Posts

Showing posts from May 16, 2021

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 15 अद्ययावत नव्या रुग्णवाहिका उपलब्ध होणार राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान निधीतून 2.25 कोटींचा निधी देण्याबाबत शासनाची मान्यता -पालकमंत्री कु. आदिती तटकरे

    अलिबाग,जि.रायगड,दि.21 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती सुनील तटकरे या विशेष लक्ष देत आहेत. त्यानुषंगाने   जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी अद्ययावत नव्या 15 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या राज्य प्रकल्प राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान निधीतून 2.25 कोटींचा निधी रायगड जिल्हा परिषदेला मिळणार आहे.   राज्याचे ग्रामविकास मंत्री,ना.श्री.हसन मुश्रीफ यांना याबाबत पालकमंत्री कु.तटकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार संचालक, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष - राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांच्यामार्फत 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.     करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक सुविधांच्या बळकटीकरणासाठी "विशेष बाब" म्हणून हा निधी रायगड जिल्हा परिषदेस देण्यात आला आहे.   करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका अपुऱ्या पडू नयेत व भविष्यातही या रुग्णवाहिकांचा उपयोग सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना व्ह

“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” अंतर्गत भारतीय अन्न महामंडळाकडून गहू/तांदळाचे वितरण मोफत

    अलिबाग,जि.रायगड,दि.21 (जिमाका) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने केंद्र सरकार तर्फे “ प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना –III ” अंतर्गत मे आणि जून महिन्यात प्रत्येक पात्र लाभार्थ्याना पाच किलो तांदूळ /गहू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे 17 हजार 924 मे.टन अन्नधान्याचे रायगड जिल्ह्यातील पात्र लाभार्थीसाठी वितरण करण्यात येणार आहे.यापैकी 7 हजार 497 मे.टन धान्याची उचल भारतीय खाद्य निगम च्या गोदामातून करण्यात आली आहे,अशी माहिती विभागीय व्यवस्थापक श्री.बाबाराव राऊत यांनी दिली. अन्न महामंडळ गोदामाचे काम नियमित सुरू असून गोदामात अन्नाचा साठा मुबलक आहे. कार्यालयाचे कर्मचारी लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वांना धान्य मिळावे,यासाठी कार्यरत आहेत.       केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या "सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास" या संदेशानुसार भविष्यातही हा विभाग काम करीत राहील. 000000

अत्यावश्यक आस्थापना/दुकानांतर्गत किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन/ मटण/मासळी विक्रेते, रास्त भाव धान्य दुकाने, फॅब्रिकेशन, दूध डेअरी, अवजारे व शेतीसंबंधी वाहने, पावसाळयापूर्वी कामाकरीता लागणारी साधनसामुग्री, हार्डवेअर सामान विक्री करणारी दुकाने पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी

  वृत्त क्रमांक:- 419                                                                    दिनांक:- 20 मे 2021   अलिबाग,जि.रायगड, दि.20 (जिमाका): राज्यात वाढत्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील अधिसूचनेद्वारे सर्व किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री, मच्छी व अंडी त्यात समावेश), कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थाची दुकाने, व्यक्तींसाठी तसेच आस्थापनांसाठी पावसाळयापूर्वी करण्यात येणाऱ्या कामाकरीता लागणाऱ्या साधनसामुग्री संबंधित दुकाने फक्त सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत चालू राहतील, असे आदेश पूर्वी पारीत करण्यात आले होते. तथापि जिल्ह्यात दि.17 मे 2021 रोजी आलेल्या ताऊक्ते चक्रीवादळामुळे घर, वाडे, गोठे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान व त्यानुषंगाने उद्भवलेली आपत्तीजन्य स्थिती विचारात घेता व नागरिकांना त्यांच्या नुकसा