलेली आहे. शेतकरी एवढया बिकट परिस्थितीत होते. शेतकरी कर्जमाफी केल्यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

श्री.परशुराम दामोदर मापगांवकर, रा.मापगांव, ता.अलिबाग जि.रायगड:-शासनाने शेतकऱ्यांना कर्ज माफ केले त्या बद्दल मी शासनाचे आभारी आहे. कर्ज माफीमुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल.


000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक