Posts

Showing posts from July 30, 2017

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.98 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.6, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.98 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2203.09  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 0.00 मि.मि., पेण-3.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-01.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-1.60 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-1.00 मि.मि., तळा-3.00 मि.मि., महाड-1.30 मि.मि., पोलादपूर-2.00, म्हसळा-6.20 मि.मि., श्रीवर्धन-4.00 मि.मि., माथेरान-4.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 31.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 1.98मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   70.10 % इतकी आहे. 0000

इन्स्पायर ॲवार्डसाठी मागविली ऑनलाईन नामांकने

अलिबाग, दि.5 (जिमाका)- सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी Inspire Award MANAK या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची online   नामांकने सादर करण्याची प्रक्रीया सुरु असून त्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत आहे. इ.6 वी ते इ.10 वी चे वर्ग असलेल्या सर्व प्रकारच्या सर्व व्यवस्थापनाच्या शासनमान्य शाळांना विद्यार्थ्यांचे नामांकन Online सादर करता येतील. ज्या शाळांनी एकदाही सहभाग घेतला नसेल अशा शाळांनी प्रथम एकाचवेळा नोंदणी (One Time Registration) करण्यासाठी वेबसाईट   www.insprireawards-केज   . gov.in   या संकेतस्थळावर Online नामांकने सादर करावी. विद्यार्थ्यांची नामांकने सादर करतांना प्रकल्पाची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे,असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक )रायगड जिल्हा परिषद,अलिबाग यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.05, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.98मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2201.11  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-04.00 मि.मि., पनवेल-03.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.40 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-04.00 मि.मि., रोहा-02.00 मि.मि., सुधागड-02.00 मि.मि., तळा-01.00 मि.मि., महाड-16.00 मि.मि., पोलादपूर-07.00, म्हसळा-03.80 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-04.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 47.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.98मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   70.04 % इतकी आहे. 0000

जीएसटी कार्यशाळेस आहरण संवितरण अधिकाऱ्यांचा प्रतिसाद

Image
अलिबाग,दि.4(जिमाका)- वस्तू व सेवा कर खाते, रागयड विभाग, बेलापूर नवी मुंबई यांच्यावतीने आयोजित जीएसटी कार्यशाळेस जिल्ह्यातील आहरण संवितरण अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे वस्तू व सेवा कर कायद्याखाली टिडीएस संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेस राज्य कर आयुक्त शिवाजीराव केनवडेकर, उप आयुक्त महेश कुलकर्णी, सहाय्यक राज्यकर आयुक्त रुद्रवार, राज्य कर अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना वस्तू व सेवा कर कायद्याअंतर्गत टिडीएस नोंदणी दाखला घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वस्तू व सेवा कर पोर्टल वर टिडीएस नोंदणी दाखला घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.      या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व आहरण व संविरण अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००

लोकशाही दिन यावेळी मंगळवारी

अलिबाग,दि.4(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, ऑगस्ट महिन्यात पहिला सोमवार दि.7 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त स्थानिक सुट्टी आहे. त्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजन त्यानंतर लगेच येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी म्हणजे मंगळवार दि.8 रोजी करण्यात आले आहे.  लोकशाही दिन मंगळवारी दुपारी एक वाजता राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी याबदलाची नोंद घ्यावी व आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात दि.8 रोजी दुपारी एक वाजता सादर करव्यात असे आवाहन,  जिल्हाधिकारी रायगड यांनी केले आहे. 0000

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना नोंदणीकृत सुक्ष्म सिंचन संच विक्रेते, वितरकांना आवाहन

अलिबाग,दि.4(जिमाका)- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  त्यासाठी सुक्ष्म सिंचन संच उत्पादक कंपन्यापैकी सर्वदृष्ट्या वैध असलेल्या  उत्पादकांना सन 2016-17 मध्ये तीन वर्षासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच दि. 13 जुलै 2017 रोजी वैध बी.आय.एस. धारण करणाऱ्या सुक्ष्म सिंचन संच उत्पादक कंपन्यांची यादी संचालक फलोत्पादन कृषि आयुक्तालय पुणे, यांचेकडून महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागांच्या संकेतस्थळावरील ई-ठिबक या आज्ञावलीवर डाऊनलोड या शिर्षाखाली प्रसिद्ध झाली आहे.  या यादीतील उत्पादक कंपन्यांनी प्राधिकृत केलेल्या विक्रेते,वितरकांनी  आपली नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रायगड, राऊत वाडी,वेश्वी ता.अलिबाग जि.रायगड येथे करावी.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड यांनी केले आहे. संपर्कासाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02141-222094 असा आहे.  0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 17 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.04, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.08मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2198.13  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 8.00 मि.मि., पेण-12.00 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-08.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-12.20 मि.मि., खालापूर-14.00 मि.मि., माणगांव-12.00 मि.मि., रोहा-14.00 मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-21.00 मि.मि., महाड-30.00 मि.मि., पोलादपूर-26.00, म्हसळा-34.40 मि.मि., श्रीवर्धन-27.00 मि.मि., माथेरान-22.60 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 273.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 17.08मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची  टक्केवारी   69.95 % इतकी आहे. 0000

भात लावणी 84 टक्के पूर्ण

अलिबाग,दि.3 (जिमाका)- जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे भात लावणीला वेग आला असून आज अखेर भात लागवडी खालील एकूण क्षेत्रापैकी 84 टक्के क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात दिलासादायक पर्जन्यमान झाले आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण सरासरी 2181.05 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  एकूण सरासरी पर्जन्यमानाच्या 69.40 टक्के पर्जन्यमान आतापावेतो नोंदविण्यात आले आहे. यामुळे खरिपाच्या पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे. या संदर्भात कृषि विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 1 लाख 42 हजार 64 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकाची लागवड सर्वाधिक म्हणजे 1 लाख 23 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर नियोजित आहे. त्यापैकी आज अखेर भात पिकाची 1 लाख 4 हजार 44 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. एकूण भात  लागवडीच्या 84 टक्के लावणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक भात लावणी मुरुड, माणगांव, म्हसळा या तालुक्यात 100 टक्के पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात खरीप पिकांत नागली, वरई, अन्य तृणधान्य पिकांची तसेच कडधान्य पिकांची लागवड होत असते. या पेरण्यांनाही वेग आला आहे. एकू

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आज जीसटी प्रशिक्षण

अलिबाग दि.3,(जिमाका)- देशभरात 1 जुलै 2017 पासून जीएसटी कायद्याची अमंबजावणी सुरु झाली आहे. या नवीन कायद्यासंदर्भात देशभरात विविध प्रशिक्षण राबविली जात आहेत. जिल्ह्यातील विविध शासकिय विभागांच्या आहरण संवितरण अधिकाऱ्यांसाठी  शुक्रवार दि.4 रोजी TDS(Tax Deduction at Source) वरील Provision व त्या संबंधीचे Payment ची प्रक्रिया याचे प्रशिक्षण  आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हॉल मध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने  आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सकाळी 11.00 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

Image
अलिबाग, दि. ३(जिमाका) - थोर स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.             यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नन्दनवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे रामदास बघे, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती प्रेमलता जैतू, नाबार्डचे सुधाकर रगतवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रदीप नाईक,बँक ऑफ महाराष्ट्रचे पाटणकर, पंजाब नॅशनल बँकेचे नलावडे आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

पिक कर्ज व पिक विमा योजना: शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे-जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी

Image
अलिबाग, दि.३ (जिमाका)- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना द्यावयाचे पिक कर्ज, पिक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना द्यावयाचे खरीप पिक कर्ज, पिक विमा तसेच कर्ज माफी योजनेअंतर्गत द्यावयाचे १०हजार रुपयांचे अंतरिम कर्ज यांचा जिल्ह्यातील वितरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात विशेष समनव्य, सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नन्दनवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे रामदास बघे, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती प्रेमलता जैतू, नाबार्डचे सुधाकर रगतवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रदीप नाईक,बँक ऑफ महाराष्ट्रचे पाटणकर, पंजाब नॅशनल बँकेचे नलावडे तसेच विविध बँकांचे अधिकारी व शाखाप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पिक कर्ज वाटपाचा बँकांनिहाय आढावा घेतला. कर्ज माफी योजनेत द्यावयाचे १० हजार रुपयांच्या वितरणाबाबत तसेच पिक विमा यासंदर्भात आढावा घेतला. य

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 12. मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.03, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.50मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2181.05  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 4.00 मि.मि., पेण-23.10 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-09.60 मि.मि., उरण-03.00 मि.मि., कर्जत-02.80 मि.मि., खालापूर-16.00 मि.मि., माणगांव-15.00 मि.मि., रोहा-11.00 मि.मि., सुधागड-07.00 मि.मि., तळा-16.00 मि.मि., महाड-30.00 मि.मि., पोलादपूर-12.00, म्हसळा-23.00 मि.मि., श्रीवर्धन-17.00 मि.मि., माथेरान-10.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 200.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 12.50मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   69.40 % इतकी आहे. 0000

देवकुंड धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अलिबाग, दि.2, (जिमाका)- माणगांव तालुक्यातील मौजे भिरा गावचे हद्दीत देवकुंड धबधबा येथे पावसाळ्याच्या कालावधीत पर्यटकांची व नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी च यासाठी धरण,तलाव,धबधब्यांचे 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(4)नुसार नमूद बाबींसाठी  दि. 9 ऑक्टोबर पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, माणगाव यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेआहेत. या आदेशान्वये खालील कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. नैसर्गिक धबधब्याचे परिसरात मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे,अनधिकृत  मद्य विक्री करणे,अनधिकृत मद्य विक्री करणे व उघडया जागेवर मद्य सेवन करणे. सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे. धोकादायक पाण्यात, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.धबधब्याच्या वरील बाजुला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे.रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे.

मागेल त्याला शेततळे शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद; 155 शेततळी पूर्ण

अलिबाग, दि.2,(जिमाका)- ' मागेल त्याला शेततळे' या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने  किमान धारण क्षेत्राची अट शिथील केल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे.  त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात 155 शेततळ्याचे काम पुर्ण झाले आहे.  या संदर्भात कृषि विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यामतून जलसिंचनाची उपलिब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' ही योजना राबविण्यात येत आहे. कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती व शेतकऱ्यांची जमिनधारण क्षमता अत्यल्प असल्याने मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत 0.60 हेक्टर किमान धारण क्षेत्राची अट शिथिल करुन ती 0.02 हेक्टर  करण्यास  दि. 20 मे रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.  त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त् शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आताप

पंतप्रधान पीक विमा योजनेस मुदत वाढ शेतकऱ्यांना सहभागासाठी दि.5पर्यंत मुदत

अलिबाग दि. 2 (जिमाका)- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी  दि.31 जुलै ही मुदत देण्यात आली होती. तथापि शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता व अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कृषि विभागाने  दि. 1 ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करुन दि.5 ऑगस्ट, 2017 पर्यंत मुदत वाढविली आहे.  तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रायगड यांनी केले आहे. ०००००

देवकुंड धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अलिबाग, दि.2, (जिमाका)- माणगांव तालुक्यातील मौजे भिरा गावचे हद्दीत देवकुंड धबधबा येथे पावसाळ्याच्या कालावधीत पर्यटकांची व नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी च यासाठी धरण,तलाव,धबधब्यांचे 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(4)नुसार नमूद बाबींसाठी  दि. 9 ऑक्टोबर पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, माणगाव यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेआहेत. या आदेशान्वये खालील कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. नैसर्गिक धबधब्याचे परिसरात मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे,अनधिकृत  मद्य विक्री करणे,अनधिकृत मद्य विक्री करणे व उघडया जागेवर मद्य सेवन करणे. सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे. धोकादायक पाण्यात, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.धबधब्याच्या वरील बाजुला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे.रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे. व

मागेल त्याला शेततळे: शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद;155 शेततळी पूर्ण

अलिबाग, दि.2,(जिमाका)- ' मागेल त्याला शेततळे' या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने  किमान धारण क्षेत्राची अट शिथील केल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे.  त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात 155 शेततळ्याचे काम पुर्ण झाले आहे.  या संदर्भात कृषि विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यामतून जलसिंचनाची उपलिब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' ही योजना राबविण्यात येत आहे. कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती व शेतकऱ्यांची जमिनधारण क्षमता अत्यल्प असल्याने मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत 0.60 हेक्टर किमान धारण क्षेत्राची अट शिथिल करुन ती 0.02 हेक्टर  करण्यास  दि. 20 मे रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.  त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त् शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यं

पंतप्रधान पीक विमा योजनेस मुदत वाढ:

शेतकऱ्यांना सहभागासाठी दि.5पर्यंत मुदत अलिबाग दि. 2 (जिमाका)- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी  दि.31 जुलै ही मुदत देण्यात आली होती. तथापि शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता व अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कृषि विभागाने  दि. 1 ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करुन दि.5 ऑगस्ट, 2017 पर्यंत मुदत वाढविली आहे.  तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रायगड यांनी केले आहे.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 23 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.02, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 23.41मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2168.55  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 7.00 मि.मि., पेण-21.20 मि.मि., मुरुड-23.00 मि.मि., पनवेल-16.40 मि.मि., उरण-04.00 मि.मि., कर्जत-38.00 मि.मि., खालापूर-15.00 मि.मि., माणगांव-50.00 मि.मि., रोहा-24.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-44.00 मि.मि., महाड-17.00 मि.मि., पोलादपूर-34.00, म्हसळा-32.60 मि.मि., श्रीवर्धन-05.00 मि.मि., माथेरान-28.30 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 374.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 23.41मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   69.00 % इतकी आहे. 0000

अल्पसंख्याकांच्या योजना उर्दू लोकराज्यमार्फत तळागाळापर्यंत -डॉ.गणेश मुळेरोह्यातील अंजुमान माध्यमिक विद्यालयात उर्दू लोकराज्य मेळावा

Image
अलिबाग,दि.1 (जिमाका):- उर्दू लोकराज्य हे शासन  आणि जनता यांच्यातील दुवा असून,अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल,असा विश्वास कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे  यांनी आज येथे व्यक्त केला. कोकण विभागस्तरीय ऊर्दू लोकराज्य मेळावा येथील अंजूमान ऊर्दू माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास कोकण विभागीय उपसंचालक (माहिती )डॉ.गणेश मुळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसीम मुलहक सातारेकर हे होते. कोकण विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर,जिल्हा माहिती अधिकारी,ठाणे अनिरुद्ध अष्टपुत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.मुळे यांनी सांगितले की, भाषा शिकणे हे व्यक्तीमत्व् विकासासाठी आवश्यक  आहे. ऊर्दू  लोकराज्य हे समाजातील ऊर्दू भाषिक घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसोबतच आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक  माहितीही पोहचविण्याचे  काम करते. लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय असून

महाड येथे ऊर्दू लोकराज्य मेळावा संपन्न कांबळेतर्फे महाड गांव होणार राज्यातील पहिले ऊर्दू लोकराज्य ग्राम

Image
अलिबाग,दि.1(जिमाका):- महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड हे गांव राज्यातील पहिले उर्दू लोकराज्य ग्राम होणार, असे आज महाड येथे आयोजित ऊर्दू लोकराज्य मेळावा आयोजन करण्यात आला या मेळाव्यास कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे, जिल्हा माहिती अधिकारी,रायगड मिलिंद दुसाने, सामाजिक कार्यकर्ते महंमद शफी पुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.           कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दुसाने यांनी केले. यावेळी बोलतांना डॉ.मुळे म्हणाले की, समाजातील  त्या भाषेत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी ऊर्दू भाषिकांनी ऊर्दू लोकराज्यचे वाचक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.           यावेळी श्री. पुरकर यांनी कांबळे तर्फे महाड हे गांव लोकराज्य ग्राम होईल, असे घोषित केले.           या कार्यक्रमास महाड येथील ऊर्दू भाषिक महिला, पुरुष, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 000000000

महसूल दिन लोकाभिमुख प्रशासन राबविणे ही सर्वांची जबाबदारी --जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी

Image
अलिबाग दि.01, (जिमाका) :-लोकाभिमुख प्रशासन राबवितांना ते लोकांसाठी राबविले जाते, त्यांना चांगली सेवा देण्यासाठी राबविले जाते हे लक्षात घेवून सर्व लोकसेवकांनी लोकाभिमुख प्रशासन राबविले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज माणगांव येथे केले. महसूल दिनानिमित्त माणगांव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे डिजीटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून ऑनलाईन सातबाराचे उद्घाटन व वितरण  करण्यात आले.याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे, कर्जत प्रांत दत्ता भडकवाड, पनवेल प्रांत भरत शितोले, माणगांव प्रांत बाळासाहेब तिडके, महाड प्रांत विठ्ठल इनामदार, रोह प्रांत रविंद्र बोबले, अलिबाग प्रांत सर्जेराव सोनवणे, श्रीवर्धन प्रांत जयराज सुर्यवंशी तसेच तालुक्यांचे तहसिलदार, नायब तहसिलदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त्‍ त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्या कार्याल