Posts

Showing posts from November 24, 2019

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटीत कामगारांसाठी लाभदायी --निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.30 (जिमाका) - जिल्ह्यातील विविध उद्योग व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांच्या वृध्दापकाळासाठी व सामाजिक सुरक्षेसाठी शासनाची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन महत्वाकांक्षी योजना लाभदायक असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे यांनी आज येथे दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात कामगार आयुक्त कार्यालय, पनवेल यांनी असंघटीत कामगारांकरिता प्रधानमंत्री श्रमयोगी योजना व लघु व्यापाऱ्याकरिता राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह साजरा करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.             यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.पद्मश्री बैनाडे पुढे म्हणाल्या की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे, लघु व्यापाऱ्यांकरिता त्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी किंवा त्यापेक्षा कमी असावी,ती व्यक्ती आयकर भरणारी नसावी,कर्मचारी राज्य विमा निगम,भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजना व प्रधानमंत्री मानधन योजनेचा सभासद नसावा.   तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बॅंकेचे पास बुक,इत्यादी कागदपत्रांची आवश

रायगड जिल्हा परिषद मध्ये संविधान दिन साजरा

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.26(जिमाका) - भारतीय संविधान दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहामध्ये वरिष्ठ लेखाधिकारी संजीव मोरे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करुन संविधान दिनाचे महत्व सविस्तरपणे सांगितले.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲङआस्वाद पाटील हे यावेळी उपस्थित होते.   तसेच कार्यक्रमास कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर,माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीम.गीता पालरेचा, कृषि अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी,माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी एम.जी.दळवी   आणि विविध विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते. 00000

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.26(जिमाका) - भारतीय संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.   यावेळी उपस्थितांनी संविधानाप्रति एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञाही केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी       डॉ. विजय सूर्यवंशी हे यावेळी उपस्थित होते.   तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी आणि सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000