जागतिक लोकसंख्या दिन जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यक्रम


अलिबाग दि.11,(जिमाका) :-  जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग व रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. 'जोडप्यांनी  जबाबदारी  स्विकारा, कुटूंब नियोजनांचा अवलंब करा' हे या वर्षीचे  घोषवाक्य आहे. अलिबाग येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनी व रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रभात फेरीद्वारे लोकसंख्या नियंत्रणाविषयी जनजागृती करण्यात आली . जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आयेाजित कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.सचिन देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनीनी जागतिक लोकसंख्या दिनाविषयी  मनोगत व्यक्त केले. जागतिक लोकसंख्या दिन या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ.सचिन देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ.सुहास कोरे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) यांनी 'लोकसंख्या जर वाढत गेली तर मानवाच्या मुलभूत  गरजा (अन्न,वस्त्र,निवारा) भागविणे शक्य होणार नाही. याकरिता लोकसंख्या नियंत्रणामध्ये ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे' असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 27 जून ते 10 जुलै हा दांपत्य संपर्क पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला.या पंधरवड्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात कुटूंब नियोजनाच्या वेगवेगळ्या उपलब्ध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच 11 जुलै ते 24 जुलै  या कालावधीमध्ये लोकसंख्या स्थिरता पंधरवडा साजरा करण्यात येणार असून आरोग्य विभागामार्फत विविध शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये डॉ.अनिल फुटाणे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.शैलेश घालवाडकर, प्रशासकीय अधिकारी रायगड जिल्हा परिषद, डॉ.अमोर भुसारे, मनोरुग्ण तज्ञ, तसेच श्रीमती मोरे अधिसेविका, सचिन कोटकर, सार्वजनिक आरोग्य परिचारीक, राजेंद्र भिसे, रा.जि.प. तसेच रुग्णालयातील व आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथील अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. 
000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक