दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवासाठी शिबीरांचे आयोजन शिबिराचा लाभ घेण्याचे खा. तटकरे यांचे पत्ररुपी भावनिक आवाहन

 

 

रायगड (जिमाका) दि.11 :- खा. सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने रायगड जिल्हा लोकसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यकते नुसार कृत्रिम अवयव वाटप करण्यासाठी तालुकानिहाय मोजमाप शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.खा. तटकरे यांनी सर्व दिव्यांग बांधवाना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

रायगड जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये दि. 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या योजनेतंर्गत  कृत्रिम अवयव मिळण्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी व मोजमाप घेण्यात येणार आहे. यामध्ये तीन चाकी सायकल, कॅलीपर, कुबडया, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, सीपीचेअर, व्हिलचेअर, ब्लाइंड डिजिटल स्टिक, मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक किट,कानाचे डिजिटल श्रवणयंत्र, उच्च शिक्षण घेणाऱ्या १००% अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट मोबाईल फोन,  दिव्यांगत्वाचे 80% पेक्षा अधिक प्रमाण असलेल्या अस्थिव्यंग व्यक्तींना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल देण्यात येणार आहेत.

या योजनेच्या लाभासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. :- दिव्यांग व्यक्तीकडे वैद्यकीय मंडळाकडील UDID प्रणालीचा 40% वरील दाखला, दिव्यांग व्यक्तींचा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार च्या आत, . रहिवाशी दाखला अथवा रेशनकार्ड झेरॉक्स प्रत,  दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्डची झेरॉक्स प्रत.हे सर्व दाखले या शिबीरास्थळी दिव्यांग व्यक्तींना घेऊन येणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- म्हसळा आणि श्रीवर्धन तालुका 16 डिसेंबर 2023- श्रीवर्धन न.प.शाळा क्रमांक 1, महाड तालुका 17 डिसेंबर -कोटेश्वरी सभागृह, कोटेश्वरी तलावा जवळ महाड , माणगांव, तळा तालुका दि 18 डिसेंबर- गांधी हॉल, निजामपूर रोड माणगांव, पोलादपूर ता. दि. 19 डिसेंबर पंचायत समिती पोलादपूर,सुधागड तालुका दि.20 डिसेंबर बल्लाळेश्वर देवस्थान भक्ती निवास क्र.1,रोहा तालुका दि. 21 डिसेंबर- जेष्ठ नागरिक सभागृह रोहा,मुरूड तालुका दि 22 डिसेंबर -दरबार हॉल, मुरूड, अलिबाग तालुका दि 23 डिसेंबर कान्होजी आंग्रे समाधी जवळ, न.प.शाळा क्रमांक 1 अलिबाग,पेण तालुका दि. 24 डिसेंबर आगरी समाज हॉल पेण.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक