Posts

Showing posts from May 7, 2023

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी -- पालकमंत्री ना.उदय सामंत

                                                 अलिबाग,दि.12(जिमाका) :-   शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बियाणे, पीककर्ज पुरवठा सुरळीत होईल, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी त्याचबरोबर जिल्ह्यात भात वरी पिकांबरोबरच नाचणी, तूर पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.              पालकमंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हा नियेाजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे तर जिल्हा नियोजन सभागृहात आमदार रविंद्र पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी श्री.सुनिल थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सत्यजित बडे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले व इतर विभागांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.             जिल्हा कृषी विभागाने केले

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

    अलिबाग,दि.12 (जिमाका):  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हे गौरीनंदन अपार्टमेंट, गणेशमंदीर शेजारी, विजय नगर, वरसोली- अलिबाग, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहाची मान्य संख्या 75 आहे. या वसतिगृहात इ.8  वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:- अनुसूचित जाती- 80 टक्के अनुसूचित जमाती- 03 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05 टक्के, आर्थिक मागास व इतर मागास वर्गातील दारिद्रयरेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग- 02 टक्के, अनाथ- 02 टक्के, अपंग- 03 टक्के. या वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.वसतिगृहात विद्यार्थ्याकरिता मोफत निवासव्यवस्था आहे. वसतिगृहामध्ये नाष्टा व भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे.  नाश्ता :-  दररोज पोहे/ शिरा/उपीट इ. पैकी एक आलटून पालटून तसेच उकडलेली दोन अंडी, एक सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध दररोज नाष्ट्यासाठी विनामूल्य देण्यात येते.   भोजन व्यवस्था :-  दुपार व सायंकाळी जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड, सलाड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. वसतिगृहामध्ये 8 वी त

मराठा, कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या "सारथी" संस्थेचे मुंबई विभागीय कार्यालय खारघर येथे सुरु

Image
  अलिबाग,दि.12 (जिमाका):-  राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. संस्थेच्या मुंबई विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. हे मुंबई विभागीय कार्यालय एमटीएनएल इमारत, रेनट्री मार्ग, सेक्टर 21, खारघर ता.पनवेल, जि.रायगड येथे सुरु करण्यात आले आहे.  या कार्यालयाचा ई-मेल आयडी  sarthikharghar@gmail.com , असून Website  https://sarthi-maharashtragiv. in/en , ही आहे.                रायगड जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाज बांधवांनी विभागीय कार्यालयास भेट द्यावी व सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मुंबई विभागीय कार्यालयाचे प्रमुख व सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी श्री.संदिप पवार यांनी केले आहे. ०००००००

महिला लोकशाही दिनात तक्रारी मांडण्याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांचे आवाहन

                 अलिबाग,दि.12 (जिमाका):-  महिलांचे प्रश्न तसेच समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या तर तालुका स्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. या महिला लोकशाही दिनात तक्रारी मांडण्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती वाघमारे एस.एम. यांच्याशी 9834746068 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.विनीत म्हात्रे यांनी केले आहे.              सर्व स्तरातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा,या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महिला लोकशाही दिन राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर राबविण्यात येतो.              जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह चालविण्यास इच्छुक व्यक्ती/संस्थांनी निविदा सादर कराव्यात

               अलिबाग,दि.12 (जिमाका):-  औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात एकूण पाच इमारती असून दीड हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्याना येथे व्यवसाय शिक्षण दिले जाते. त्याकरिता उपलब्ध असलेला शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग जवळपास 200 च्या आसपास आहे. या प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जेवण व अल्पोपहार तसेच इतर खादय पदार्थ स्वच्छ व स्वस्त दरात संस्थेच्या आवारात उपलब्ध करुन दयायचे असल्याने शासनाने घालून दिलेल्या खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून महिला  गटाच्या आहार व्यवस्थापक ठेकेदारास " ज्यांना महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण, अल्पोपहार, चहा, कॉफी इ. खादय पदार्थ उत्तमरित्या पुरविण्याचे व शासकीय खाजगी उपहारगृह अथवा  फिरते उपहारगृह (Mobile Canteen) चालविण्याचा अनुभव आहे. त्यांच्याकरिता संबंधित अटी व शर्ती, निविदा सूचना, विहित निविदा नमुना व महत्वाच्या इतर सूचना या संस्थेत उपलब्ध करण्यात आलेल्या असून त्याच्या छापील प्रतींची किंमत रुपये 100/- अशी आहे.              निविदे प्रक्रियेबद्दल अन्य काही महत्वाच्या अटी- करारपत्र 11 महिन्यांकरिता (Leave Licen

केंद्र शासनाच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा “आपल्या गावातच”

               अलिबाग,दि.12 (जिमाका):-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबास रु.2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे रु.6 हजार प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे.  केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.              सद्य:स्थितीनुसार रायगड जिल्ह्यातील  23 हजार 180 लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.             लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील "पोस्ट मास्तर" यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट  बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे.  हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडला जाईल.ही पद्धत कोणत्याही अतिरिक

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सर्वसामान्य रुग्णांसाठी कार्यान्वित

  अलिबाग,दि.११ (जिमाका) :-  जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे क्ष-किरण विभागातील सिटीस्कॅन मशीन दि.५ मे २०२३ पासून तांत्रि‍क बिघाडामुळे बंद होती. या मशिनची दुरुस्ती करण्यात आली असून यासाठी रुपये ४ लाख खर्च आला आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.सुहास माने व क्ष-किरण विभागातील तांत्रिक कर्मचारी श्री.तरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून सद्य:स्थितीत अलिबाग जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सर्वसामान्य रुग्ण, दारिद्रय रेषेखालील, अपंग व गरीब आणि इतर रुग्णांसाठी कार्यान्वित केली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे. 000000

जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ९९५ विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

  अलिबाग,दि.१० (जिमाका) :- सर्व शिक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या १ लाख ८९ हजार ९९५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.       जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.        सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ९९५ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि

उद्योग/व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळण्याकरिता इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.१० (जिमाका) :- शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनी मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी, मादगी या १२ पोट जातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता, स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग/व्यवसाय करण्यासाठी महामंडळाच्या २० कलमी कार्यक्रम २००६ कलम १० (३४) अ नुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग करिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट २५, बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट २० प्राप्त असून अर्ज मागविण्यात येत आहेत.               यासाठी अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा,  अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे, अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.३ लाखापेक्षा जास्त नसावे, एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षित असावा, अर

“सामाजिक न्याय समता पर्व”चा समारोप कार्यक्रम संपन्न

  अलिबाग,दि.10(जिमाका) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  “ सामाजिक समता पर्व ”  कार्यक्रमांतर्गत दि.01 एप्रिल ते दि.02 मे 2023 या कालावधीत विविध कार्यक्रम घेवून समता पर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड अलिबाग यांच्या वतीने साजरा करण्यात आला. दि.02 एप्रिल ते दि.02 मे 2023 या कालावधीत निबंध, वक्तृत्व व पथनाटय स्पर्धा घेण्यात येवून शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, जेष्ठ नागरिक, तृतीय पंथी व्यक्ती इत्यादीसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.              समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांच्या प्रसिध्दीसाठी पथनाटयाव्दारे मातंग समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन योजनांची प्रसिध्दी करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अलिबाग बीच पर्यत वॉकेथॉन (walkthon) 2023 चे आयोजन करण्यात येवून अलिबाग बीच ची साफसफाई करण्यात आली.                 कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेची कार्यशाळा घेवून योजनेची प्रसिध्दी करण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूच

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र महाड तर्फे पुरुषांचा सन्मान

  अलिबाग,दि.१०(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्फत राबविण्यात येत असलेल्या नवतेजस्विनी कार्यक्रमांतर्गत जेंडर ॲड न्यूर्टिशन या घटकांतर्गत "Gender Sensitive Role Model Award " सन्मान पुरस्कार सोहळा महाड येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र, महाड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता.         या सोहळ्यात सन्मानार्थीना गटविकास अधिकारी महाड श्री.एन.शिवराज प्रभे, आयसीडीएस (ICDS) अधिकारी श्रीमती हेमांगी गाडगे, पोलीस निरीक्षक श्री.गणेश पवार, सीएमआरसी (cmrc) अध्यक्ष भाग्यश्री मराठे यांच्या हस्ते  पुरस्कार प्रदान करण्यात आले.     महिला सक्षमीकरणात पुरुषांचाही हातभार लागत आहे व स्त्रियांकडून पुरुषांचा सन्मान या ठिकाणी होत आहे, हा आगळावेगळा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ राबवित आहे, हे खूप कौतुकास्पद आहे, असे मत महाड गटविकास अधिकारी श्री.एन.शिवराज प्रभे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.       यावेळी महाड तालुक्यातील २५ पुरुषांना सन्मानचिन्ह देऊन  “ सुधारक सन्मान ”  या  पुरस्काराने

परसातील कुक्कुट पालन योजनेसाठी इच्छूक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.१०(जिमाका) :- रायगड जिल्ह्यामध्ये परसातील कुक्कुट पालनास प्रोत्साहन देत, ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे, ही योजना २०१७-१८ पासून राबविण्यात येत आहे. पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड, सुधागड- पाली या तालुक्यातून पुरेसा प्रतिसाद अद्यापपर्यंत न मिळाल्याने या योजनेसाठी नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत.वरील चार तालुक्यातून प्राप्त अर्जातून प्रत्येकी एका लाभार्थ्याची जिल्हा निवड समिती मार्फत निवड करण्यात येईल.                या योजनेंतर्गत जमीन-२ हजार ५०० चौरस फूट (१००० चौरस फुटाचे २ शेड) खाद्य, अंडी साठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्या, जमीन व खोल्या लाभार्थीच्या स्वतःच्या मालकीच्या असतील, एकूण अंदाजित किंमत निरंक. प्रति १००० चौरस फूटाचे २ पक्षीगृहाचे बांधकाम, स्टोअर रूम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण, शासन + लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत रु.४ लाख. खाद्य व पाण्याची भांडी, ब्रडर, इतर उपकरणे व लसीकरण, शासन + लाभार्थी, अंदाजित किंमत रु.५० हजार. अंडी उबवणूक यंत्

चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक नोंदणीकरिता आगाऊ अर्ज स्विकारणे व लिलाव कार्यपद्धती सुरु

  अलिबाग,दि.८(जिमाका):-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दिनांक ११ मे २०२३ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी ०२.३० या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. ११ मे २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि. १२ मे  २०२३ रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी २.३० वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी ३०१ रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षणचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी व

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेस नव्याने सुरुवात अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना घेता येणार या योजनेचा लाभ

    अलिबाग,दि.8(जिमाका) :-   राज्यामध्ये ०६ मे २०१७ पासून मार्च २०२१ अखेर पर्यंत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. महाराष्ट्र शासन, मृद व जलसंधारण विभागाच्या दि २० एप्रिल २०२३ अन्वये ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्था यांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे. तसेच अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल याकरिता अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री आणि इंधन याकरिता रु.३१/- प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी रु.३५.७५ प्रति घनमीटर प्रमाणे एकरी रु.१५ हजारच्या मर्यादेत व २.५ एकर (रु. ३७,५००/-) पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. अभियानामध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्था यांनी तालुकानिहाय संबंधित उपअभियांता यांच्याशी संपर्क करून मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जलसाठ्यांची माहिती घेऊन, संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव सोबत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती. गाळमुक्त धर

इ.१० वी व इ १२ वी च्या परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यासाठी पनवेल येथे समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

  अलिबाग,दि.8(जिमाका) :-   कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये विद्यार्थ्याच्या समुपदेशन मेळाव्याचे आयोजन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते समुपदेशन मेळाव्याचे उद्धघाटन करण्याचे आदेशित केले आहे.             त्यानुसार इ.१० वी / १२ वी नंतरचे महाविद्यायालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यायालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना यांची माहिती, भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण या विषयाची माहिती होण्याकरिता इ.१० वी व इ १२ वी च्या परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यासाठी शुक्रवार दि.११ मे, २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, नाटयगृह, पनवेल येथे समुपदेशन मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये वरील विषयावर नामांकित वक्त्याकडून समुपदेशन करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने रायगड जिल्हातील विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ वारसदारांना मिळणार तालुका स्तरावरच

    अलिबाग,दि.8(जिमाका) :-  शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात व मानवनिर्मित तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. घरातील व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना 2005-06 पासून राबविण्यात येत आहे. पूर्वी विमा कंपनी तसेच विमा सल्लागार कंपनी यांचा असमाधानकारक कामाचा अनुभव, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला अत्यंत उशिराने मिळणारी मदत व जुजबी त्रुटी काढून वारंवार प्रस्ताव नाकारण्याची विमा कंपनी यांची भूमिका यामुळे शासनाने योजनेत बदल करून दि.19 एप्रिल 2023 पासून अपघाती मृत्यू/अपंगत्व यासाठी नवीन "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" राबविण्यास मान्यता दिली आहे. या नवीन योजनेत मागील योजनेतील त्रुटी काढून शेतकऱ्यांसाठी अनुकूल अशी कार्यपद्धती अवलंबली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रस्ताव मंजूरीचे अधिकार तालुकास्तरावरी

जिल्हा कोषागाराच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी दि.११ मे रोजी मेळाव्याचे आयोजन

  अलिबाग,दि.८(जिमाका):-  जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा दि.११ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जंजिरा सभागृह, पोलीस परेड मैदान, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.  तरी रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.देविदास टोंगे यांनी केले आहे. 0000000

रसायने व इतर साहित्य पुरवठादार इच्छुक डिलरने/कंपनीने दरपत्रके सादर करावीत --जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी

अलिबाग, दि.8(जिमाका):-  जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी प्रयोगशाळा, रायगड-अलिबाग, सन 2023 - 24 आर्थिक वर्षासाठी मृदा नमुने तपासणीसाठी खालील प्रमाणे केमिकल (रसायने) व साहित्यांची आवश्यकता आहे, तरी इच्छूक डिलरने/ कंपनीने दि.12 मे 2023 रोजी    सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सीलबंद पाकीटामध्ये जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी प्रयोगशाळा, रायगड-अलिबाग या कार्यालयास दरपत्रके सादर करावीत. त्यानंतर आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. दरपत्रके त्याच दिवशी 5:30 वा. उघडण्यात येतील.    रसायने/साहित्य:-   1)फिल्टर पेपर 42 नंबर- 1 पॅकेट, फिल्टर पेपर 1 नंबर- 1 पॅकेट, कल्पी पेपर (इंडिका) -1 पॅकेट, सल्फ्युरिक ॲसिड (H2SO4)- 5 लिटर, सोडियम बायकार्बोनेट 500 ग्रॅम, सोडियम क्लोराईड 500 ग्राम, हायड्रोक्लोरीक ॲसिड (HCL) 500 मि.ली., अमोनियम ॲसिटेड 500 ग्रॅम, चारकोल डार्को 500/250 ग्रॅम, पोटॅशियम डायक्रोमेट 500 ग्रॅम, अमोनियम ॲसिटेड 100 ग्राम, ॲजोमॅथिन एच 25 ग्रॅम, पोटॅशियम परमॅग्नेट (KMNO4) 500 ग्रॅम, सोडियम हायड्रॉक्साइड 500 ग्रॅम, बोरिक ॲसिड 500 ग्रॅम, सोडियम हॅक्सामेटा फॉस्फेट 500 ग्रॅम, सोडिय

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील विद्यार्थी व इतर कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह चालविणाऱ्या इच्छुक व्यक्ती/संस्थांनी निविदा सादर कराव्यात

             अलिबाग,दि.8(जिमाका):-  औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात एकूण पाच इमारती असून दीड हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्याना येथे व्यवसाय शिक्षण दिले जाते. त्याकरिता उपलब्ध असलेला शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग जवळपास 200 च्या आसपास आहे. या प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जेवण व अल्पोपहार तसेच इतर खादय पदार्थ स्वच्छ व स्वस्त दरात संस्थेच्या आवारात उपलब्ध करुन दयायचे असल्याने शासनाने घालून दिलेल्या खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून महिला    गटाच्या आहार व्यवस्थापक ठेकेदारास " ज्यांना महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण, अल्पोपहार, चहा, कॉफी इ. खादय पदार्थ उत्तमरित्या पुरविण्याचे व शासकीय खाजगी उपहारगृह अथवा    फिरते उपहारगृह (Mobile Canteen) चालविण्याचा अनुभव आहे. त्यांच्याकरिता संबंधित अटी व शर्ती, निविदा सूचना, विहित निविदा नमुना व महत्वाच्या इतर सूचना या संस्थेत उपलब्ध करण्यात आलेल्या असून त्याच्या छापील प्रतींची किंमत रुपये 200/- अशी आहे.       निविदे प्रक्रियेबद्दल अन्य काही महत्वाच्या अटी- करारपत्र 11 महिन्यांकरिता (Leave Licence ) पध