Posts

Showing posts from May 28, 2017

राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम अलिबाग, (जिमाका) दि.03:-राज्यमंत्री,जलसंपदा,जलसंधारण व संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य, यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि.5 जून 2017 रोजी सायंकाळी 5.00 वाजता कार्यक्रमांनंतर  सातारा येथून महाड कडे प्रयाण.महाड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. मंगळवार  दि.6 जून 2017  रोजी सकाळी 10.00 वाजता  अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्स्व  समिती, दुर्गराज रायगड मार्फत 344 वा शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ:किल्ले रायगड, ता.महाड जि.रायगड .कार्यक्रमानंतर महाड शासकीय विश्रामगृहाकडे मोटारीने प्रयाण. कार्यक्रमांनंतर राखीव व मुक्काम. स्थळ: महाड शासकीय विश्रामगृह जि. रायगड. बुधवार दि.7 जून 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: किल्ले रायगड, ता.महाड जि.रायगड .कार्यक्रमानंतर  मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 0000000

महाड येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह प्रवेश

महाड येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह प्रवेश अलिबाग,दि.03 (जिमाका):- सैनिकी मुलांचे वसतीगृह, नवेनगर,महाड येथे शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी प्रवेश प्रक्रीया सुरु असून संबंधितांनी विहीत नमुन्यातील अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या वसतीगृहात आजी,माजी सैनिक,विधवा व इतर नागरिकांचे पाल्याकरिता अतिअल्प भोजन शुल्क आकारुन इयत्ता 9वी पासून पदविका,पदवी पर्यंत शिकणाऱ्या मुलांना प्रवेश देण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. या शिस्तबद्ध सैनिकी वसतीगृहात  प्रवेश घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मुलांचे वसतिगृह, नवेनगर,महाड येथे वसतीगृह अधिक्षक यांच्याकडे उपलब्ध आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण व इतर दुर्गम भागात वास्त्व करणाऱ्या आजी,माजी सैनिक व इतर नागरिकांच्या पाल्यांना या सैनिकी वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येईल. या वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2017 आहे. अधिक माहितीसाठी 02145-225451 व 02141-222208 या दुरध्वनी क्रमांकावर व 8857012683 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन मेजर प्रांजल जाधव(निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकार

खेळाडूंना आर्थिक सहाय प्रस्ताव सादर करावेत

खेळाडूंना आर्थिक सहाय प्रस्ताव सादर करावेत अलिबाग,दि.03 (जिमाका):-राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परीणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते  खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडुंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेवून क्रीडा धोरण  तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे. ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅपियनशिप, युथ ऑलिंपिक, ज्यु विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई जागतिक स्पर्धा,पॅरा ऑलिंपिक स्पर्धा,पॅरा एशियन स्पर्धा,ज्युनिअर एशियन चॅपियनशिप,एशियन कप,वर्ल्ड कप. या चौदा अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना पुढील बाबीस

चावडी वाचन कार्यक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र आयोजन --जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

चावडी वाचन कार्यक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र आयोजन                                           --जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर अलिबाग,दि.03 (जिमाका):-महाराष्ट्र शासनाने 7/12 शुद्धीकरणाचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून, त्यासाठी 15 मे,2017 पासून गावपातळीवर ग्रामसभा आयोजित करुन गा.न.नं.7/12 चावडी वाचनाचा कार्यक्रम राबविला जात आहे.जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांच्या निर्देशनानुसार रायगड जिल्हयात सर्वत्र चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. गावातील तलाठ्यांकडून सर्वे गा.न.नं.7/12वरील व खाते उतारावरील कब्जेदारांचे, कुळांचे नावे व इतर तपशीलांचे वाचन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण 1974 गावामधून गा.न.नं.7/12 व 8 अ चे  वाचनाच्या ग्रामसभेस उपस्थित राहून आपला गा.न.नं.7/12 बरोबर आहे की नाही त्यावरील नावे,क्षेत्र,सर्व्हे नंबर व इतर अधिकारातील तपशील, वारस नोंदी, इत्यादी बाबींची शहानिशा गा.न.नं.7/12 वाचनावेळी करुन खात्री  करुन घ्यावी व काही  त्रुटी आढळल्यास तलाठ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.असे आवाहन करण्यांत येत आहे.             आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांतून 105 गावांत 

