जीएसटी कार्यशाळेस आहरण संवितरण अधिकाऱ्यांचा प्रतिसाद


अलिबाग,दि.4(जिमाका)- वस्तू व सेवा कर खाते, रागयड विभाग, बेलापूर नवी मुंबई यांच्यावतीने आयोजित जीएसटी कार्यशाळेस जिल्ह्यातील आहरण संवितरण अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे वस्तू व सेवा कर कायद्याखाली टिडीएस संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेस राज्य कर आयुक्त शिवाजीराव केनवडेकर, उप आयुक्त महेश कुलकर्णी, सहाय्यक राज्यकर आयुक्त रुद्रवार, राज्य कर अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना वस्तू व सेवा कर कायद्याअंतर्गत टिडीएस नोंदणी दाखला घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वस्तू व सेवा कर पोर्टल वर टिडीएस नोंदणी दाखला घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.     
या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व आहरण व संविरण अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

Comments

  1. कौतुकास्पद कामगिरी आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक