Posts

Showing posts from September 18, 2016

समाज उभारणीत पत्रकार महत्वाचा जबाबदार घटक - जेष्ठ पत्रकार मधुकर भावे

Image
दिनांक :- 23/09/2016                                                                वृ.क्र. ६२३ समाज उभारणीत पत्रकार महत्वाचा जबाबदार घटक                                                      - जेष्ठ पत्रकार मधुकर भावे अलिबाग दि.23 (जिमाका) समाज उभारणीत पत्रकार हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याने प्रत्येक बातमीच्या मागे आपण समाजाला काय देणार याचा विचार केला पाहिजे. पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बातमी केली पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व दैनिक प्रहारचे संपादक मधुकर भावे यांनी आज येथे केले. पत्र सूचना कार्यालय मुंबई आणि जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे आयोजित केलेल्या ग्रामीण माध्यम पत्रकारांची कार्यशाळा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, सूचना व पत्र संचालनालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि मान्यवर उपस्थित होते. श्री.मधुकर भावे पुढे म्हणाले की, पत्रकाराने समाजात ज्या चांगल्या गोष्टी घ

रायगडसह इतर गड किल्ले सौंदर्यीकरण केंद्रीय पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा ---वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 22/09/2016                                                                   वृ.क्र.619 रायगडसह इतर गड किल्ले सौंदर्यीकरण केंद्रीय पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा                                          --- वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार अलिबाग दि.22(जिमाका) रायगडसह महाराष्ट्रातील गड व किल्ले सौंदर्यीकरण दृष्टीने निधी बाबत  वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नवी दिल्‍ली येथे केंद्रीय पर्यटन व सांस्‍कृ ति क कार्यमंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत केंद्रीय मंत्रीमहोदयांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याची माहिती वित्तमंत्र्यांनी दिली. महाराष्‍ट्रातील रायगड आणि सिंधुदुर्ग या किल्‍ल्‍यांचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण तसेच पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकास करण्‍याबाबत आवश

पत्रकारांसाठी आज कार्यशाळा मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 22/09/2016                                                                  वृ.क्र.620 पत्रकारांसाठी आज कार्यशाळा मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन        अलिबाग दि.22(जिमाका), भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालय मुंबई मार्फत व जिल्हा माहिती कार्यालय अलिबाग यांच्या सहयोगाने 23 सप्टेंबर 2016 रोजी अलिबाग जिल्हा रायगड येथे एकदिवसीय ग्रामीण प्रसारमाध्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या निती आणि विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचविणे, पत्र सूचना कार्यालयाची प्रादेशिक शाखा कार्यालये आणि जिल्हा तसेच उपजिल्हा स्तरावर कार्यरत पत्रकारांमध्ये थेट संवाद निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्र सूचना कार्यालयाची प्रसिध्दी पत्रके थ

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत मनाई आदेश जारी

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 22 सप्टेंबर  2016                                                          वृत्त क्र. 621 रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत  मनाई आदेश जारी    अलिबाग दि.22 :- (जिमाका)   रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र वगळून) 22 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8.00 पासून 5 ऑक्टोबर 2016 रात्रौ 12.00 वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. रायगड किल्ल्यावर दिनांक 24 सप्टेंबर 2016 रोजी आयोजित केलेल्या शिवराज्यभिषेक सोहळा व या सोहळयास काही संघटनानी दर्शविण्यात आलेला विरोध, 1 ऑक्टोबर 2016 पासून होत असलेला नवरात्रौ उत्सव, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे व इन्टीट्युट ऑफ पेट्रोके

रायगड जिल्ह्यात 22 सप्टेंबर पर्यंत 56707.20 मि.मि. पाऊस

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 22 सप्टेंबर  2016                                                               वृत्त क्र. 622 रायगड जिल्ह्यात 22 सप्टेंबर पर्यंत        56707.20 मि.मि. पाऊस   अलिबाग दि.22 :- (जिमाका)  रायगड जिल्ह्यात दिनांक 22 सप्टेंबर 2016 पर्यंत 56707.20 मि.मि. इतका पाऊस  पडला असून त्याची सरासरी 3544.20 मि.मी.आहे. तर आज दि.22 सप्टेंबर 2016 रोजी पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे.  अलिबाग-74.00 मि.मि. पेण-320.00 मि.मि., मुरुड-78.00 मि.मि., पनवेल 50.60 मि.मि., उरण-139.00 मि.मि., कर्जत-7.20 मि.मि., खालापूर-37.00 मि.मि., माणगांव-95.00 मि.मि., रोहा-121.00 मि.मि., सुधागड पाली-129.00 मि.मि., तळा-97.00 मि.मि., महाड-130.00 मि.मि., पोलादपूर-132.00 मि.मि., म्हसळा-83.20 मि.मि., श्रीवर्धन-96.00 मि.मि., माथेरान-42.00 मि.मि., एकूण 1631.00