पनवेल व पाली सुधागड मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह 2017-18 शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश

पनवेल व पाली सुधागड मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह 2017-18 शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश अलिबाग,दि.31:-(जिमाका)-सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह,सेक्टर-10,प्लॉट नं.21,ग्रीन पार्क सोसायटी समोर, पनवेल तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह,पाली सुधागड,मधली आळी,राम मंदीर रोड,तळ्याच्या शेजारी, पाली सुधागड या शासकीय वसतीगृहात गरीब,  हुशार,  होतकरु,  मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थींनींना (अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग ) गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी संबंधित इच्छुकांनी संपर्क साधावा. असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. वसतीगृहात विद्यार्थ्यांना निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. भोजन व्यवस्थेमध्ये पोटभर जेवण, देण्यात येते. यात डाळ, भात, चपाती, भाजी, उसळ,लोणी,पापड,तूप इ.सह आठवड्यातून दोन वेळा चिकण,मटण,नाष्टा- पोहे,शिरा,उपीट इ.पैकी एक  व उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व शर्करायुक्त दुध आदींचा समा

राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर अलिबाग,दि.31:-(जिमाका)- राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष  भिकू इदाते हे दिनांक 03 जून 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.3 जून 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईहून पनवेल येथे आगमन.दुपारी 2.00 वाजता पनवेल येथून मोटारीने दापोलीकडे प्रयाण. 000000

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली अलिबाग,दि.31 (जिमाका)-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात त्यांच्या प्रतिमेस  तहसिलदार(सर्वसाधारण) जयराज देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.   यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते. 00000000000

शिवराज्याभिषेक सोहळा

Image
शिवराज्याभिषेक सोहळा शिवभक्तांना किल्ल्यावर अधिक सुविधेसाठी प्रशासन प्रयत्नशील                                                              - जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर   अलिबाग दि.30, (जिमाका)- शिवराज्याभिषेक सोहळयासाठी 6 जून, रोजी रायगड किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात. त्यांची  गैरसोय होणार नाही  यासाठी रायगड जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी सांगितले. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह त्यांनी रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष पाहणी केली व  संबंधितांना मार्गदर्शन करुन सूचना दिल्या. राज्याभिषेक सोहळयासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह व्यवस्था, प्रथमोपचार सुविधा तसेच किल्ल्यावरील विद्युत व्यवस्था या बाबत उभयंतांनी किल्ला परिसरात पाहणी केली तसेच सोयी सुविधांबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्या ठिकाणी असलेल्या कोलिम तलाव, श्रीगोंदा टाकी या ठिकाणी भेट देऊन शिवराज्याभिषेक सोहळयासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यासंदर्भात चर्चा केली. तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान

रायगड किल्ला परिसरात श्रमदान हे आत्मिक समाधान देणारे कार्य - कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख

Image
रायगड किल्ला परिसरात श्रमदान हे आत्मिक समाधान देणारे कार्य -           कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख अलिबाग दि.29, (जिमाका)- रायगड किल्ला परिसरात करण्यात येणारे श्रमदान हे आत्मिक समाधान देणारे कार्य आहे. असे प्रतिपादन कोकण विभाग महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काल रायगड किल्ल्यावर केले.  त्यांनी  रायगड किल्ल्यावरील परिसरात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच महसूल व इतर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने श्रमदान केले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील महत्वाचा किल्ला असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपली आहे. शासन त्यासाठी कार्य करीतच आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.  गतवर्षी 2 कोटी वृक्षलावगड मोहिमेअंतर्गत रायगड किल्ल्यावर वृक्षलागवडीचा विशेष उपक्रम आयुक्त महोदयांनी राबविला होता. तसेच रायगड किल्ला संवर्धनासाठी शासनामार्फत विशेष निधीद्वारे महत्वपूर्ण असे कार्य त्यांच्या मार्गदर्शनात होत आहे. त्या कामाचीही त्यांनी पाहणी करुन आढावा घेतला. तसेच कुशावर्त तलावातील गाळ काढण्याच्या कामी श्रमदान केले. डॉ.नानासाहेब