मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धनाच्या पायाभूत सुविधांचा विकास निधी योजनांच्या माहितीसाठी संपर्क साधावा



अलिबाग, जि. रायगड, दि.21 (जिमाका)-  केंद्र शासनाच्या राष्ट्रिय मत्सिकी विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्यामार्फत मत्स्यव्यवसाय मत्स्यसंवर्धनाच्या पायाभूत सुविधांचा विकास निधी (FIDF) ही योजना राबविणार आहे. त्यानुसार एकूण 20 योजनांचा लाभ जिल्हयातील मच्छिमार,मत्स्यसंवर्धक,इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांना घेता येणार आहे. या योजनेचे 80 टक्के कर्ज 20 टक्के लाभार्थी हिस्सा असे अर्थसहाय्य स्वरूप आहे परतावा कालावधी 12 वर्षे आहे. मत्स्यव्यवसायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढील योजना राबविण्यात येणार आहे.
मासेमारी बंदरांची स्थापना करणे प्रकल्प किंमत रू.150 कोटी, मासे उतरविणाऱ्या केंद्राची स्थापना करणे रू.10 कोटी, बर्फ कारखाना बांधणे (सागरी/भूजल) रू.1 कोटी, शीतगृह (cold storage) बांधणे (सागरी/भूजल) रू.1 कोटी, मासे वाहतूकीसाठी (fish transport) सोयीसुविधा रू.20.00 लक्ष, एकात्त्मिक शितसाखळी (Integrated cold chain) रू.5 कोटी, आधुनिक मासळी बाजाराची स्थापना करणे रू.1 कोटी, प्रजनक संग्रहिका स्थापन करणे (Setting up Brood bank) रू.10 कोटी, मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करणे रू. 50.00 लक्ष, मत्स्यसंवर्धन प्रकल्प बांधणे रू. 7.00 लक्ष प्रति हे., राज्य शासनाच्या मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे आधुनिकीकरण करणे रू. 5 कोटी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे रू. 5 कोटी, मत्स्य प्रकिया (fish processing unit) कारखाना रू.46.74 कोटी, मत्स्य खाद्य निमिर्ती कारखाना अ) 4/5 टन प्रति दिवस क्षमता रू.10.00 लक्ष ब) 10 टन प्रति दिवस क्षमता रू.6.50 कोटी, जलाशयात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन रू.3.00 लक्ष प्रति पिंजरा, खोल समुद्रातील मासेमारी नौका बांधणी रू.80.00 लक्ष प्रति नौका, रोग निदान प्रयोगशाळा (Disease dignostic laboratory) ची स्थापना रू.150 लक्ष, सागरी मत्स्यसंवर्धन प्रकल्प विकास अ)खुला समुद्रात पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन रू. 5 लक्ष ब) सागरी मत्स्यबिज निर्मीती केंद्र  स्थापना रू. 50 लक्ष क) सागरी मत्स्यबिज संगोपन केंद्र स्थापना रू. 6 लक्ष ड) समुद्र शैवाळ/शिंपले/ मोती पालन एकूण एकरकमी रक्कम रू. 42.25  कोटी, ऍ़क्वाटिक कॉरंटाईन फॅसिलिटी रू. 25 कोटी, या शिवाय इतर नाविण्यापूर्ण प्रकल्प.


योजना अंमलबजावणी पद्धत: संपूर्ण योजनेची कार्यवाही NFDB  मार्फत होईल. तरी मच्छिमार, मत्स्यसंवर्धन, इच्छुक लाभार्थ्यांनी योजनांच्या अधिक माहितीसाठी प्र सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग र. प्र. राजम, श्री सिद्धी अपार्टमेंट, तिसरा मजला, डॉ. पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग पेण रोड. (दूरध्वनी क्रमांक- 02141-224221) यांच्याशी संपर्क साधावा.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक