Posts

Showing posts from December 10, 2023

धेंरड-शहापूर येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री उदय सामंत

Image
    रायगड,दि.16(जिमाका):- अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर येथील एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहेत,त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित धेरंड-शहापूर भूसंपादनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे आदिंसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.     पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला पाहिजे,ही भूमिका एमआयडीसीने घेतली आहे.  पहिला हा भाव रु.35 लाख होता, दुसरा भाव रु.50 लाख, तिसरा रु.60 लाख आता यामध्ये वाढ करुन तो रु.70 लाखापर्यंत नेला आहे. अजूनही यामध्ये कॅल्यूलेशन करुन काही वाढीव देता आले तर त्यासाठीही प्रयत्न केले जातील.  या प्रकल्पामुळे सहा गावे प्रकल्पबाधित होणार आहेत. या प्रकल्पाबाधित सहा गावांच्या नागरी सुविधांसाठ

शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे- पालकमंत्री उदय सामंत

Image
    सर्व विभागानी काटेकोरपणे नियोजन करावे --महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे   ★ रायगड येथे 5 जानेवारी 2024 रोजी "शासन आपल्या दारी" उपक्रमाचे भव्य आयोजन ★ शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांचे दालन उभारणार     रायगड,दि.16 (जिमाका):- खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने  “ शासन आपल्या दारी ”  हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.       "शासन आपल्या दारी" या अभियानानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दि.5 जानेवारी 2024 रोजी रायगड जिल्ह

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

  रायगड दि.15(जिमाका):-   मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय ,  नौकानयन , डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01  जानेवारी 2024   पासून मत्स्यव्यवसाय  प्रशिक्षण केंद्र रायगड-अलिबाग येथे   सुरु होणा ऱ्या  प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांनी  दि.31 डिसेंबर 2023  पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी गणेश टेमकर यांनी केले आहे. या  प्रशिक्षणां तर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या  57  फूट लांबी असलेल्या 63.35 टनेज क्षमतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205    अश्वशक्तीचे इं जि न असलेल्या  "मत्स्यप्रबोधिनी"  नोंदणी क्र.  IND-MH- 3- MM- 4266  या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाणार आहे. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे-  प्रशिक्षण कालावधी  दि. 01  जानेवारी  202 4  ते दि.30 जून 202 4  ( 6 महिने)   आवश्यक    पात्रता- उमेदवाराचे वय  18  ते  35  वर्ष असावे ,   ( आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे),   उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक ,

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड दि.15(जिमाका):-   राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि.16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा.सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने निळगुण ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा.निळगुण ता.माणगाव येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मौजे निळगुण बामणोली राजीवली रस्ता भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.  सकाळी 11:30 वा. रिळे सामाजिक सभागृह भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थित.  दुपारी 12 वा.चापडी उणेगाव रस्ता भूमिपूजन व कापडी सामाजिक सभागृह भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12:30 वा.चापडी ता. माणगाव येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेकडे प्रयाण. दुपारी 12:45 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आगमन व रायगड जिल्हा शासन आपल्या दारी कार्यक्रम नियोजनासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थित. स्थळ:- कॉन्फरन्स हॉल डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता. माणगाव.  दुपारी 2.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लो

पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड दि.15(जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत हे   शनिवार दि. 16 डिसेंबर 2023  रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 16 डिसेंबर 2023  रोजी  11.30 वा. दादर पूर्व येथून मोटारीने महालक्ष्मी रेसकोर्स, मुंबईकडे प्रयाण दुपारी 12.00 वा. महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. हेलिकॉप्टरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हेलिपॅड, जि. रायगड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. रायगड जिल्हा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक स्थळ : कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड. दुपारी 2.30 वा. लोणेरे येथून हेलिकॉप्टरने आर.सी.एफ. क्रिडा संकुल, कुरुळ हेलिपॅड ता.अलिबागकडे प्रयाण. दुपारी 2.50 वा. हेलिकॉप्टरने आर.सी.एफ. क्रिडा संकुल, कुरुळ हेलिपॅड, ता.अलिबाग येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा

गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी रायगड येथे कार्यालय कार्यान्वित

  रायगड दि.15(जिमाका):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत गुरव समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची शासनाने स्थापना केली असून गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी रायगड येथे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक   निशिकांत  नार्वेकर  यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजातील नागरिकांनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या .,  श्री राम समर्थ सहकारी गृह .  संस्था मर्या .,  रुम नं . 101,  पहिला मजला ,  चेंढरे ,  हनुमान मंदिराच्या मागे ,  ता .  अलिबाग ,  जि.रायगड ,  ( संपर्कासाठी दुरध्वनी क्र . 02141-224448)  येथे संपर्क साधावा . 0000000

जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त आयोजित जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न

Image
  रायगड दि.14(जिमाका) :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्यामार्फत  जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त  जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यामध्ये कु.स्नेहल सचिन जाधव, इयत्ता  9 वी, (के.एस.ओ.अलिबाग) या विद्यर्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.      या  जिल्हा  प्रश्न मंजुषा स्पर्धेत 19 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.  या स्पर्धाचा निकाल पुढीलप्रमाणे कु.स्नेहल सचिन जाधव, इयत्ता  9 वी, के.एस.ओ.अलिबाग या विद्यर्थिनीने प्रथम क्रमांक व कु.अविष्कार रविंद्र कदम , इयत्ता  9 वी, डी.के ई.टी. अलिबाग या विद्यार्थाने  द्वितीय क्रमांक मिळविला आहे.  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,  जिल्हा रुग्णालय, अलिबाग संजय माने  यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.    कु.स्नेहल सचिन जाधव व कु.अविष्कार रविंद्र कदम यांची  रायगड जिल्हयातून महाराष्ट्र राज्य प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धे

गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

    रायगड दि.14(जिमाका)   :-  गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून कुरुळ ते उसर अशी सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता कुरुळ ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि.15 डिसेंबर 2023 व दि.19 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 03.00 ते 10   वाजेपर्यंत बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ.योगशे म्हसे यांनी  जारी केली आहे. यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-आक्षी मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग मार्ग तसेच अलिबाग ते रोहा बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-आक्षी-नागाव-चौलनाका- वावेफाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग आहेत. भारत सरकारच्या गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून कुरूळ ते उसर अशी सेल (CARGO) चर्चा वाह तू क करण्याचे काम Total Movements Pvt. Ltd या कंपनीला मिळालेले आहे.  या  सेलची रूंदी  6 . 53  मिटर व उंची  10  मिटर आहे. अलिबाग रोहा रस्ता रा.प.म. 91  किलोमिटर  2 / 200  ते  14 / 00  दरम्यान उसर येथील गेल कंपनीपर्यंत  या  सेलची वाहतुक ही दि. 07 डिसेंबर 2023  रोजी पा सू न पुढील  03  टप्यामध्ये वेगवेगळ्या त

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सन-2023 पुस्तिकेचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याहस्ते प्रकाशन

Image
  रायगड(जिमाका)दि.13 :-  अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन' यांच्या निर्देशानुसार "जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन" हे प्रकाशन दरवर्षी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार सन-2022-23 या वर्षाकरिताची  “ जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन ”   पुस्तिका 'जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रायगड' कार्यालयामार्फत तयार करण्यात आली असून या पुस्तिकेचे  प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पन्न व शुल्क विभाग रविराज कोले, उपसंचालक,जिल्हा सांख्यिकी कार्यालय श्रीमती वृषाली माकर तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या  “ जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन ”  पुस्तिकेत जिल्हास्तरीय विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्राच्या स्थितीबाबतची तालुकानिहाय सांख्यिकी आकडेवारी देण्यात आली आहे. ०००००००

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने आरोग्य यंत्रणाशी संबंधित विविध प्रश्न मार्गी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य

रायगड(जिमाका)दि.12 :-  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल,असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. रोहा महिला बाल रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयाबाबत विधानभवन नागपूर येथील मा.मंत्री महोदयांचे दालन क्र.206 येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अवर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मिलींद म्हैसकर,  सार्वजनिक आरोग्य विभाग आयुक्त श्री.धिरजकुमार, सहसंचालक (रुग्णालय),आरोग्य सेवा डॉ.विजय कंदेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने आदि उपस्थित होते.  भुवनेश्वर ता रोहा, जि.रायगड येथे 100 खाटांचे महिला रुग्णालय नवजात शिशु कक्षासह स्थापन करण्याबाबत शासनाने दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. रुग्णालयासाठी आवश्यक 1 हेक्टर 61 आर जागा आरोग्य विभागाकडे जिल्हाधिकारी रायगड यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत केली आहे. या 100 खाटाचे रुग्णालय व निवासी गाळे बांधकामाचा आराखडा तयार करुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर क

शेतकऱ्यांनी आंबा पिकाची काळजी घ्यावी-उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे,

  रायगड(जिमाका)दि.12:-  बदलत्या हवामानामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या आंबा पिकाचे निरीक्षण करुन वेळीच उपाययोजना कराव्यात, जेणेकरून किड व रोगांपासून आपल्या आंबा पिकाचे संरक्षण होईल, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी दिली आहे. यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात :- आंबा पालवीवर तसेच मोहरावर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असून रोगामुळे कोवळ्या पानांवर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले डाग दिसून येतात. करपा रोगामुळे मोहोर तांबुस होवून वाळतो तसेच फुलगळ होते. रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्बन्डॅझिम 12 टक्के + मन्कोझेब 63 टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची नाशकाची 20 ग्रॅम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  आंबा बागेमध्ये कोवळया पालवीवर मिज माशी तसेच शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असून शेंडे पोखरणारी अळी पालवीच्या दांड्याला छिद्र पडून आत शिरते व आतील भाग पोखरून खाते. परिणामी किडग्रस्त फांदी सुकून जाते. प्रादुभित भागात अळीची विष्ठा व मृतपेशी आत राहिल्यामुळे फांद्यांवर गाठी निर्माण होतात व अशा फांद्या अशक्त रा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत गावपातळीवरील विशेष मोहिमेचे आयोजन

   रायगड(जिमाका)दि.12:-   पी. एम. किसान योजनेच्या 16 वा हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी.एम.किसान योजनेच्या या 45 दिवसांच्या मोहिमेमध्ये योजनेच्या निकषांच्या अधिन राहून पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी,  असे आवाहन कृषी संचालक   (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय , पुणे ( दिलीप झेंडे ) यांनी केले आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  (PM KISAN)  योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुं बास ( पती ,  पत्नी व त्यांची  18  वर्षाखालील अपत्ये) रु.  2000/-  प्रती हप्ता या प्रमाणे  तीन समान  हप्त्यात प्रती वर्षी रू.  6000/-  लाभ  अदा करण्यात येत   आहे.  लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. राज्याच्

शासकीय योजना घरोघरी नेणाऱ्या संकल्प यात्रेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

    रायगड (जिमाका) दि.11 :-  भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहिम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.  मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे. जनजाती गौरव दिनापासून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या देशातील 110 जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून उर्वरीत सर्व जिल्ह्यात यात्रा सुरू करण्यात आली असून 26 जानेवारीपर्यंत देशातील सर्व भागात पोहोचणार आहे. यात्रेच्या निमित्ताने लाभार्थ्यांशी संवाददेखील साधण्यात येत आहे. ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवासाठी शिबीरांचे आयोजन शिबिराचा लाभ घेण्याचे खा. तटकरे यांचे पत्ररुपी भावनिक आवाहन

    रायगड (जिमाका) दि.11 :-  खा. सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने रायगड जिल्हा लोकसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यकते नुसार कृत्रिम अवयव वाटप करण्यासाठी तालुकानिहाय मोजमाप शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.खा. तटकरे यांनी सर्व दिव्यांग बांधवाना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. रायगड जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये दि. 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेतंर्गत  कृत्रिम अवयव मिळण्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी व मोजमाप घेण्यात येणार आहे. यामध्ये तीन चाकी सायकल, कॅलीपर, कुबडया, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, सीपीचेअर, व्हिलचेअर, ब्लाइंड डिजिटल स्टिक, मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक किट,कानाचे डिजिटल श्रवणयंत्र, उच्च शिक्षण घेणाऱ्या १००% अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट मोबाईल फोन,  दिव्यांगत्वाचे 80% पेक्षा अधिक प्रमाण असलेल्या अस्थिव्यंग व्यक्तींना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल देण्यात येणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. :- दिव्यांग व्यक्तीकडे वैद्यकीय मंडळाकडील UDID प्रणालीचा 40% वरील दाखला, दिव्या