Posts

Showing posts from March 21, 2021

दिव्यांगांच्या अनुदानित शाळांमधील मान्यताप्राप्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु

  अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका)- राज्यातील दि.30 जून 2020 पर्यंत बंद पडलेल्या/रद्द केलेल्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा/कर्मशाळांमधील मान्यताप्राप्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्तालयाच्या Google forms मध्ये http://bit.ly/Absorptionapplication अशी लिंक कार्यान्वित करण्यात आली असून त्याव्दारे संबंधित मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवश्यक त्या प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती अपलोड करून आवश्यक ती माहिती दि.31 मार्च 2021 पर्यंत भरावी. या दिनांकापर्यंत प्रमाणित कागदपत्रांसह परिपूर्ण माहिती वरील लिंकमध्ये न भरल्यास संबंधित समायोजनाबाबत कार्यवाही करणे शक्य होणार नाही. तसेच समायोजनासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तात्काळ कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे, याची नोंद जिल्हयातील बंद पडलेल्या/रद्द केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घ्यावी, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांनी कळविले आहे. ०००००

कोविड-19 दरम्यान नवजात शिशू आणि बालकांचा आहार विशेषत: सांसर्गिक रोगांविरुध्द स्तनपान परिणामकारक

  विशेष लेख क्र.15                                                         दिनांक :- 25 मार्च, 2021     सर्वत्र पुन:श्च पसरत चाललेला करोना विषाणूचा प्रादूर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजना यासाठी शासनाने खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे.   जिल्हा प्रशासनाकडूनही जनतेला दैनंदिन स्वरुपात आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत. करोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सर्व स्तरावर प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. यातील एक महत्वाचा घटक आहे.. स्तनदा माता आणि नवजात शिशू..या काळात यांची काळजी कशी घ्यायची, नवजात शिशू आणि बालकाचा आहार काय असावा याविषयी सार्वजनिक आरोग्य विभागानेही काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत.   काय आहेत या सूचना जाणून घेवू या.. पुढील लेखाद्वारे… जन्मापासून पहिल्या तासात बाळाला स्तनपानास सुरुवात करावी तसेच सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध द्यावे.   स्तनपान केल्यामुळे नवजात शिशूचे इतर संभावित आजारापासून संरक्षण होते.   स्तनपान हे नवजात शिशूंना त्या

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत शासनाकडून जिल्ह्याकरिता रु.1 कोटी 94 लाख 50 हजार निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश

  अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका) :- कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे, या उद्देशाने राज्य शासनाने "कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम" ही योजना घोषित केली.               या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात ग्रामीण पर्यटन विकास व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अत्यंत नियोजनबद्ध असा पाठपुरावा केला.   आणि त्याचेच फलित म्हणून सन 2020-21 या आर्थिक वर्षात कोकण ग्रामीण विकास पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर झालेल्या 1)भरडखोल, ता.श्रीवर्धन येथे शिवकालीन विठ्ठल मंदिरासमोर सुशोभिकरण करणे (रुपये 25 लक्ष), 2)कुडगाव, ता.श्रीवर्धन येथे शिवकालीन मंदिरासमोर सुशोभिकरण करणे (रुपये 25 लक्ष), 3)आदगाव, ता.श्रीवर्धन येथील पुरातन मंदिरासमोर सुशोभिकरण करणे (र

मार्च अखेर उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.फिरोज मुल्ला यांचे आवाहन

  वृत्त क्र.241                                                                                                दिनांक:-24 मार्च,2021     अलिबाग,जि. रायगड,दि.24 (जिमाका)- माहे मार्च मध्ये आर्थिक वर्षअखेर कोषागारात सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे संगणक प्रणालीवर ताण येवून प्रक्रिया खंडीत होण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारे माहे मार्चअखेर उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला यांनी केले आहे.                कोषागार व उपकोषागार कार्यालयामध्ये दि.31 मार्च 2021 ही बीम्स प्रणालीव्दारे बीडीएस प्राधिकारपत्र काढण्यासाठीची अंतिम तारीख राहील. महाराष्ट्र कोषागार नियमावलीत नमुना 28 व 31 मध्ये सादर होणारी देयके अंतिम देयके, नियमित प्रमाणके, पावत्या जोडूनच सादर करावीत. प्रपत्र बीजक जोडून सादर केली जाणारी देयके पारीत केली जाणार नाहीत, याची नोंद घेण्यात यावी. ही देयके सादर करताना महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दि. 15 म

सन 2021-22 मधील इयत्ता 6 वी साठी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या तारखेत बदल

    अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-   सन 2021-22 मधील इयत्ता सहावीसाठी पूर्वी घोषित केल्याप्रमाणे दि.10 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे निजामपूर, ता.माणगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस.व्ही.बोभाटे यांनी कळविले आहे.             आता ही निवड परीक्षा दि.16 मे 2021 (रविवार)   रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर व वेळेत घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी व पालकांनी या बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर.चिंचकर, मो.9881351601, श्री.कैलास पी. वाघ, मो.9527256185यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, एस.व्ही.बोभाटे यांनी   केले आहे. ०००००

पाताळगंगा नदीवरील पेण ते खालापूर दरम्यानच्या पूलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी

    अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-   जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील खालापूर पथकर स्थानकाजवळील पेण ते खालापूर राज्य मार्ग क्र.108 ( खालापूर कनेक्टर) वरील पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील पूलावरील वाहतूक दि.22 मार्च 2021 ते दि. 07 मे 2021   या कालावधी दरम्यान पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.   पेण ते खालापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्र.48 ह्या अस्तित्वातील राज्य मार्ग क्र. 104 वरील हलक्या वाहनांची वाहतूक खालापूर पथकर स्थानकाजवळील इंडिया बुल्स वसाहती पासून राज्य मार्ग क्र.88 मार्गे खोपोली शिळफाटा चौक वरुन अनुक्रमे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 मार्गे पुणे, खालापूर, मुंबईकडे जाण्यासाठी वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन केवळ रात्री 9.00 ते सकाळी 6.00   या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरु राहील. या मार्गावरुन सकाळी 6.00 वाजल्यापासून ते रात्री 9.00 वाजेपर्यंत अवजड वाहनांची बाहतूक बंद करण्यात येत असून, या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक पेण-पनवेल- कोन मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर मार्गस्थ करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचा बनावट विदेशी स्कॉच व बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर छापा जवळपास साडेतेरा लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

    अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका):- गुप्त बातमीदाराने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेल, जि.रायगड या कार्यालयालास दिलेल्या बातमीनुसार दि. 20 मार्च 2021 रोजी ईमानूल मर्सिहोम आश्रमच्या बाजूला, नदीकाठी असलेले शेतघर, खैरवाडी, पो. मोर्बे, ता पनवेल जि. रायगड. येथे छापा घातला असता विविध उच्च प्रतीच्या बाटल्यांमध्ये भरणा करुन बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार केलेल्या मद्याच्या सुमारे 750 व 1 हजार मि. ली. क्षमतेच्या एकूण 110 बाटल्या तसेच बनावट मद्य तयार करण्याचे उदा. बुचे, लेबल, टोचे, ब्रश, लॅमिनेशन मशिन इतर साहित्य व महिन्द्रा कंपनीची चारचाकी वाहन व एक ओपो कंपनीची मोबाईल असा एकंदर रुपये 13 लाख 24 हजार 860 किंमतीचा व रोख रक्कम 18   हजार 350 असा मुद्देमाल जप्त केला. तसेच शिबिन दिनेश तिय्यार, वय २७ वर्षे, सुशिलाल सुकुमार तिय्यार, वय ३३ वर्षे या दोघांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 65 (अे) (डी) (ई) (एफ) 81, 83, 86, 90 व 98 अन्वये अटक करण्यात आली आहे. त्यातील फरार आरोपी प्रजीब प्रभाकरण के व जागामालक यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या गुन्हयातील जप्त केलेल्या ब