“सामाजिक न्याय समता पर्व”चा समारोप कार्यक्रम संपन्न


 

अलिबाग,दि.10(जिमाका) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता पर्व कार्यक्रमांतर्गत दि.01 एप्रिल ते दि.02 मे 2023 या कालावधीत विविध कार्यक्रम घेवून समता पर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड अलिबाग यांच्या वतीने साजरा करण्यात आला. दि.02 एप्रिल ते दि.02 मे 2023 या कालावधीत निबंध, वक्तृत्व व पथनाटय स्पर्धा घेण्यात येवून शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, जेष्ठ नागरिक, तृतीय पंथी व्यक्ती इत्यादीसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

             समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांच्या प्रसिध्दीसाठी पथनाटयाव्दारे मातंग समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन योजनांची प्रसिध्दी करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अलिबाग बीच पर्यत वॉकेथॉन (walkthon) 2023 चे आयोजन करण्यात येवून अलिबाग बीच ची साफसफाई करण्यात आली.   

             कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेची कार्यशाळा घेवून योजनेची प्रसिध्दी करण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,अंधश्रध्दा निर्मुलन कायदा व व्यसनमुक्ती कायदा या विषयावर कार्यशाळचे आयोजन करण्यात आले.

             सामाजिक समता पर्वाचा समारोप दि.01 मे 2023 महाराष्ट्र दिनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळी मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग वसतिगृहातील विद्यार्थीनी     कु.मानसी नागावकर यांची पोलीस विभागात निवड झाल्याने त्यांचा सत्कारही सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक