Posts

Showing posts from May 19, 2024

मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे दि.21 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

    रायगड दि.21(जिमाका):- मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई  यांच्या कार्यालया‌द्वारे  दि.21 जून 2024 रोजी, दुपारी 3.00 वाजता 127 वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई 400001 यांच्याकडे दि.07 जून 2024  पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर  यांनी केले आहे. यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे. 000000

अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग येथे दि.14 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

    रायगड दि.21 (जिमाका):-  अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालया‌द्वारे दि.14 जून 2024 रोजी, सकाळी ठीक 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली असून इछूक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे दि.06 जून 2024 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर  यांनी केले आहे. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे.. 0000000

चालू वर्षी दि.01 जून ते 31 जुलै 2024 या कालावधीत मासेमारी बंदी घोषित

    रायगड दि.20(जिमाका):- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी दि.01 जून 2024 ते दि.31 जुलै 2024 (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे.      या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब/वादळी हवामानामुळे होणारी जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही.      राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रि

पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यास बंदी

  रायगड दि.20(जिमाका):- Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या जलयानांना दरवर्षी दि.26 मे ते दि.31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात सुरक्षिततेच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येते. त्यानुसार Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी असलेल्या जिल्ह्यातील जलयानांना दि.26 मे ते दि.31 ऑगस्ट 2024  या कालावधीत सुरक्षिततेच्या कारणास्तव महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारितील बंदरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, राजपुरी बंदरे समूह कॅ.सी..जे.लेपांडे यांनी कळविले आहे. ००००००