बळीराजाचा बहुमान कृषी पुरस्काराचा सन्मान

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad लेख क्र.37,                                                                  दिनांक :- 22/09/2016 बळीराजाचा बहुमान कृषी पुरस्काराचा सन्मान            आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. महाराष्ट्रातही कृषी क्षेत्राला मोठे महत्व आहे. आपल्याकडे   राज्यातील डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ.पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ, अकोला, स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महात्मा फुले  कृषी विद्यापीठ, राहुरी या चार महत्वाच्या कृषी विद्यापीठा मार्फत संशोधन केले जाते. तसेच कृषी विभागामार्फत ही विविध प्रयोग राबविले जातात. प्रांतानुसार, तेथील वातावरणानुसार या प्रयोगांची अंमलबजावणी होते आणि त्यातूनच प्रगतीची एक दिशा मिळते.            त्यामुळे या भागातील बळीराजाला  आपल्या शेतीत उत

पत्र सूचना कार्यालयाची पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळा

दिनांक :- 21 सप्टेंबर   2016                                                                                                    वृत्त क्र. 618 पत्र सूचना कार्यालयाची पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळा    अलिबाग दि.21 :-  (जिमाका) भारत सरकारच्या पत्रसूचना कार्यालय मुंबई आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 सप्टेंबर, 2016 रोजी माध्यम प्रतिनिधींसाठी एक दिवशीय ग्रामीण माध्यम  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.   केंद्र सरकारच्या निती आणि विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचविणे, माध्यमासंबंधी विषयावर चर्चा तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढविणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.    हॉटेल मेपल आय.व्ही., गोंधळपाडा, अलिबाग येथे आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन रायगड जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे.  तर दैनिक प्रहारचे संपादक मधुकर भावे हे  मार्गदर्शन करणार आहेत.        कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी आपली नावे

पनवेल,उरण, कर्जत, खालापूर तालुक्यांसाठी 25 सप्टेंबरला विशेष पल्स पोलिओ मोहिम----जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

Image
दिनांक :- 21 सप्टेंबर   2016                                                                                                    वृत्त क्र. 613 पनवेल,उरण, कर्जत, खालापूर तालुक्यांसाठी 25  सप्टेंबरला विशेष पल्स पोलिओ मोहिम                                                           ----जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले    अलिबाग दि.21 :-  (जिमाका) पनवेल,उरण, कर्जत, खालापूर या 4 तालुक्यांसाठी 25  सप्टेंबरला विशेष पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार असून नागरिकांनी  सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले आज येथे केले.  या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या  यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाहूबली नागावकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक आर.टी.विशे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.निलेश म.कोकरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि उपस्थित होते.             पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, उपरोक्त 4 तालुक्यांमध्ये अत्यंत काटेकोरपणे ही मोहिम राबवावी.  लसीकरण बुथ, त्यासाठी आवश्यक मन

रोहा तालुक्याला लाभले जलयुक्त शिवाराचे वरदान

Image
दिनांक :- 20 सप्टेंबर 2016                                                           लेख क्र- 35 रोहा तालुक्याला लाभले जलयुक्त शिवाराचे वरदान      सर्वसाधारणपणे  संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण भरपूर असते. तर  रायगड जिल्ह्यात साधारणत: 50 हजार मि.मी. पाऊस वर्षाला पडतो.  खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ओढे नजरेला सुखद वाटतात.  पण हे वाहून जाणारे पाणी कोकणातील जमिनीतच मुरले  तर…तर काय? पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पेनुसार गतवर्षी पासून जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाची योजना राबविली.        एका महत्वाकांक्षी अशा जलुयक्त शिवार योजनेचा पाया पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भरभक्कम  ठरला.  रायगड जिल्ह्यातही 14 तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.    ही कथा आहे रोहा परिसरातील जलविकासाची, जलयुक्त शिवार अभियानाच्या यशाची.... महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना राबविली आणि मोठी जलक्रांतीच घडून आली.  सन 2019 पर्यंत महाराष्ट्र जलसमृध्द करण्याची ही महत्

जीवरक्षक साहित्याचे वाटप सागरी पर्यटक सुरक्षा संदर्भात जबाबदारीने काम करावे --जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

Image
दिनांक :- 20 सप्टेंबर  2016                                                      वृत्त क्र. 613 जीवरक्षक साहित्याचे वाटप सागरी पर्यटक सुरक्षा संदर्भात                 जबाबदारीने काम करावे                                                                              --जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले अलिबाग दि.20 (जिमाका) जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी तसेच सागरी किनाऱ्यावर नेमलेल्या सुरक्षा रक्षकांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तथा जीवनरक्षक साहित्याचे वाटप संबंधितांना आज  करण्यात आले.  त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा परिषद रायगड उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, तहसिलदार अलिबाग प्रकाश संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पुढ

खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक :- 20 सप्टेंबर  2016                                                      वृत्त क्र. 610 खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक                                                   --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.20 :-  प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे तशी ती क्रीडा क्षेत्रातही आहे.  खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे 20 व 21 सप्टेंबर रोजी या दोन दिवसीय आयोजित करण्यात आलेल्या  राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेचे उद्घाटन  जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या  हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी भारतीय वेटलिफ्टींग संघटना महासचिव संतोष सिंहासने,  क्रीडा व युवक सेवा मुंबई उपसंचालक एन.बी.मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, रायगड जिल्हा वेटलिफ्टींगचे अध्यक्ष