अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावा
रायगड(जिमाका)दि.27:- शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचविता यावा याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चर) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12, 8-अ खाते उतारा, बँक खात्याचा तपशील तसेच आधार संलग्न मोबाईल क्रमांक घेऊन दि.31 मे 2025 पूर्वी आपला शेतकरी ओळख क्रमांक जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र /C.S.C. सेंटर येथे जाऊन तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे. अॅग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे.कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रीस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान क...