मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम





अलिबाग दि.18 ऑगस्ट- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन दिनांक 01/01/2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 15 जुलै 2019 ते 30 जुलै 2019 या कालावधीत निर्धारीत केला होता.
भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्याकडील दि.14/08/2019 च्या पत्रकान्वये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-दुसरा कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दि.24/08/2019 पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे व दि. 31/08/2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक