Posts

Showing posts from July 9, 2017

जागतिक युवा कौशल्य दिन कौशल्य प्रशिक्षण संस्थांचा गौरव

            अलिबाग, दि.15 (जिमाका)-  जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या उत्कृष्ट संस्थांचा गौरव करण्यात आला.           जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयातर्फे पेस स्कील ट्रेनिंग सेंटर, सांगुर्ली, ता.पनवेल, जिल्हा-रायगड येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला.         अध्यक्षस्थानी  एल. अँड टी. बांधकाम कौशल्य विकास केंद्र, भोकरपाडा, पनवेल येथील प्राचार्य,तेजेराव पाटील,  हे होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कौशल्य प्रशिक्षणाचे महत्व विषद केले.  यावेळी जिल्हयातील खाजगी कौशल्य   प्रशिक्षण संस्थांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी योजनेचे उत्कृष्ठ काम करणाऱ्या व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्थांना पारितोषिक वितरण करुन गौरविण्यात आले. त्यामध्ये  एल. अँड टी. बांधकाम कौशल्य विकास केंद्र, भोकरपाडा, पनवेल  या संस्थेस प्रथम पारितोषिक, पेस स्कील ट्रेनिंग सेंटर, सांगुर्ली, ता.पनवेल या संस्थेस द्वितीय पारितोषिक आणि डॉन बास्को युवा संस्था, मोठे वेणगाव, ता.कर्जत, जिल्हा-रायग

रोहा येथे 18 रोजी 'विज्ञान एक्सप्रेस' 'जलवायु परिवर्तन' प्रदर्शन पाहण्याची जिल्हावासीयांना सुसंधी

        अलिबाग दि.15,(जिमाका):- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प असलेल्या ' विज्ञान एक्सप्रेस अर्थात सायन्स एक्सप्रेस मंगळवार दि.18 रोजी रोहा रेल्वेस्थानक येथे एक दिवसासाठी दाखल होत आहे. या वातानुकुलित गाडीत  जिल्हावासीयांना 'जलवायु परिवर्तन' या संकल्पनेवर आधारित  प्रदर्शन पाहण्याची संधी यनिमित्ताने उपलब्ध होत आहे. भारत सरकारच्या विज्ञन तंत्रज्ञान मंत्रालय, वन मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि जैव तंत्रज्ञान मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.  रोहा रेल्वे स्थानक येथे दि.18 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. दरम्यान हे  विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी उपलब्ध असेल. यावेळी  महाविद्यालयीन - शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी, नागरिक समाजातील सर्व घटकांसाठी हे प्रदर्शन पाहण्यासाठी  विनामुल्य खुले असेल, असे सायन्स एक्सप्रेसचे व्यवस्थापक नितीन तिवणे यांनी कळविले आहे. काय आहे सायन्स एक्सप्रेस? सायन्स एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा ( DST ) विशेष प्रक ल्प आहे. ही 16 डब्यांची वातानुकूलित प्रदर्शनी ट्रेन ऑक्टोबर 2007 पासून भारत भ

स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पांतर्गत नांगरवाडी, भोनंग येथे भात लागवड प्रात्यक्षिक

        अलिबाग दि.15,(जिमाका):- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प जिल्ह्यातील अलिबाग, पेण, खालापूर, माणगांव या चार तालुक्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत  सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर  भात पिक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम नुकताच (दि.14) नांगरवाडी व भोनंग येथे पार पडला. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प या प्रकल्पांतर्गत प्रकल्प कार्यक्षेत्रात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 9 शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झाली आहे. या प्रकल्पांतर्गत खरीप हंगाम 2017 साठी एकूण 7 शेतकरी उत्पादक कंपन्यांना पी.पी.पी.( सार्वजनिक - खाजगी सहभागीता)  तत्त्वावर भाताचे 333 भात पिक प्रात्यक्षिके 133 हे.क्षेत्रावर घेण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कर्जत-5, वाय.एस.आर., सुवर्णा, कोलम, एम.टी.यु.-1010, गंगोत्री, सुवर्णा इ.वाणांची निवड करण्यात आलेली आहे. बजाज राईस मिल सिंधूदुर्ग या खरेदी कंपनीबरोबर सदर पीक प्रात्यक्षिकातून उत्पादित होणारा भात खरेदी करण्याबाबत करार करण्यात आलेला आहे. अलिबाग तालुक्यात धाविरेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी रामराज, ता.अ

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 62 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.15,(जिमाका):-   जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 62.03 मि.मि. पर्जन्यमान नोंदविण्यात आले. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 43.00 मि.मि., पेण-65.10 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-102.00 मि.मि., उरण-16.00 मि.मि., कर्जत-81.40 मि.मि., खालापूर-42.00 मि.मि., माणगांव-44.00 मि.मि., रोहा-46.00 मि.मि., सुधागड-77.00 मि.मि., तळा-61.00 मि.मि., महाड-62.00 मि.मि., पोलादपूर-91.00, म्हसळा-25.40 मि.मि., श्रीवर्धन-39.00 मि.मि., माथेरान-161.50 मि.मि.,-असे आजचे गेल्या 24 तासातील एकूण पर्जन्यमान 992.40 मि.मि.इतके आहे. तर दिवसभरातील एकूण सरासरी पर्जन्यमान 62.03 मि. मि. नोंदविण्यात आले. तर आज अखेर एकूण सरासरी 1321.42 मि. मि इतके पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. जे एकूण सरासरीच्या 42.05 टक्के आहे. ०००००  

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

अलिबाग दि.14,(जिमाका):- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेमधील व्यक्तीगत लाभाच्या घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  या योजनेमध्ये आंबा पुनरुज्जीवन, नियंत्रित शेती, क्षेत्रविस्तार,सामुहिक शेततळे व काढणी पश्चात तंत्रज्ञान यांसारख्या घटकांचा लाभ दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी  कोणत्या घटकासाठी लाभ घ्यावयाचा आहे, ते अर्जामध्ये स्पष्ट नमूद करावे. विहीत मुदतीमध्ये प्राप्त अर्जांपैकी लक्षांकास अधिन राहून लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने जिल्हास्तरावर करण्यात येईल. इच्छुक शेतकऱ्यांनी दि.20 पर्यंत www.hortnet.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रायगड अलिबाग यांनी केले आहे. ०००००

पावसाचे दिलासादायक पुनरागमन भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

Image
अलिबाग दि.14,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचे दिलासादायक पुनरागमन झालेले  आहे. गेल्या 24 तासात  एकूण 1565.33 मि. मि. इतके पर्जन्यमान  नोंदविण्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये भात लावणीसाठी लगबग सुरु झाली आहे.  जिल्ह्यात तब्बल 57 हजार 792 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली असून पावसाच्या पुनरागमनाने  उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने भात लावणीचा वेग कमी झाला होता. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते.  दरम्यान गेल्या 24 तासात पावसाने दमदार पुनरागमन केले असून  गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 1565.33 मि. मि. पर्जन्यमान नोंदविण्यात आले. कालच्या दिवसभराच्या पावसाची सरासरी  97.83 मि. मि इतकी असून  आज अखेर एकूण सरासरीच्या 40.07  टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.  या संदर्भात कृषि विभागाकडुन प्राप्त आकडेवारीनुसार,  जिल्ह्यात एकूण 1 लाख 41 हजार 483 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने  भात पिकाची  लागवड सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजे  1 लाख 23 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर नियोजित आहे. त्यापैकी

चार कोटी वृक्ष लागवड रायगड जिल्ह्याची 105 टक्के उद्दिष्टपूर्ती

अलिबाग दि.14,(जिमाका):- राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत राबविण्यात आला. या मोहिमेसाठी रायगड जिल्ह्याला  10 लक्ष 59 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाप्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करुन  प्रत्यक्षात 11 लक्ष 18 हजार 117 रोपांची लागवड पुर्ण केली असून दिलेल्या उद्दिष्टाच्या 105 टक्के रोप लागवड केली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार,  राज्यात दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यात 10 लक्ष 59 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.  त्यासाठी जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर  यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्हास्तरीय नियोजन केले.  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ  1 जुलै रोजी करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व प्रशासकिय यंत्रणा, सामाजिक संस्था, व्यक्तींनी यात हिरीरीने सहभाग घेतला.   या मोहिमेत वन विभागाने  5 लक्ष 78 हजार 580 सामाजिक वनीकरण विभागाने 1 लक्ष 50 हजार जिल्हा परिषद यंत्रणेने 2 लाख 57 हजार 957 तर अन्य विभागा

जिल्ह्यात एकूण सरासरी 1259 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.14,(जिमाका):- जिल्ह्यात आज अखेर एकूण 1259.40 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 38.00 मि.मि., पेण-240.00 मि.मि., मुरुड-29.00 मि.मि., पनवेल-89.20 मि.मि., उरण-44.00 मि.मि., कर्जत-236.20 मि.मि., खालापूर-144.00 मि.मि., माणगांव-96.00 मि.मि., रोहा-73.00 मि.मि., सुधागड-155.33 मि.मि., तळा-42.00 मि.मि., महाड-72.00 मि.मि., पोलादपूर-78.00, म्हसळा-15.40 मि.मि., श्रीवर्धन-14.00 मि.मि., माथेरान-199.20 मि.मि.,-असे आजचे गेल्या 24 तासातील एकूण पर्जन्यमान 1565.33 मि.मि.इतके आहे. आज अखेर एकूण सरासरीच्या 40.07 टक्के पर्जन्यमान झाले आहे. 

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा जिल्हादौरा

अलिबाग दि.12,(जिमाका):- महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समिती  जिल्हा दौऱ्यावर येत असून समितीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार दि.13 रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.  सकाळी साडे नऊ ते पाच वाजता रायगड जिल्ह्यातील गृह (बंदरे) विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल (गौण खनिज) विभाग, फलोत्पादन विभाग आणि औद्योगिक वसाहतीच्या प्रकल्प कामांना भेट व पाहाणी. रात्री  शासकीय विश्रामगृह, रायगड अलिबाग येथे मुक्काम. शुक्रवार दि.14 रोजी  सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यातील गृह (बंदरे) विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल (गौण खनिज) विभाग, फलोत्पादन विभाग आणि औद्योगिक वसाहतीच्या प्रकल्प कामांना भेट व पाहाणी. दुपारी तीन वाजता समितीने पाहणीच्यावेळी आढळलेल्या बाबींच्या संदर्भात तसेच लेखी स्वरुपात प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक. ०००००

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती व विद्यावेतन

अलिबाग दि.12,(जिमाका) :- माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वर्ष सन  2017-18 साठी शिष्यवृत्ती व विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यात इयत्ता 10 वी 12 वी तसेच पदवी, पदवीका परिक्षेत किमान 60% गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व पुढील शिक्षण घेणाऱ्या तसेच विद्यापीठाने मान्य केलेल्या विषयांमध्ये संशोधनपर अभ्यासक्रम करणाऱ्या (पीएचडी व तत्सम) पाल्यांचा समावेश आहे.  अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दर वर्षी शैक्षणिक शिष्यवृती देण्यात येणार आहे. याकरीता माजी सैनिक ,विधवांनी वैयक्तिक अर्ज, डी.डी.-40 फॉर्म (कार्यालयात उपलब्ध् आहे.),ओळखपत्राची पाठपोट छायांकित प्रत,सध्या पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचे बोनाफाईड सर्टिफिकेट., उत्तीर्ण झालेल्या वर्गाच्या गुणपत्रीकेची प्रमाणित सत्यप्रत., डिस्चार्ज पुस्तकातील कुटूंबातील सदस्यांची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत., इतर कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नसलेबाबतचा कॉलेजचा दाखला या कागदपत्रांसह दि. 15 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग या कार्यालयात अर्ज करावा व लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त्‍) जिल्हा सैनिक कल्या

जिल्ह्यात एकूण 1151 मि.मि. पावसाची नोंद

         जिल्ह्यात एकूण 1151 मि.मि. पावसाची नोंद अलिबाग दि.12,(जिमाका):- जिल्ह्यात आज अखेर एकूण 1151.26 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 6.00 मि.मि., पेण-11.20 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-16.20 मि.मि., उरण-6.00 मि.मि., कर्जत-22.00 मि.मि., खालापूर-13.00 मि.मि., माणगांव-23.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-16.66 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-27.00 मि.मि., पोलादपूर-25.00, म्हसळा-58.40 मि.मि., श्रीवर्धन-21.00 मि.मि., माथेरान-27.10 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 324.56 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  36.63 % इतकी आहे. 000000

पशुपालनातून समृद्धीकडेः शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे, शेळ्या, मांसल पक्षी वाटपासाठी नाविन्यपूर्ण योजना

पशुपालनातून समृद्धीकडेः शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे, शेळ्या, मांसल पक्षी वाटपासाठी नाविन्यपूर्ण योजना शेतीला पुरक उद्योग म्हणून अनेक शेतकरी पशुपालन-दुग्धोत्पादन करीत असतात. तसेच अनेक शेतकरी आता कुक्कुटपालनाकडे वळून अंडी व मांसल पक्षी उत्पादनाकडेही वळले आहेत. तसेच शेळी पालनालाही चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. 2017-18 या वर्षात शासनाने राज्यातील दूध उत्पादन,शेळी व्यवसाय आणि मांसल कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे, पक्षी, शेळी  वाटप केल्या जातात. शेतकऱ्यांसाठी योजनेची माहिती पुढीलप्रमाणे देत आहोत.   दुधाळ संकरीत गाई,म्हशींचे गट वाटप योजनाः-  या योजनेअंतर्गत 6/4/2 दुधाळ संकरीत गायी/म्हशी अशा एका गटासाठी किंमत याप्रमाणे- सहा जनावरांच्या गटास 3 लाख 35 हजार 184 रुपये, चार  जनावरांच्या गटास एक लाख 70 हजार 125 रुपये व दोन जनावरांच्या गटास 85 हजार 61 रुपये इतके आहे.  या किमतीपैकी सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50 टक्के व अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीसाठी 75 टक्के अनुदान  देय राहील. लाभार्थी निवड निकष - महिला

जागतिक लोकसंख्या दिन जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यक्रम

Image
अलिबाग दि.11,(जिमाका) :-  जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग व रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. 'जोडप्यांनी  जबाबदारी  स्विकारा, कुटूंब नियोजनांचा अवलंब करा' हे या वर्षीचे  घोषवाक्य आहे. अलिबाग येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनी व रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रभात फेरीद्वारे लोकसंख्या नियंत्रणाविषयी जनजागृती करण्यात आली . जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आयेाजित कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.सचिन देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनीनी जागतिक लोकसंख्या दिनाविषयी  मनोगत व्यक्त केले. जागतिक लोकसंख्या दिन या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ.सचिन देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ.सुहास कोरे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) यांनी 'लोकसंख्या जर वाढत गेली तर मानवाच्या मुलभूत  गरजा (अन्न,वस्त्र,निवारा

राष्ट्रीय लोक अदालत जिल्ह्यात 216 प्रकरणे निकाली

Image
            अलिबाग दि.11,(जिमाका) :- राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवार दि.8 रोजी जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग येथे आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 216 प्रकरणे निकाली काढण्यात आली.             यावेळी मु.गो.सेवलीकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश,रायगड  तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग,  एल.डी.हुली, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, अलिबाग, तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड आणि अन्य न्यायीक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, ॲड.प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रविण ठाकूर, तसेच वकील वर्ग उपस्थित होते.             सदर लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून न्यायालयातील 1522 इतकी प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 216 प्रकरणे  निकाली निघाली. त्यामध्ये 3 कोटी 21लक्ष 66हजार 551 रुपये इतकी रक्कम नुकसान भरपाई  मान्य करण्यात आली. तसेच भूसंपादन  वादपूर्व प्रकरणे 302 ठेवण्यात आली होती. त्यापैकी 42 प्रकरणे

जीएसटी करप्रणाली अंमलबजावणी अपर मुख्य सचिव बिपीन मलिक यांनी घेतला जिल्ह्यातील स्थितीचा आढावा

Image
अलिबाग,दि.11- जीएसटी कर अर्थात वस्तु व सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी होत असतांना ग्राहकहिताला कोणतीही बाधा येऊ न देता दर आकारणी करावी. यासंदर्भात व्यापारी वर्गाने येणाऱ्या अडचणींबाबत योग्य त्या सुचना कराव्या. योग्य सुचनांची दखल घेतली जाईल, अशा शब्दात केंद्रीय अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे वस्तु सेवा कर निरीक्षक बिपीन मलिक यांनी  व्यापारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. जीएसटी करप्रणालीच्या अंमलबजावणी नंतर व्यापारी, ग्राहक तसेच अन्य क्षेत्रात निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा श्री. मलिक यांनी आज आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज सकाळी ही बैठक पार पडली. या बैठकीस फरहा जाकीरहा, असिस्टंट कमिशनर जीएसटी, जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, श्रीम.सु.स.थोरात, कर उपआयुक्त (राज्य) कोकण भवन, नवी मुंबई, अशोक नंदनवार, अग्रणी जिल्हा प्रबंध रायगड गि.दि.हुकरे, सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन सुबोध लवटे, स्टेट टॅक्स ऑफिसर एस.एस.कदम, सहा.कंट्रोलर लिगल मेट्रॉलॉजी रायगड तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.मलिक यांनी व्यापारी वर्गाला जीएसटी संदर्भात

जिल्ह्यात एकूण 1130 मि.मि. पावसाची नोंद

        अलिबाग दि.11,(जिमाका):- जिल्ह्यात आज अखेर एकूण 1130.97 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-22.00 मि.मि., पनवेल-16.40 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-18.00 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-18.00 मि.मि., रोहा-8.00 मि.मि., सुधागड-3.66 मि.मि., तळा-2.00 मि.मि., महाड-18.00 मि.मि., पोलादपूर-2.00, म्हसळा-22.20 मि.मि., श्रीवर्धन-43.00 मि.मि., माथेरान-24.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 217.26 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  35.99% इतकी आहे. 000000

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सब ज्युनिअर मुलांच्या स्पर्धा 14 पासून खारघर येथे

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सब ज्युनिअर मुलांच्या स्पर्धा 14 पासून खारघर येथे अलिबाग ‍दि.10,(जिमाका):- जिल्हास्तर  सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (14 वर्षा आतील मुले) क्रीडा स्पर्धा सन 2017-18 दि.14 व 15 या कालावधीत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल, खारघर,ता.पनवेल जि.रायगड येथे आयोजीत करण्यात आली आहे.  या स्पर्धेत सहभागाकरीता वय वर्षे 14 वर्षाखालील मुले सब ज्युनिअर-जन्मतारीख 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (सब ज्युनिअर,ज्युनिअर)क्रीडा स्पर्धेकरीता प्रवेश फी व प्रवेशिका जमा करण्यासाठी व अधिक माहितीसाठी विशाल गर्जे, राज्य क्रीडा मार्गदर्शक (संपर्क क्र.8087076633) यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड अलिबाग यांनी केले आहे. ००००० .

जिल्ह्यात एकूण 1117 मि.मि. पावसाची नोंद

जिल्ह्यात एकूण 1117 मि.मि. पावसाची नोंद         अलिबाग दि.10,(जिमाका):- रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 1117.39 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 17.00 मि.मि., पेण-15.00 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-15.00 मि.मि., उरण-0.90 मि.मि., कर्जत-6.00 मि.मि., खालापूर-41.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-46.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-21.00 मि.मि., महाड-5.00 मि.मि., पोलादपूर-1.00, म्हसळा-54.20 मि.मि., श्रीवर्धन-62.00 मि.मि., माथेरान-24.10 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 345.20 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  35.56% इतकी आहे. 000000

पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहनः 31 जुलै पर्यंत मुदत

पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहनः 31 जुलै पर्यंत मुदत अलिबाग,दि.03,(जिमाका)- खरीप हंगाम 2017-18 साठी जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शिगेदार यांनी केले आहे. जाणून घेऊ या योजनेविषयी- नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या  नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारां व्यतिरिक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली आहे. विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के व रब्बी हंगाम दीड टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के अशी मर्यादा ठेवण्यात