पाताळगंगा नदीवरील पेण ते खालापूर दरम्यानच्या पूलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-  जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील खालापूर पथकर स्थानकाजवळील पेण ते खालापूर राज्य मार्ग क्र.108 ( खालापूर कनेक्टर) वरील पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील पूलावरील वाहतूक दि.22 मार्च 2021 ते दि. 07 मे 2021  या कालावधी दरम्यान पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

 पेण ते खालापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्र.48 ह्या अस्तित्वातील राज्य मार्ग क्र. 104 वरील हलक्या वाहनांची वाहतूक खालापूर पथकर स्थानकाजवळील इंडिया बुल्स वसाहती पासून राज्य मार्ग क्र.88 मार्गे खोपोली शिळफाटा चौक वरुन अनुक्रमे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 मार्गे पुणे, खालापूर, मुंबईकडे जाण्यासाठी वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन केवळ रात्री 9.00 ते सकाळी 6.00  या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरु राहील. या मार्गावरुन सकाळी 6.00 वाजल्यापासून ते रात्री 9.00 वाजेपर्यंत अवजड वाहनांची बाहतूक बंद करण्यात येत असून, या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक पेण-पनवेल- कोन मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर मार्गस्थ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र.48वरुन खालापूर मार्गे पेणकडे जाणारी हलक्या वाहनांची वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वरील खोपोली शिळफाटा चौक पासून राज्य मार्ग क्र.88 मार्गे इसांबा ते सावरोली ते राज्य मार्ग क्र.104 ते पेणकडे अशी वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन केवळ रात्री 9.00 ते सकाळी 6.00 या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरु राहील. या मार्गावरुन सकाळी 6.00 वाजल्यापासून ते रात्री 9.00 वाजेपर्यंत अवजड बाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून, या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक ही राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वरुन कोन- पनवेल-पेण या मार्गे मार्गस्थ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वरुन खालापूर मार्गे पुणेकडे जाणारी हलक्या वाहनांची वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वरील खोपोली शिळफाटा चौकापासून राज्य मार्ग क्र.88 मार्गे इसांबा ते सावरोली ते राज्य मार्ग क्र.104 ते खालापूर पथकर स्थानक मार्गे पुणे अशी वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन केवळ रात्री 9.00 ते सकाळी 6.00 या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरु राहील. या मार्गावरुन सकाळी 6.00 वाजल्यापासून ते रात्री 9.00 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून, या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक कोन येथील पूलापासून द्रुतगती मार्ग ते खालापूर पथकर स्थानकमार्गे पुणेकडे मार्गस्थ करण्यात आली आहे.

            जेएनपीटी ते कोन ते खालापूर मार्गे राज्य मार्ग क्र.104 वरुन खालापूर पथकर स्थानकामार्गे पुणेकडे जाणारी हलकी व अवजड वाहनांची वाहतूक कोन येथील उड्डाणपूलाच्या उतारावरुन यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाला मिळून खालापूर पथकर स्थानकामार्गे पुणेकडे वळविण्यात आली आहे.

            तरी नागरिकांच्या सोयीसाठी या वाहतूक नियोजन बदलाची नोंद सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक