Posts

Showing posts from December 15, 2019

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2019-2020

            अलिबाग दि.21, क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगडद्वारा जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू (1 महिला, 1 पुरुष, 1 दिव्यांग खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक 1 व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता 1   यांच्या कार्याचे/ योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2002 पासून देण्यात येतो, जिल्यातील उत्कृष्ट खेळाडॅ मार्गदर्शक व क्रीडा संघटक/ कार्यकर्ता यांना हा पुरस्कार 26 जानेवारी 2020 रोजी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सन 2019-20 च्या पुरस्कार वितरणासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्कारा मध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रु.10,000/- असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारा करिता 1 जुलै 2014 ते 30 जून 2019 पर्यतची कामगिरी/ कार्य ग्राह्य धरले जाईल. पुरस्काराचे थोडक्यात निकष खालील प्रमाणे आहेत. 1) गुणवंत खेळाडू :- या पुरस्कारा अंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू यांना सदरचा

पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूक

अलिबाग दि.21, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील अधिसूचना क्र.पंसनि 2018/प्र.क्र.218(1)/ पंरा-2 दि.27/11/2019 रोजीच्या अधिसूचने अन्वये व ग्रामविकास विभागाकडील पत्र दि.10 डिसेंबर 2019 अन्वये दिलेल्या निर्देशांचे अनुषंगाने पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी बैठक सोमवार दि.30/12/2019 रोजी होणार आहे.             त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्या खालील नियमातील तरतूदीनुसार जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती   पदाच्या निवडणूकीसाठी पंचायत समितीच्या सर्व सदस्यांची बैठक दि. 30/12/2019 रोजी दुपारी 2.00 वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.             1.) सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्दशनपत्र दाखल करणे-दिनांक 30/12/2019 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत पंचायत समिती सभागृहामध्ये. 2.) सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी बैठक-दि.30/12/2019 रोजी दुपारी 2.00 वाजता. 3.) प्राधिकृत अधिकारी यांचे मार्फत दाखल नामनिर्देशन पत्रांची छानन

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक

अलिबाग दि.21, शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील अधिसूचना क्र.जिपनि 2018/प्र.क्र.215/पंरा-2, दि.04/12/2019 महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील पत्र क्र.जिपंनि-2019/प्र.क्र.4 अ/पंरा-2 दि. 10 डिसेंबर 2019 अन्वये रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी बैठक दि.03/01/2020 रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्याखालील नियमातील तरतूदीनुसार रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी जिल्हा सर्व सदस्यांची बैठक दि.03/01/2020 रोजी दुपारी 2.00 वाजता कै.ना.ना.पाटील, सभागृह रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. 1.) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणे-दि.03/01/2020 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 वाजे पर्यंत कै.प्रभाकर पाटील सभागृह रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे. 2.) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बैठक-दि.03/01/2020 रोजी दुपारी 2.00 वाजता. 3.) पिठासीन अधिकारी यांच्या मार्फत दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे- दि

कोळंबी बीज उत्पादन केंद्र योजनेचा लाभ घेण्याकरीता संपर्क साधावा

अलिबाग, जि. रायगड, दि.21 (जिमाका) - महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण विभागातील सात जिल्हयामध्ये दोन मोठे कोळंबी बीज उत्पादन केंद्र वाषिर्क 200.00 दशलक्ष पोस्ट लार्व्हा क्षमता असलेले (ठाणे-पालघर व रायगड जिल्हयाकरीता एक व रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयासाठी एक) व भांडवली खर्च रू. 460.00 लक्ष प्रती कोळंबी बीज उत्पादन केंद्र किमतीच्या व 25 टक्के अनूदानासहीत तसेच पाच छोटे कोळंबी बीज उत्पादन केंद्र, 50.00 लक्ष पोस्ट लार्व्हा क्षमता असलेले (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयासाठी प्रती जिल्हा एक) भांडवली खर्च रू. 50.00 लक्ष प्रती कोळंबी बीज उत्पादन केंद्र किमतीच्या व 50 टक्के अनुदानासह खाजगी व्यक्ती, संस्था व कंपनी यांना वर नमूद केलेल्या अनुदानासह देण्याबाबत शासनाने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक मत्स्यवि 2017/प्र.क्र.76/पदुम-12, दि. 28 मार्च 2018 रोजी निर्गमित केला आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता जिहयातील इच्छुक व्यक्ती,

मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धनाच्या पायाभूत सुविधांचा विकास निधी योजनांच्या माहितीसाठी संपर्क साधावा

अलिबाग, जि. रायगड, दि.21 (जिमाका) -   केंद्र शासनाच्या राष्ट्रिय मत्सिकी विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्यामार्फत “ मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धनाच्या पायाभूत सुविधांचा विकास निधी ” ( FIDF) ही योजना राबविणार आहे. त्यानुसार एकूण 20 योजनांचा लाभ जिल्हयातील मच्छिमार,मत्स्यसंवर्धक,इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांना घेता येणार आहे. या योजनेचे 80 टक्के कर्ज व 20 टक्के लाभार्थी हिस्सा असे अर्थसहाय्य स्वरूप आहे व परतावा कालावधी 12 वर्षे आहे. मत्स्यव्यवसायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढील योजना राबविण्यात येणार आहे. मासेमारी बंदरांची स्थापना करणे प्रकल्प किंमत रू. 150 कोटी, मासे उतरविणाऱ्या केंद्राची स्थापना करणे रू.10 कोटी, बर्फ कारखाना बांधणे (सागरी/भूजल) रू.1 कोटी, शीतगृह ( cold storage ) बांधणे (सागरी/भूजल) रू.1 कोटी, मासे वाहतूकीसाठी ( fish transport ) सोयीसुविधा रू.20.00 लक्ष, एकात्त्मिक शितसाखळी ( Integrated cold chain ) रू.5 कोटी, आधुनिक मासळी बाजाराची स्थापना करणे रू.1 कोटी, प्रजनक संग्रहिका स

पणन हंगाम 2019-20 मधील वाढीव भात खरेदी केंद्र

अलिबाग दि.19, आधारभूत किंमत भात खरेदी योजने अंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटींग रायगड यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2019-20 मध्ये रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मंजूर अनिकेत राईस मिल झाप या धानखरेदी केंद्रावर खरेदी सुरु करण्यांत येणार आहेत. सदरचा भात खरेदीचा कालावधी हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्र.खरेदी-1019/प्र.क्र.98/ना.पु.29 दि.29 सप्टेंबर 2019 अन्वये खालील प्रमाणे विहित केला आहे. खरीप पणन हंगाम दि.1 ऑक्टोंबर 2019 ते दि. 31 मार्च 2020 रब्बी पणन हंगाम दि.1 मे 2020 ते दि. 30 जून 2020 भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उताऱ्याची व गाव नमूना 8(अ) ची छायाप्रत खरेदी केंद्रावर धानविक्री करीता आणणे आवश्यक आहे. सदरहू उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे 7/12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी) पीकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन धान/धरडधान्य खरेदी करण्यात येईल.