Posts

Showing posts from January 22, 2023

“चला जाणूया नदीला” या अभियानांतर्गत नदी स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम संपन्न

  अलिबाग,दि.23(जिमाका):-  कोकण विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपविभागीय अधिकारी उपविभाग श्री.अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली  “ चला जाणूया  नदीला ”  या अभियानांतर्गत नदी स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात नदी पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये एन.जी.ओ.पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व के.एम.सी. कॉलेज खोपोली, एन.सी.सी.विद्यार्थी, प्राचार्य श्री.प्रताप पाटील यांनी सहभाग नोंदविला. ०००००००

दि.25 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात येणार 13 वा राष्ट्रीय मतदार दिन

         अलिबाग,दि.23 (जिमाका):-  दि.25 जानेवारी 1950 रोजी मा.भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. मा.आयोगाचा हा स्थापना दिवस सन-2011 पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना विशेषतः नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे, हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरुक करण्यासाठी केला जातो. या पार्श्वभूमीवर सर्व मतदार नोंदणी कार्यालयांनी दि.25 जानेवारी 2023 रोजी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत मा.मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार निवडणूक साक्षरता मंडळे करण्याच्या दृष्टीने यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम निवडणूक साक्षरता मंडळासोबत साजरा करावयाचा आहे. तसेच दि.25 जानेवारी 2023 ते दि. 02 फेब्रुवारी 2023 या कालावधीत  “ मतदार जागृती सप्ताह ”  राबविण्यात येणार आहे. या 13 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी  “ Nothing like Voting | Vote for Sure ”  हा विषय देण्यात आ

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता--उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
          अलिबाग,दि.23 (जिमाका):- गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.               भारती विद्यापीठाच्या सेक्टर 10, खारघर, नवी मुंबई येथील अत्याधुनिक अशा मेडिकव्हर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.                 यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, मेडिकव्हर समूहाचे अध्यक्ष फेड्रिक स्टेन्मो, भारती विद्यापीठचे कुलपती प्रो.डॉ.शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे सचिव आमदार डॉ. विश्वजीत कदम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, नृपाल पाटील, आनंदराव पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाच्या संचालक सौ.स्वप्नाली कदम, भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे संच

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

    अलिबाग,दि.23(जिमाका):- थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी आज पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. यावेळी तहसिलदार (संजय गांधी योजना) श्री.ज्ञानदेव यादव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारीउपस्थितहोते.                                                                 00000