जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.23- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.76 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 168.63 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 2.00
मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.40 मि.मि., उरण-20.00
मि.मि., कर्जत-4.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-2.00
मि.मि., सुधागड-1.00 मि.मि., तळा-1.00 मि.मि., महाड-25.10मि.मि., पोलादपूर-4.00,
म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-2.70 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 108.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.76 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 5.54 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment