Posts

Showing posts from June 23, 2019

छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे कार्य पुढे नेऊ या- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड,दि.26(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीतील एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजातील गोर गरीब, मागासलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले सामाजिक न्यायाचे कार्य आपण साऱ्यांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयतींनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपायुक्त तथा जातपडताळणी समितीचे सचिव विशाल नाईक, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, आनंदराज घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार वितरण तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. आ

शामराव पेजे कोकण इमाव आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या मर्यादेत वाढ

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत   रायगड जिल्ह्यातील इतर मागसवर्ग गरीब, होतकरु व बेरोजगार व्यक्तींना व्यवसाय,स्वयंरोजगार करण्याकरिता अल्प व्याज दराने विविध योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंचवीस हजार रुपयांची थेट कर्ज योजनेची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.                 लाभार्थी पात्रता : अर्जदार इतर मागासवर्गीय प्रवर्गातील   व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.   वय 18 ते 55 वर्षे असावे.   एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.   सिबील क्रेडिट स्कोर किमान 500 इतका असावा.    महामंडळाच्या (केंद्र व राज्य) कोणत्याही योजनेचा थकबाकीदार नसावा.   शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय, निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुण मुले, मुली तसेच अनुभवी व्यक्तींना प्राधान्य.    कर्जाची परतफेड व व्याजदर : कज कर्जांच्या परतफेडीच्या कालावधी 4 वर्षे राहिल.   मासिक हप्ता रु.2085/- कर्जत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्या

राजर्षी शाहु महाराज जयंतीनिमित्त आजपासून (दि.26) विविध कार्यक्रम

              अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 -   राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि..26 पासून दि.25 जुलै पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.      या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यक्रम बुधवार दि.26 रोजी दु.3 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात होणार आहे, असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी रविकिरण पाटील यांनी सांगितले आहे. यानिमित्ताने दि.26 जून ते 25 जुलै 2019 या एक महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात समता दिंडीचे आयोजन, शोभारथ देखावे व सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.   यामध्ये मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रदान करणे,अस्पृश्यता निर्मूलनार्थ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेडेगावांना पारितोषिक वितरण करणे, शाळा महाविद्यालयात निबंध, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करणे अशा कार्यक्रमाचा अंतर्भाव आहे, असेही कळविण्यात आले आहे. राज

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.56 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 174.19 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 1.00 मि.मि., पेण-20.20 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-1.60 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-2.80 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-16.00 मि.मि., सुधागड-9.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-2.00मि.मि., पोलादपूर-26.00, म्हसळा-3.00मि.मि., श्रीवर्धन-2.00 मि.मि., माथेरान-3.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 89.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.56 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   5.70 टक्के इतकी आहे. 0000

पाली-सुधागड येथे मागासवर्गीय मुलींसाठी मोफत वसतीगृह

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24 - सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हे मधली आळी, राम मंदीर रोड, तळयाच्या शेजारी, पाली-सुधागड येथे कार्यरत आहे. येथे इ.8वी पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त्‍ जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ्‍ व अपंग गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. येथे निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. तसेच शैक्षणिक व लेखन साहित्य विनामुल्य पुरविले जाते.   दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून सहाशे रुपये निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दोन संचाकरिता गणवेष भत्ता/ रेनकोट/छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशपात्र विद्यार्थिनींच्या पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु जमाती विदयार्थिनिकरिता अडीच लाख रुपयांच्या आत व विमुक्त्‍ जाती. भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थिनींना एक ला

पनवेल येथे मागासवर्गीय मुलींसाठी मोफत वसतीगृह

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24 -   सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सेक्टर 10, प्लॉट नंबर 21 ग्रीन पार्क सोसायटी समोर पनवेल येथे कार्यरत आहे.     येथे इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग   गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. येथे निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. तसेच शैक्षणिक व लेखन साहित्य   विनामुल्य पुरविले जाते.   दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून सहाशे रुपये निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र महा विद्यालयीन विदयार्थिनींना दोन संचाकरिता गणवेष भत्ता/रेनकोट/छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.                प्रवेशपात्र विद्यार्थिनींच्या पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विदयार्थिनींकरिता अडीच लाख रुपयांच्या आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग   विद्यार्थिनीं

कापडातील घातक, रंग, रसायन तपासणी सुविधा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24 - वस्त्रोद्योगातील घातक रंग, रसायने आदींचे प्रमाण तपासण्यासाठी गॅस डोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोस्कोपी या यंत्राची सुविधा सास्मिरा, मुंबई या संस्थेकडे उपलब्ध करण्यात आली आहे.     रेशिम विकास कार्यक्रम पायाभूत सुविधा निर्मिती व अस्तित्वातील सुविधांचे बळकटीकरण या योजनेंतर्गत सास्मिरा (SAMIRA) मुंबई या संस्थेस Gas Chromatography Mass Spectroscopy (GCMS) ही मशिनरी खरेदी करण्यास शासनाने निधी वितरीत केला आहे.   Gas Chromatography Mass Spectroscopy (GCMS) या यंत्राद्वारे वस्त्रोद्योगातील रेशीम, सूत,कृत्रिम यार्न, कापड, रंग, रसायने व डाईज इत्यादींचे तपासणी करण्यात येऊन कापडातील घातक रंग व रसायनाचे प्रमाण योग्य, अयोग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.   तपासणी अंती निदर्शनास येणाऱ्या अडचणीवर तांत्रिक उपाययोजना देखील सास्मिरा (SAMIRA) मुंबई यांच्याकडून केली जाईल.   तरी सर्व वस्त्रोद्योग घटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग मुंबई, यांनी कळविले आहे. 0000000

अपंगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24 - अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ अपंगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आहे.     या संस्थेत सन 2019-20 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.             प्रवेशासाठी नियम अटी व सवलती पुढीलप्रमाणे : सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर वुईथ एम.एस.ऑफीस (संगणक कोर्स ) किमान इयत्ता आठवी पास.   मोटार ॲण्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रिक कोर्स )   इयत्ता नववी पास. एम.एस.सी.आय.टी. (संगणक कोर्स ) : वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष,प्रशिक्षण कालावधी एक वर्ष.   फक्त अपंग मुलांनाच प्रवेश दिला जातो.           सोई व सलवती : प्रशिक्षण कालावधीत राहण्याची,जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय.   अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा.   भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण.   नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा.   अनुभवी व तज्ज्ञ निदेशक.   उज्वल यशाची पंरपरा.   समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल य

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.76 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 168.63 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.40 मि.मि., उरण-20.00 मि.मि., कर्जत-4.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-2.00 मि.मि., सुधागड-1.00 मि.मि., तळा-1.00 मि.मि., महाड-25.10मि.मि., पोलादपूर-4.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-2.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 108.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.76 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   5.54 टक्के इतकी आहे. 0000