Posts

Showing posts from August 18, 2019

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.58 मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.58 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3503.83 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 4.00 मि.मि., पेण-3.00 मि.मि., मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-4.40 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-8.80 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-3.00 मि.मि., रोहा-8.00 मि.मि., सुधागड-6.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-5.00 मि.मि., पोलादपूर-4.00, म्हसळा-0.00 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-10.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 73.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 4.58 मि. मि.     इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   111.49 टक्के इतकी आहे. 0000

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

अलिबाग दि.18 ऑगस्ट- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन दिनांक 01/01/2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 15 जुलै 2019 ते 30 जुलै 2019 या कालावधीत निर्धारीत केला होता. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्याकडील दि.14/08/2019 च्या पत्रकान्वये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-दुसरा कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दि.24/08/2019 पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे व दि. 31/08/2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. 00000