Posts

Showing posts from September 19, 2021

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 68.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 68.34 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3508.69 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 25.00 मि.मी., पेण- 84.00 मि.मी., मुरुड- 35.00 मि.मी., पनवेल- 74.60 मि.मी., उरण-68.00 मि.मी., कर्जत- 65.80 मि.मी., खालापूर- 75.00 मि.मी., माणगाव- 33.00 मि.मी., रोहा- 65.00 मि.मी., सुधागड-35.00 मि.मी., तळा-165.00 मि.मी., महाड- 67.00 मि.मी., पोलादपूर-49.00 मि.मी, म्हसळा- 138.00 मि.मी., श्रीवर्धन-26.00 मि.मी., माथेरान- 88.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1093.40 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 68.34 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 109.09 टक्के इतकी आहे. 00000

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शुक्रवार दि.24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून कळसांबळे, ता.तळा, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.40 वा.कळसांबळे येथे आगमन व विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण, कळसांबळे बौध्दवाडी सामाजिक सभागृह भूमीपूजन, कळसांबळे वाडीतील व्यायामशाळा साहित्य लोकार्पण, कळसांबळे गावातील स्मशानभूमी भूमीपूजन कार्यक्रम.   दुपारी 12.30 वा.आडनाळे गौळवाडी, ता.तळा येथे आगमन व विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन, गौळवाडी आडनाळे रस्त्याचे भूमीपूजन, गौळवाडी अतंर्गत रस्त्याचे उद्घाटन, गौळवाडी स्मशानभूमी भूमीपूजन. दुपारी 2.00 वा पुसाटी ता.तळा येथे कार्यकर्त्यांशी चर्चा.   दुपारी 2.30 वा. पुसाटी, ता.तळा येथून खारापट्टी, ता.रोहाकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. खारापट्टी, ता.रोहा येथे साखर चौथ गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट. दुपारी 3.30 वा. सानेग

ग्रामीण भागातील लघुउद्योग व महिला बचतगटांसाठी "आठवडी बाजार" संकल्पना उपयुक्त

    अलिबाग,जि.रायगड,दि.21, (जिमाका):- करोना सारख्या जागतिक महामारीमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले. लोकांचे रोजगार गेले. अशा परिस्थितीत महिला आठवडी बाजाराची सुरुवात केल्यास तालुक्यातील रोजगार निर्मितीला चालना देऊन देशासमोर एक नवीन आदर्श निर्माण करता येईल, लघु आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देता येईल व खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचा उद्देश सफल होईल, या उद्देशाने अनोख्या आठवडी बाजाराची संकल्पना मांडण्यासाठी कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुवर्णाताई जोशी यांची नुकतीच कर्जत येथे भेट घेण्यात आली.               याप्रसंगी "मदर आय   फाउंडेशन" कर्जतचे आशिष लाड, धनंजय मोरे, दिनेश बडेकर, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ व चंद्रशेखर पाटील, कर्जत तालुका अभियान व्यवस्थापक ललिता तेलवणे, तालुका व्यवस्थापक राजू नेमाडे व सद्भावना फाउंडेशन कर्जतच्या सुनंदा लाड आदी मान्यवर उपस्थित होते.                 समाजव्यवस्थेतील मध्यमवर्गीय कुटुंबातील दुर्बल घटकांना आशेचा किरण म्हणून स्वयंसहाय्यता बचतगटाकडे पाहिले जाते. देशातील कोट्यवधी महि

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 17.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

             अलिबाग,जि.रायगड,दि.21 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.03 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3440.35 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 5.00 मि.मी., पेण- 12.00 मि.मी., मुरुड- 6.00 मि.मी., पनवेल- 80.60 मि.मी., उरण-14.00 मि.मी., कर्जत- 25.60 मि.मी., खालापूर- 22.00 मि.मी., माणगाव- 0.00 मि.मी., रोहा- 16.00 मि.मी., सुधागड-10.00 मि.मी., तळा-2.00 मि.मी., महाड- 7.00 मि.मी., पोलादपूर-11.00 मि.मी, म्हसळा- 18.00 मि.मी., श्रीवर्धन-1.00 मि.मी., माथेरान- 42.30 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 272.50 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 17.03 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 106.96 टक्के इतकी आहे. 00000

उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका):- राज्याचे उद्योग आणि खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री ना.सुभाष देसाई यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             मंगळवार दि. 2 1 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1.00 वा. मुंबई येथून शासकीय मोटारीने खालापूर जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा खालापूर, जि.रायगड येथे आगमन व स्कील ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : पहल नर्सिंग लाईव्ह, जुना रायगड बाजार, पंचायत समिती कार्यालयाजवळ, खालापूर, सायंकाळी 4.30 वा. खालापूर येथून माणगावकडे प्रयाण. मुक्काम- माणगाव.             बुधवार दि. दि. 2 2 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.00 वा. माणगाव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 0000000

पनवेल पंचायत समिती येथे जल सुरक्षकांनी घेतली स्वच्छता शपथ बैठक व प्रशिक्षणही संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका): “ स्वच्छता ही सेवा ” अभियानाची जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता डॉ.ज्ञानदा फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली गतीने अंमलबजावणी   सुरू आहे. त्यानुषंगाने आज पनवेल पंचायत समिती येथील सभागृहात गटविकास अधिकारी श्री.संजय भोये   यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील जल सुरक्षकांची बैठक व प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी संवाद तज्ञ श्री.सुरेश पाटील यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत माहिती दिली. यामध्ये गावात श्रमदान मोहीम राबविणे, घर तिथे शोषखड्डा तयार करणे, सार्वजनिक इमारतींची स्वच्छता व प्लास्टिक संकलन ,भिंती रंगविणे व घोषवाक्य लिहणे, odf plus ठराव घेणे आदी उपक्रमांची चर्चा झाली.   यावेळी उपस्थितांना “ स्वच्छता ही सेवा ” अभियानाची शपथ दिली .   यावेळी मार्गदर्शन करताना गट विकास अधिकारी श्री.संजय भोये म्हणाले की, पाणी दूषित होणार नाही, यासाठी टीसीएलचा   योग्य वापर करा व पाणी   नमुने गोळा करून वेळेत प्रयोग शाळेत पाठविले जातील याची दक्षता घ्यावी. पाण्याचे स्त्रोत सुरक्षित असत

जिल्ह्यात दि.25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये दि.25 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्री.संदीप वि. स्वामी यांनी दिली आहे.         या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट, खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.    राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास संपूर्ण कोर्ट फिस परत मिळते तसेच प्रलंबित व वादपूर्व प्रकरणातील   निकालाविरुध्द अपिल होत नाही. त्यामुळे पक्षकारांचा बराच वेळ व खर्च वाचतो,

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 21.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

             अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.08 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3423.32 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 57.00 मि.मी., पेण- 16.00 मि.मी., मुरुड- 15.00 मि.मी., पनवेल- 31.20 मि.मी., उरण-60.00 मि.मी., कर्जत- 8 .00 मि.मी., खालापूर- 22.00 मि.मी., माणगाव- 4.00 मि.मी., रोहा- 53.00 मि.मी., सुधागड-6.00 मि.मी., तळा-1.00 मि.मी., महाड- 9.00 मि.मी., पोलादपूर-5.00 मि.मी, म्हसळा- 0.00 मि.मी., श्रीवर्धन-32.00 मि.मी., माथेरान- 18.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 337.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 21.08 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 106.43 टक्के इतकी आहे. 00000